प्राणीजगतातील जबरदस्त ठोसे आणि लाथा

तपकिरी ससा

फोटो स्रोत, Andy Rouse/naturepl.com

फोटो कॅप्शन, तपकिरी ससा

महंमद अली यांनी बॉक्सिंगमध्ये प्रतिस्पर्ध्याला जोरदार ठोसे लगावलेही असतील पण भूतलावर असेही प्राणी आहेत जे यापेक्षाही जोरदार ठोसे लगावू शकतात. कोण आहेत हे प्राणी?

जगातले असे प्राणी आणि पक्षी यांचे जोरदार प्रहार - अर्थात ठोसे आणि लाथा तुम्हाला आश्चर्यचकित करतील.

बहुतेक प्राणी-पक्षी स्वसंरक्षणार्थ किंवा सावज साधायला असे ठोसे आणि लाथा लगावतात.

त्यांचं प्रहार करण्याचं कौशल्य आणि वेग तुम्हाला नक्कीच अचंबित करतील.

मँटीस श्रिं

मँटीस श्रिंप हा समुद्री जैवशास्त्रात वेगवान ठोसा लावण्यासाठी ओळखला जातो. ही शक्ती ऐवढी असते की, मँटीस श्रिंप हा पाण्याला कापत जातो. या आघातामुळे उष्णता, प्रकाश आणि ध्वनी निर्माण होतो.

मँटीस श्रिम्प

फोटो स्रोत, Georgette Douwma/naturepl.com

फोटो कॅप्शन, मँटीस श्रिम्प

फक्त 800 मायक्रोसेकंदात रंगीबेरंगी दिसणारा मँटीस श्रिंप त्याच्या वजनाच्या अडीच हजार पट शक्ती निर्माण करू शकतो, असं नॉर्थ कॅरोलिनाच्या ड्युक विद्यापीठातील प्रयोगशाळेनं केलेल्या संशोधनातून समोर आलं.

ट्रॅप-जॉ अँट

ट्रॅप-जॉ अँट या वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मुष्टीयुद्ध करतात. या मुंगीच्या तोंडाजवळ अँटेनासारखे दातेरी अवयव असतात.

ट्रॅप-जॉ अँट

फोटो स्रोत, Solvin Zankl/naturepl.com

फोटो कॅप्शन, ट्रॅप-जॉ अँट

वस्तीतलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हे सर्व सुरू असतं. कधीकधी तर भांडण सोडवतानाच त्यांच्यात भांडण सुरू होतं.

2016 मध्ये संशोधकांनी हायस्पीड कॅमेऱ्याच्या मदतीने चार प्रजातींचं चित्रीकरण केलं असता अँटेनाच्या साह्याने ते एकमेकांशी मारामारी करत असल्याच दिसलं.

तपकिरी ससा

सस्तन प्राण्यांमध्ये सर्वांत प्रसिद्ध ठोसेबाज आहे तो तपकिरी ससा. युरोपीयन ससे हे वसंत ऋतूमध्ये येणाऱ्या प्रजनन काळात फार भांडतात.

तपकिरी ससा

फोटो स्रोत, Andy Rouse/naturepl.com

फोटो कॅप्शन, तपकिरी ससा

याआधी असं समजलं जायचं की, फक्त नर ससे भांडतात. नंतर मात्र संसोधनातून माहिती समोर आली की, मुष्टीयुद्धाची सुरूवात तर मादी सशाकडून होते. समोरच्या दोन पंजांना ते एकमेकांना ठोसे लावत असतात.

ऑस्ट्रेलियन कांगारू

ऑस्ट्रेलियन कांगारू हे स्वःरक्षणासाठी ठोसे लगावतात, हे अनेक ऑस्ट्रेलियन नागरिकांना चांगलंच ठाऊक आहे. पूर्ण वाढ झालेल्या एका नर कांगारूच्या समोरच्या पायाच्या मांसपेशी मजबूत असतात.

ऑस्ट्रेलियन कांगारू

फोटो स्रोत, Jouan & Rius/naturepl.com

फोटो कॅप्शन, ऑस्ट्रेलियन कांगारू

प्रतिस्पर्ध्याला चापटा आणि ठोसे लगावण्यासाठी तसेच वर्चस्व गाजविण्यासाठी ते कामी येतात.

किक बॉक्सिंगमध्ये त्यांचा 'हातखंड' आहे. आणि किकविषयी बोलायचं झाल्यास, खूरांची एक किक देखील मोठा प्रभाव पाडू शकते.

झेब्रा

घोडा किती जोरात किक मारू शकतो, हे अनेकांना माहित आहे. झेब्र्याची किक त्याहून अधिक जोरदार असते अशी अफवा आहे, पण त्यासाठी स्पष्ट पुरावा नाही.

झेब्रा

फोटो स्रोत, Lou Coetzer/naturepl.com

फोटो कॅप्शन, झेब्रा

घोड्यांच्या तुलनेत झेब्रा अधिक कणखर असल्याचं मानलं जातं. त्यामुळंच कदाचित त्यांची किक अधिक प्रभावी असावी.

कॅलिफोर्निया डेव्हीस विद्यापीठाचे टीम कॅरो यांनी त्यांच्या 'झेब्रा क्रॉसिंग' पुस्तकात याचं वर्णन केलं आहे.

व्हीडिओ कॅप्शन, हे प्राणी तुम्ही कदाचित कधीही पाहू शकणार नाहीत

मागच्या पायाने झेब्रा सिंहाच्या छातीत ठोसा लगावतो, असं व्हिडीओ फुटेजमध्ये दिसतं पण हे ठोसे घातक असल्याचा वैज्ञानिक रेकॉर्डमधून अद्याप समोर आलेलं नाही.

सेक्रेटरीबर्ड

सरीसृपांवर (सरपटणाऱ्या प्राण्यांवर) जगणारा आफ्रिकन पक्षी ज्याला 'सेक्रेटरी बर्ड' या नावानं ओळखलं जातं. 'निंजा ईगल ऑन स्टिल्ट्स' असं त्याचं वर्णन केलं जातं.

सेक्रेटरीबर्ड

फोटो स्रोत, Laurent Geslin/naturepl.com

फोटो कॅप्शन, सेक्रेटरीबर्ड

राखाडी आणि काळसर रंगाचा हा पक्षी आफ्रिकेतील सबसहारन वाळवंटात आढळतो.

सेक्रेटरी बर्ड अगदी हास्यास्पद वाटू शकतं. पण त्यांचं अन्न हे विषारी साप आहेत. एकाच जोरदार किकने ते सापांना मरणासन्न अवस्थेत पाठवू शकतात.

2016 मध्ये एका अभ्यासात, शास्त्रज्ञांनी एका नर सेक्रेटरी बर्डच्या किकची क्षमता मोजली होती. ती अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त होती.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)