कोरोना व्हायरस: MPSC आणि UPSC च्या परीक्षाचं नेमकं काय होणार आहे?

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे MPSC आणि UPSC च्या परीक्षांबदद्ल संभ्रमाचं वातावरण तयार झालं होतं. मात्र दोन्ही आयोगांकडून याविषयी वेळोवेळी स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

MPSC ची परीक्षा सध्या अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे, तर युपीएससीने मुलाखती वगळता अगदी काहीच परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

MPSC तर्फे घेतली जाणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा 5 एप्रिल ला होणार होती. मग ती परीक्षा 26 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. नंतर सात एप्रिलला काढलेल्या एका पत्रकात आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपात्रित गट ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत मात्र त्या रदद् केल्या आहेत.

दोन्ही परीक्षांची नवीन तारीख आयोगाच्या साईटवर जाहीर होतील आणि उमेदवारांना एसएमएसमार्फत कळवण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या वेबसाईटवर वेळोवेळी भेट द्यावी.

लॉकडाऊनचा दुसरा टप्पा जाहीर झाल्यावर 15 एप्रिलला युपीएससीने एक निवेदन जाहीर केलं होतं. देशभरातून लाखो विद्यार्थी नागरी सेवा म्हणजे IAS, IPS या पदांसाठी परीक्षा देतात. ही परीक्षा यावेळी 31 मे ला होणार आहे. ही परीक्षा अद्याप पुढे ढकललेली नाही.

मागच्या वर्षी झालेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या मुलाखतीबाबत 3 मे नंतर विचार केला जाणार आहे. नागरी सेवा म्हणजे आयएएस परीक्षेची तारीख बदलण्यात आलेली नाही. इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस, इंडियन स्टॅस्टिकल सर्व्हिस या परीक्षांची बदललेली तारीख आधीच कळवण्यात आली आहे.

सर्व परीक्षांच्या तारखेत काही बदल झाले तर ते वेळोवेळी वेबसाईटवर टाकण्यात येईल. असं युपीएससीने जाहीर केलेल्या निवेदनात सांगितलं होतं. अधिक माहितीसाठी www.upsc.gov.in ही वेबसाईटला वेळोवेळी बघत राहावी. वयोमर्यादा वाढवण्याबाबत दोन्ही आयोगाने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही. अर्थात त्याबदद्लही वेळोवेळी स्पष्टीकरण देण्यात येईल.

हेही वाचलंत का?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)