You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हरमनप्रीतची शंभरावी वनडे, भारतीय महिला क्रिकेट संघ वर्षभरानंतर मैदानात
भारतीय महिला क्रिकेट संघ वर्षभरानंतर मैदानात उतरला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेला रविवारपासून लखनौ इथे सुरुवात झाली.
भारताची धडाकेबाज बॅट्समन हरमनप्रीत कौरची ही शंभरावी वनडे आहे. हा महत्त्वपूर्ण विक्रम नावावर करणारी हरमनप्रीत पाचवी भारतीय महिला क्रिकेटपटू आहे.
याआधी मिताली राज, झूलन गोस्वामी, अंजूम चोप्रा, अमिता शर्मा यांनी शंभरपेक्षा अधिक वनडे सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.
464 दिवसांच्या सक्तीच्या कोरोना विश्रांतीनंतर भारतीय महिला संघ मैदानावर खेळताना दिसतो आहे. लखनौतल्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर ही मालिका होणार असून, मैदानाच्या एकूण क्षमतेच्या 10 टक्के प्रेक्षकांना याचि देही याचि डोळा मॅच पाहता येणार आहे.
भारतीय संघ या मालिकेत पाच वनडे खेळणार आहे. भारतीय संघाने शेवटची मॅच 8 मार्च 2020 रोजी खेळला होता.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कोरोना नियमावलीचं पालन करत पाकिस्तानचा दौरा केला आहे.
भारतीय निवडसमितीने या मालिकेसाठी शिखा पांडे, तानिया भाटिया आणि वेदा कृष्णमूर्ती यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्वेन्टी-20 प्रकारात तडाखेबंद बॅटिंगसाठी प्रसिद्ध शेफाली वर्माला वनडे संघात स्थान मिळालेलं नाही.
भारतीय महिला संघ रेट्रो जर्सी परिधान करून मैदानात उतरला आहे. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)