You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : जीवनावश्यक सेवांमध्ये नेमकं काय काय येतं?
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवस संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करणार असल्याचं जाहीर केलं
पण देशभरातील किराणा दुकानं, भाजीपाला आणि इतर आवश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये नागरिकांची झुंबड उडाल्याचं दिसून आलं होतं. हे लक्षात घेऊन नरेंद्र मोदी यांनी जीवनावश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहील, असं स्पष्ट केलं.
त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जीवनावश्यक वस्तू आणि सेवा पुरवणारी दुकानं आणि आस्थापनांना लॉकडाऊनमधून वगळण्यात आल्याची माहिती दिली आहे.
लॉकडाऊनमधून वगळण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा यांची यादीच उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
- वाचा - देशभरात 21 दिवस लॉकडाऊन आणि पंतप्रधान मोदींच्या 12 महत्त्वाच्या घोषणा
- वाचा -कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
कोणत्या सेवा जीवनावश्यक सेवांच्या यादीत?
-बँक, एटीएम, विमा आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित कामकाज
-प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया
-माहिती तंत्रज्ञान (आयटी), टेलिकॉम, पोस्ट, इंटरनेट आणि डेटा सर्व्हीस
-पुरवठा यंत्रणा आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक यंत्रणा
-कृषी विषयक वस्तू आणि उत्पादनांची आयात-निर्यात
-ई-कॉमर्स, यामध्ये फक्त जीवनावश्यक वस्तूं, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांची डिलिव्हरी
-खाद्य उत्पादनं, किराणा सामान, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मटण, मासे आणि त्यांची वाहतूक व्यवस्था
-बेकरी उत्पादनं, पशूखाद्य
-हॉटेलांमधील जेवण पार्सलची सोय, घरपोच डिलिव्हरी
-हॉस्पिटल, औषधं, चश्मा दुकाने, औषध उत्पादन, पुरवठा आणि संबंधित वाहतूक
-पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, तेल कंपन्या, संबंधित गोदामं आणि वाहतूक
-कायदा व सुव्यवस्था आस्थापनं, जीवनावश्यक वस्तूंना सुरक्षा पुरवणाऱ्या सर्व सुरक्षारक्षक कंपन्यांची यंत्रणा
-कोव्हीड-19 रोगाविरुद्ध लढण्यासाठी काम करत असलेल्या खासगी आस्थापना
-वरील सर्व यंत्रणांची पुरवठा आणि वाहतूक यंत्रणा
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)