पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय मच्छिमाराचा मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images
अरबी समुद्रात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय मच्छिमाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
गुजरातच्या किनारी भागाला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर ही घटना घडली.
पाकिस्ताच्या मेरीटाईम सिक्युरिटी एजन्सीने (PMSA) हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हा मच्छिमार महाराष्ट्राचा रहिवासी असल्याची माहिती PTI वृत्तसंस्थेने दिली आहे.
याशिवाय एक मच्छिमार जखमी असल्याचंही वृत्त आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. देवभूमी द्वारकाचे पोलीस अधीक्षक सुनील जोशी यांच्या माहितीनुसार मासे पकडण्यासाठी गेलेल्या जलपरी नामक बोटीत हे मच्छिमार बसले होते. एकूण सात मच्छिमार या नावेत स्वार झाले होते.
श्रीधर रमेश असं मृत मच्छिमाराचं नाव आहे. ते ठाणे जिल्ह्याचे रहिवासी होते.
सात जण स्वार असलेल्या या बोटीवर PMSA कडून गोळीबार करण्यात आला. त्यात रमेश हे जागीच मृत्यूमुखी पडले. तर इतर एका मच्छिमाराला किरकोळ दुखापत झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Reuters
मृत श्रीधर रमेश यांना रविवारी रात्री ओखा बंदरावर आणण्यात आलं.
पोरबंदर नवी बंदर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अरबी समुद्रात 12 नॉटिकल माईल अंतरावर गुजरातच्या किनाऱ्याजवळ कोणतीही घटना घडली, तर त्याची नोंद याच पोलीस ठाण्यात केली जाते.
जलपरी नामक ही बोट ओखा वरून 25 ऑक्टोबर रोजी समुद्रात गेली होती. यामधीत सात मच्छिमारांपैकी पाच गुजरातचे तर चार महाराष्ट्राचे होते.
या घटनेचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान "आम्ही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आम्ही यासंदर्भात पाकिस्तानला विचारू. प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि घडामोडींचा तपशील येत्या काळात प्रसारमाध्यमांसमोर ठेऊ", असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








