गुजरात कायदामंत्री भूपेंद्र सिंह चुडासमा यांची आमदारकी हायकोर्टाकडून रद्द

गुजरात उच्च न्यायालयाने ढोलका विधानसभा निवडणूक रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. इथून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कायदे आणि शिक्षणमंत्री भुपेंद्र सिंह चुडासमा विजयी झाले होते.

भुपेंद्र सिंह चुडासमा यांनी 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत फक्त 327 मतांनी विजय मिळवला होता.

त्यांच्या विजयाला पराभूत काँग्रेस उमेदवार आश्विन राठोड यांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यांनी मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप केला होता.

याप्रकरणी सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या आदेशानंतर ढोलकाचे रिटर्निंग अधिकारी धवल जानी यांची बदली करण्यात आली होती.

मतमोजणीत फेरफार केल्याचा आरोप

काँग्रेस उमेदवाराच्या मते, मतमोजणीमध्ये फेरफार झाली होती. 429 मतांची मोजणी करण्यात आली नाही.

गुजरात उच्च न्यायालये सुनावणीनंतर निर्णय राखून ठेवला होता.

या विषयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते भरत सोलंकी यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

गुजरातचे कायदेमंत्र्यांना बेकायदेशीरपणे विजयी घोषित करण्यात आलं होतं, असं काँग्रेस नेते शक्तीसिंह गोहिल म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)