रमेश कुमार : 'बलात्कार होताना पडून राहा आणि मजा घ्या', वक्तव्याप्रकरणी काँग्रेस आमदाराची माफी

रमेश कुमार

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, इमरान कुरेशी,
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

जेव्हा बलात्कार होणं निश्चित होतं, तेव्हा शांत पडून राहा आणि त्याची मजा घ्या, असं वक्तव्य करणारे कर्नाटक काँग्रेसचे नेते रमेश कुमार यांनी आता मागितली आहे.

ते म्हणाले, "माझ्या वक्तव्यामुळे ज्यांची मनं दुखावली, त्यांची मी खुल्या मनानं माफी मागत आहे. महिलांचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. तसंच विधीमंडळाची प्रतिष्ठा कमी करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता."

प्रकरण काय?

कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष यांच्यातील एका संवादामुळे वाद निर्माण झाला आहे. यामध्ये विधानसभेच्या माजी अध्यक्षांनी बलात्कारासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

विधानसभेचं सत्र सुरू होतं. त्यावेळी विद्यमान अध्यक्ष विश्वेश्वर हेगरे कागेरी हे सदस्यांना शांत राहण्याची वारंवार विनंती करत होते. पण तरीही ते त्यांना शांत करू शकत नव्हते.

त्याच दरम्यान त्यांची नजर आपल्या आधी विधानसभेचे अध्यक्ष राहिलेल्या रमेश कुमार यांच्यावर गेली. ते काँग्रेसच्या बाजूने पहिल्या बाकावर बसलेले होते.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

सदस्यांना शांत करू न शकण्याच्या उद्विग्नतेतून कागेरी यांनी रमेश कुमार यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, रमेश कुमार, तुम्हाला माहीत आहे. मला वाटतं की परिस्थिती पूर्ववत करण्याऐवजी आता आपण या स्थितीचा आनंद घ्यायला हवा. मी त्यांना त्यांचं बोलणं चालू ठेवण्यास सांगेन."

अध्यक्षांनी इतकंच म्हटलं पण याच्या उत्तरादाखल रमेश कुमार यांनी आपल्या दोन वर्षांपूर्वीच्या वक्तव्याप्रमाणेच आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं.

दोन वर्षांपूर्वी रमेश कुमार हे विधानसभेच्या अध्यक्षपदी असताना त्यांनी अशाच प्रकारचं एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

अत्याचार

फोटो स्रोत, Getty Images

यावेळी ते म्हणाले, "असं म्हटलं जातं की जेव्हा बलात्कार होणं निश्चित होतं, तेव्हा शांत पडून राहा आणि त्याची मजा घ्या. ही तिच स्थिती आहे. त्यामध्ये तुम्हीही आहात."

व्हायरल व्हीडिओमध्ये रमेश कुमार यांनी असं म्हटल्यानंतर स्वतः त्यांच्यासह विधानसभा अध्यक्षही हसताना दिसत आहेत. त्यांच्या आजूबाजूचे काही सदस्यही यावर हसताना दिसत आहेत.

रमेश कुमार यांनी अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य यापूर्वीही केलेलं आहे. पण पूर्वीच्या घटनेप्रमाणेच यावेळीही कुणीच त्यांच्या बोलण्यावर आक्षेप घेतला नाही.

यापूर्वी फेब्रुवारी 2019 मध्ये तत्कालीन विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी म्हटलं होतं, "मला एखाद्या बलात्कार पीडितेप्रमाणेच वाटतं."

त्यावेळी सभागृहातील सदस्य पूर आणि पीकाच्या नुकसानाबाबत चर्चा करू इच्छित होते. पण अध्यक्ष महोदय त्यावरून नाराज होते. त्यादरम्यान रमेश कुमार यांनी वरील वक्तव्य केलं होतं.

दोन वर्षांपूर्वी या वक्तव्यामुळे रमेश कुमार यांना महिला सदस्यांच्या टीकेला तोंड द्यावं लागलं होतं.

काँग्रेस सदस्या रुपकला एम. याबाबत बोलताना म्हणाल्या, "रमेश कुमार यांनी ते वक्तव्य केलं त्यावेळी मी सभागृहात उपस्थित नव्हते. अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग सभागृहात होऊ नये, अशी विनंती आम्ही यापूर्वीच महिला सदस्यांमार्फत केलेली आहे.

लैंगिक अत्याचाराचा सामना करणाऱ्या महिलांना आयुष्यभर सहन करावं लागतं. कोणत्याही इतर गोष्टीशी याची तुलना करणं चुकीचं आहे. या वक्तव्याचं कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)