You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार, आरोपी कोव्हिड पॉझिटिव्ह
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या आकड्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या 10 लाखांच्या जवळ आली आहे. अशा स्थितीत एका क्वारंटाईन सेंटरमध्येच महिलेवर बलात्कार घडल्याची घटना घडली आहे.
"पनवेलमधील कोव्हिड क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्काराची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केलीये. सद्यस्थितीत हा आरोपी कस्टडीत आहे," असं नवी मुंबई सहपोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी सांगितलं.
या घटनेबाबतची माहिती अशी की आरोपी आणि महिला क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. एका इमारतीत हे सेंटर बनवण्यात आलं आहे. 40 वर्षीय महिला पाचव्या मजल्यावर होती तर आरोपी दुसऱ्या मजल्यावर होता. काही दिवसांआधी त्याने महिलेशी ओळख करुन घेतली. गुरुवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास हा आरोपी महिलेच्या रूममध्ये गेला आणि तिथे त्याने महिलेवर बलात्कार केला.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
आरोपी कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याने त्याला अटक करून पुन्हा क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलं आहे. असं पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी म्हटलं आहे.
आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे.
आरोपीवर कारावई सुरू, चौकशीसाठी समितीची स्थापना
पनवेलमध्ये घडलेला प्रकार अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
तसंच, विलगीकरण केंद्रात महिला आणि पुरुष वेगवेगळे असावेत, अशा सूचना देण्यात आल्या असून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती टोपेंनी दिली.
तसंच, या घटनेतील आरोपीवर कारवाई करण्यात येत असून, पनवेल महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमल्याचंही टोपेंनी सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)