नरेंद्र मोदींचे इस्रायल संसदेला संबोधन, काय म्हणाले पंतप्रधान?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

फोटो स्रोत, ANI

वाचन वेळ: 1 मिनिटे

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी (बुधवार) इस्रायलच्या संसदेला (क्नेसेट) संबोधित केले. त्यांनी 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

पंतप्रधान मोदी यांनी हमासच्या हल्ल्याला 'दहशतवादी' कृत्य म्हटले आणि सांगितले, "भारतीय लोक ही वेदना समजू शकतात. निरपराध नागरिकांच्या हत्येला कोणतेही समर्थन देता येत नाही."

पंतप्रधान मोदी यांच्या आधी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संसदेला संबोधित केले. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना 'मित्राहून घनिष्ट असा भाऊ' असे संबोधले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय राजकीय दौऱ्यावर इस्रायलला गेले आहेत. राजधानी तेल अवीव येथे पोहोचल्यावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पत्नी सारा यांच्यासह विमानतळावर त्यांचे स्वागत केले.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, ANI

नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदी हे महान भारतीय नेता आहेत असे म्हटले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.