वाह! प्राण्यांचे असे फोटोज जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

2017 च्या सोनी वर्ल्ड फोटोग्राफी अॅवॉर्ड्सची अंतिम फेरी गाठणारे हे काही विलक्षण फोटो.

इग्वाना

फोटो स्रोत, JONATAN BANISTA, 2017 SONY WORLD PHOTOGRAPHY AWARD

फोटो कॅप्शन, जगातल्या सर्वांत मोठ्या फोटो स्पर्धेसाठी दोन लाखाहून अधिक फोटो आले. याच स्पर्धेतल्या राष्ट्रीय पुरस्कार गटात प्रथम तीन क्रमांक पटकावणारे हे थक्क करणारे फोटो. पनामामध्ये जॉनथन बॅनिस्टाच्या या इग्वाना फोटोने पहिलं स्थान पटकावलं. या सरड्याचा हा एक भारी फोटो काढण्याआधी जॉनथनला भरपूर शॉट्स घ्यावे लागले होते.
तोंडात मासा पकडलेल्या पक्षी

फोटो स्रोत, PETAR SABOL, 2017 SONY WORLD PHOTOGRAPHY AWARDS

फोटो कॅप्शन, क्रोएशियामधल्या पॅलोवेच जवळच्या एका तलावात पीटर सेबॉलने हा सुंदर फोटो टिपला आहे. या फोटोने त्याच्या देशात प्रथम स्थान पटकावलं. पीटरने सांगितलं की पाण्यातली ती रिंगणं आणि तोंडात मासा पकडलेल्या या पक्ष्याचा हा फोटो टिपण्यासाठी त्याने आपल्या कॅमेऱ्यातला ‘बर्स्ट मोड’मध्ये सुरू ठेवला होता.
देवमासा

फोटो स्रोत, JOHN TAO/2017 SONY WORLD PHOTOGRAPHY AWARDS

फोटो कॅप्शन, तैवानच्या जॉन ताओने या सुंदर फोटोसाठी तिसरं स्थान पटकावलं. या फोटोबद्दल तो सांगतो की, जिथून त्यांने हा फोटो काढला, तिथून जवळच एक देवमासा आपल्या पिल्लाला पाण्याच्या बाहेर उडी कशी मारायची, हे शिकवत होता.
अंटार्क्टिकाचे पेंग्विन

फोटो स्रोत, NADIA ALY/2017 SONY WORLD PHOTOGRAPHY AWARDS

फोटो कॅप्शन, अमेरिकेच्या नाडीया अलीने या फोटोसाठी तिसरं स्थान मिळावलं. अंटार्क्टिकाच्या थंड बर्फाळ पाण्यात शिकार करणारे हे जेंटू पेंग्विन्स. कसे सगळे पेंग्विन्स एकत्र चालतात, हे पाहणं तिला फारच रंजक असतं. या फोटोमध्ये सगळे पेंग्विन एकत्र पाण्याबाहेर उडी मारत आहे.
झाडावर बसलेली सिंहीण

फोटो स्रोत, DEVENI NISHANTHA MANJULA/2017 SONY AWARDS

फोटो कॅप्शन, या फोटोमध्ये तुम्हाला सिंह दिसला का? केनियाच्या लेक नकुरु राष्ट्रीय उद्यानात मित्रांसोबत फिरताना देवेनी निशांथ मंजुळा हिला एका सिंहीणींचं दर्शन घडलं. या जबरदस्त फोटोला श्रीलंकेतून पहिलं स्थान मिळालं.
झाडांच्या फांदीवर बसून आराम करणाऱ्या बिबट्याचा फोटो

फोटो स्रोत, BJORN PERSSON/SONY WORLD PHOTOGRAPHY AWARDS

फोटो कॅप्शन, फक्त सिंहच झाडांवर आरामात राहू शकतात, असं काही नाही! स्वीडनच्या योर्न पर्सनने झाडाच्या फांदीवर आराम करणाऱ्या या बिबट्याच्या फोटोसाठी तिसरा क्रमांक पटकावला आहे.
धावणाऱ्या जिराफ आणि झेब्रांचा फोटो

फोटो स्रोत, MOHAMMAD ALNASER, 2017 SONY AWARDS

फोटो कॅप्शन, जिराफ आणि झेब्रांचा धावतानाचा हा अविश्वसनीय क्षण टीपला आहे मोहम्मद अलनसरने. सौदी अरेबियातून आलेल्या फोटोंमधून त्याला तिसरे स्थान मिळालं आहे.
घुबड

फोटो स्रोत, HUSAIN HAKIN, 2017 SONY WORLD PHOTOGRAPHY AWARDS

फोटो कॅप्शन, आणि या घुबडाच्या फोटोला दुसरं स्थान मिळालं आहे. सौदी अरेबियाच्या हुसेन हाकिन अलफ्रेडने हे छायाचित्रं टिपलं आहे.
मोठ्या डोळ्याचे मासे

फोटो स्रोत, DANNY OCAMPO, 2017 SONY WORLD PHOTOGRAPHY AWARDS

फोटो कॅप्शन, फिलीपिन्समधून तिसरा पुरस्कार पटकावणारा डॅनी ओकॅम्पोचा हा फोटो. यात मोठ्या डोळ्यांच्या ट्रेवॅली माशांचा थवा दिसत आहे.
तारांवर बसलेले काही पक्षी

फोटो स्रोत, CARLOS M. ALMAGRO, 2017 SONY AWARDS

फोटो कॅप्शन, कार्लोस एम अल्माग्रोला यांच्या या एकदम भारी फोटोला स्पेनमधून तिसरं स्थान मिळालं आहे. तो अगदी हळूवार पक्ष्यांजवळ आपला कॅमेरा घेऊन गेला, पण तेव्हाच काही पक्षी तिथून उडायला लागले. मग त्याने अनेक फोटो काढत त्यातून हा एक स्पर्धेसाठी पाठवला.