कुठे सैरावैरा पळणारे लोक, तर कुठे उद्ध्वस्त इमारती; इस्रायल-इराण संघर्षाची भीषणता दाखवणारे 12 फोटो

इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर इराणमधील लोक रस्त्यांवर रडताना दिसले.

फोटो स्रोत, Reuters/Getty Images

वाचन वेळ: 4 मिनिटे

अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी मारले गेले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मृत्यूचा दावा केला होता. त्यानंतर इराणच्या सरकारी वाहिनीनंही याला दुजोरा दिला.

अमेरिका आणि इस्रायलनं शनिवारी (28 फेब्रुवारी) इराणच्या अनेक शहरांवर हल्ला केला. त्यानंतर रविवारी (1 मार्च) सकाळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी 'ट्रुथ सोशल'वर खामेनी यांच्या मृत्यूचा दावा केला. या दाव्यानंतर इराणच्या सरकारी माध्यमांनीही त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला

खामेनी हे इतिहासातील सर्वात वाईट व्यक्ती होते, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.

खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये लोकांना आपला सर्वोच्च नेता गमावल्यानंतर शोक अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

इरामध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये सुमारे 200 लोक मारले गेल्याचं वृत्त आहे.

बीबीसीच्या सहयोगी सीबीएसला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इराणच्या 40 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

इराणच्या शेवटच्या शाह (राजा) यांचे निर्वासित सुपुत्र रझा पहलवी यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूचं स्वागत केलं.

पुढील काही फोटोंमधून जाणून घ्या इराण-इस्रायल-अमेरिकेतील संघर्षाची भीषणता आणि परिस्थिती -

शनिवारी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले केले. हवाई हल्ल्यानंतर इराणची राजधानी तेहरानमध्ये आकाशात असे धुराचे लोट उठले.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, शनिवारी (28 फेब्रुवारी) अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले केले. हवाई हल्ल्यानंतर इराणची राजधानी तेहरानमध्ये आकाशात असे धुराचे लोट उठले.
इराणच्या दक्षिणेकडील होर्मोज्गान प्रांतातील मिनाब काउंटीमधील मुलींच्या एका प्राथमिक शाळेवर इस्रायली हल्ला झाला. या हल्ल्यात सुमारे 143 जणांचा मृत्यू आणि अनेकजण जखमी झाले. या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेली शाळेची इमारत, बीबीसीने या फोटोची पडताळणी केली.
फोटो कॅप्शन, इराणच्या दक्षिणेकडील होर्मोज्गान प्रांतातील मिनाब काउंटीमधील मुलींच्या एका प्राथमिक शाळेवर इस्रायली हल्ला झाला. या हल्ल्यात सुमारे 143 जणांचा मृत्यू आणि अनेकजण जखमी झाले. या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेली शाळेची इमारत, बीबीसीने या फोटोची पडताळणी केली.
कतरच्या रहिवासी भागात मिसाइल पडल्यानंतर उठलेले धुराचे लोट आणि जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळताना लोक
फोटो कॅप्शन, कतरच्या रहिवासी भागात मिसाइल पडल्यानंतर उठलेले धुराचे लोट आणि जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळताना लोक
इराणने प्रत्युत्तर म्हणून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इराणने प्रत्युत्तर म्हणून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला
शनिवारी रात्री इराणने डागलेल्या क्षेपणास्त्रामुळे तेल अवीवमधील एक निवासी इमारत उद्ध्वस्त झाली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शनिवारी रात्री इराणने डागलेल्या क्षेपणास्त्रामुळे तेल अवीवमधील एक निवासी इमारत उद्ध्वस्त झाली.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या तेहरानमधील घराचं नुकसान दाखवणारा सॅटेलाईट फोटो

फोटो स्रोत, Airbus DS 2026

फोटो कॅप्शन, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या तेहरानमधील घराचं नुकसान दाखवणारा सॅटेलाईट फोटो
पश्चिम आशियातील अमेरिकन तळांवर आणि इराकमधील कुर्दिस्तान भागातील अमेरिकन तळांवर इराणच्या जेट बॉम्बने हल्ला करण्यात आल्याची माहिती इराणची सरकारी माध्यमसंस्था IRNA ने दिली.

फोटो स्रोत, PressTV

फोटो कॅप्शन, पश्चिम आशियातील अमेरिकन तळांवर आणि इराकमधील कुर्दिस्तान भागातील अमेरिकन तळांवर इराणच्या जेट बॉम्बने हल्ला करण्यात आल्याची माहिती इराणची सरकारी माध्यमसंस्था IRNA ने दिली.
हवाई स्फोटांनी दुबई, दोहा आणि मनामा हादरले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हवाई स्फोटांनी दुबई, दोहा आणि मनामा हादरले.
इराणच्या प्रतिहल्ल्यांनंतर इस्रायलमधील विध्वंसाचं दृष्य

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, इराणच्या प्रतिहल्ल्यांनंतर इस्रायलमधील विध्वंसाचं दृष्य
बहरीनची राजधानी मनामा येथे इराणी ड्रोन हल्ल्यानंतर इमारतीतून उठणाऱ्या आगीच्या ज्वाळा

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, बहरीनची राजधानी मनामा येथे इराणी ड्रोन हल्ल्यानंतर इमारतीतून उठणाऱ्या आगीच्या ज्वाळा
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर तेहरानच्या रस्त्यावर शोक व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेले लोक

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर तेहरानच्या रस्त्यावर शोक व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेले लोक
इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर इराणमधील लोक रस्त्यांवर रडताना दिसले.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर इराणमधील लोक रस्त्यांवर रडताना दिसले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)