भारत-वेस्ट इंडिज संघांमध्ये आज 'करो वा मरो'ची लढत, नाणेफेक जिंकून भारताचं प्रथम क्षेत्ररक्षण

क्रिकेट

फोटो स्रोत, Matt Roberts-ICC/ICC via Getty Images

फोटो कॅप्शन, सूर्यकुमार यादव
वाचन वेळ: 2 मिनिटे

ट्वेन्टी20 विश्वचषकात सुपर एटमधल्या अखेरच्या लढतीत आज (1 मार्च) भारत आणि वेस्ट इंडिजचे संघ आमने-सामने आहेत.

कोलकात्यात सुरु असलेला हा सामना जणू स्पर्धेची उपांत्यपूर्व लढतच बनला आहे. कारण उपांत्य फेरी गाठायची तर दोन्ही संघांना आजच्या सामन्यात विजय आवश्यक आहे.

वेस्ट इंडीजनं केवळ ही लढत जिंकली तरी पुरेसं ठरेल, तर भारताला रनरेट सुधारण्यासाठी मोठ्या विजयाची गरज आहे.

ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये आज भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

वेस्ट इंडीजनं 15 षटकांत चार बाद 125 धावांची मजल मारली आहे.

भारतीय संघ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतीय संघ

इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी आधीच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर, या सामन्याचा निकाल उपांत्य फेरीत कोणता संघ इंग्लंडविरुद्ध खेळेल हे ठरवेल.

भारतीय संघाला अव्वल 8 फेरीच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्करावी लागली होती. मात्र, त्यानंतरच्या सामन्यात भारताने झिम्बॉम्बेवर विजय मिळवला.

या सामन्यात भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ठ फटकेबाजी केली होती. मागील सामना भारताने आपल्या नावावर केला असला तरी यावेळी वेस्ट इंडिजला नमवत उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला आणखी जोर लावावा लागणार आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)