रामदास आठवलेंनी काढल्या शशी थरूरांच्या इंग्लिश स्पेलिंगच्या चुका

फोटो स्रोत, Getty Images
रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले त्यांच्या राजकारणापेक्षा कोट्या आणि कवितांसाठी ओळखले जातात. संसदेत अनेकदा ते आपल्या कवितांनी हास्याची कारंजी फुलवतात.
संसदेत सुरू असलेल्या धीरगंभीर चर्चांमध्ये त्यांच्या कविता हा एक थंडगार शिडकावा असतो. त्यामुळे ते बोलायला उभे राहिले की सदस्यांचं लक्ष त्यांच्या मुद्द्यांपेक्षा कवितेकडे जास्त असतं.
तर झालं असं की, काल 10 तारखेला जेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर दिले तेव्हा आठवले नेमके सीतारामन यांच्या मागच्या बाकावर बसले होते. त्यामुळे संसद टीव्हीच्या कॅमेऱ्यात त्यांचे सगळे हावभाव कैद झाले.

फोटो स्रोत, @ShashiTharoor
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आठवले यांचा एक हावभाव टिपला. त्याचा स्क्रीनशॉट टाकला आणि थेट ट्विटरवर टाकला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
ते लिहितात, दोन तास बजेटवर चर्चा झाली पण काही नेत्यांच्या हावभावावरून कोणालाच त्या बोलताहेत हे कळलं नाही. त्यांचा रोख आठवलेंकडे होते. पण या निमित्ताने त्यांनी सीतारामन आणि आठवले असे एकाच दगडात दोन पक्षी मारले.
आता थरूर काहीतरी अगम्य इंग्रजीत ट्विट करतात ही जनमान्य रीत आहे. त्यामुळे त्याची बातमी होण्याचं कारण नाही. मात्र आज रामदास आठवलेंनी चक्क थरुरांच्या इंग्रजीच्या चुका काढल्या आणि गहजब झाला.
हे ट्वीट दिसताच सगळे सोशल मीडिया वीर कामाला लागले आणि आता दिवसभर करमणुकीची निश्चिंती या कल्पनेने ते हर्षोल्हासित झाले. आता आठवले काय म्हणाले ते बघूया.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
ते म्हणतात, "जेव्हा एखादी व्यक्ती अकारण वक्तव्य करते तेव्हा चुका होणारच. आता बघा ना. ते Bydget नाही तर Budget आहे आणि Rely नाही तर Reply आहे."
शशी थरुरांसारखं इंग्रजीचं विद्यापीठ इतक्या साध्या शब्दांच्या चुका करत असेल तर चर्चा तर होणारच. तशी आता सुरू झाली आहे. इंग्रजीचा एखादा शब्द अडला तर तमाम सोशल मीडिया युजर्स थरुरांवर 'Rely' राहतात. मात्र त्यांचेच शब्द चुकल्यामुळे आता ते काय बोलतात यावर सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
तेवढ्या वेळात सोशल मीडिया योद्ध्यांनी ही संधी साधली. गणेश स्वामी नावाच्या एका युझर ने एक कविताच केली. ते म्हणतात,
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
'साहेबांनी केला शशी थरूर यांचा सुरूर
साहेबांनी केला शशी थरूर यांचा सुरूर
यापुढे करणार नाही इंग्रजी लिहायची कसूर
उगीच नाही मोदीजींनी राज्यसभेत पाठवले.
चुकीला माफी देत नाही साहेब आमचे आठवले.'
तर एक युझर म्हणतात, आठवलेंनी थरुरांना इंग्रजी शिकवणं म्हणजे मोदींनी वैज्ञानिकांना पवनचक्कीचं तंत्रज्ञान शिकवण्यासारखं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
ट्वीटरवर अनेकांच्या प्रतिभेला धुमारे फुटत असतानाच थरूर आले आणि त्यांनी आपली चूक मान्य केली.
ते म्हणाले, "मी माझी चूक मान्य करतो. वाईट टायपिंग ही चूकीच्या इंग्रजीपेक्षाही मोठी चूक आहे. आता तुम्ही विषय काढलाच आहे. तर तुम्ही तुमचं ज्ञान जेएनयू कडेही वळवा. तिथेही तुमच्या या ज्ञानाचा उपयोग होईल. परवा जेएनयूच्या नव्या कुलगुरुंची निवड झाली तेव्हा त्या पत्रात व्याकरणाच्या अनेक चुका असल्याचं सोशल मीडियावरील लोकांनी दाखवून दिलं होतं. शशी थरुरांचा रोख त्यावर होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
अशा प्रकारे थरुर- आठवले जोडगोळीने वीकेंडची दणक्यात सुरुवात केली. ही बातमी वाचल्यावर हे वाक्युद्ध आणि त्यावरच्या कमेंट वाचायला तुम्ही जालच. तिथे आठवलेंच्या शैलीत अनेक कविता दिसतील. त्याचा मनमुराद घेतला जाईलच.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)