You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : कोव्हिड-19ची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
कोरोना विषाणूच्या फैलावाविषयी अधिकाधिक संशोधन होत आहे. या आजाराविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी अमेरिकेतल्या तज्ज्ञांच्या एका टीमने चीन आणि इतर देशातल्या कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींचा अभ्यास केला.
या व्यक्तींना पाचव्या किंवा त्यापुढच्या दिवशी कोरोनाची लक्षणं दिसली होती.
- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
म्हणजेच कोरोना विषाणुची लक्षणं दिसायला पाच दिवस लागत असल्याचं या अभ्यासात आढळून आल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.
कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोव्हिड-19ने सध्या जगभर थैमान घातलंय. ताप, खोकला आणि श्वास घेताना त्रास होणे, अशी लक्षणं या आजारात दिसून येतात.
ज्या व्यक्तीला 12 दिवसापर्यंत या आजाराची लक्षणं दिसली नाही तिला त्यानंतर ती दिसण्याची शक्यता फार कमी असते. मात्र, अशी व्यक्ती या संसर्गाची कॅरिअर म्हणजेच वाहक असू शकते.
त्यामुळे अशा व्यक्ती ज्या संसर्गाच्या वाहक असू शकतात - आजाराची लक्षणं असो किंवा नसो - त्यांनी स्वतःला 14 दिवसांसाठी विलग म्हणजेच क्वॉरंटाईन करावं, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.
यूके आणि अमेरिकेत मान्य करण्यात आलेली ही मार्गदर्शकं तत्त्वं पाळली तर 14 दिवसांसाठी विलग म्हणजेच क्वॉरंटाईन असलेल्या दर 100 व्यक्तींपैकी बाहेर पडल्यानंतर एका व्यक्तीमध्ये ही लक्षणं आढळू शकतात. Annals of Internal Medicine अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
एकूण 181 केसेसवरून हा निष्कर्ष काढण्यात आल्याचं जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये लीड रिसर्चर असणारे प्रा. जस्टीन लेसलेर यांनी सांगितलं.
मात्र, या विषाणूबद्दल अजून आपल्याला बरंच काही जाणून घ्यायचं असल्याचंही ते म्हणतात.
या संशोधनात एकूण किती जणांमध्ये लक्षणं विकसित होतात, याचा अभ्यास करण्यात आलेला नाही.
तज्ज्ञांच्या मते संसर्ग झालेल्या बहुतांश व्यक्तींना अतिशय अल्प स्वरुपाचा आजार होतो. काही व्यक्ती असिमप्टमॅटिक असू शकतात. असिमप्टमॅटटिक म्हणजे अशा व्यक्ती ज्या संसर्गाच्या वाहक आहेत. मात्र, त्यांना आजाराची लक्षणं दिसत नाहीत.
काही जणांसाठी मात्र हा आजार अतिशय गंभीर आणि प्राणघातकही ठरू शकतो. खासकरून आधीच कुठलातरी आजार असणाऱ्या वृद्धांसाठी कोरोनाचा संसर्ग अधिक गंभीर ठरू शकतो.
कोरोना विषाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर प्रत्यक्ष आजार होण्याचा काळ 14 दिवसांचा असतो, असं या संशोधनातून पुढे आल्याचं युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहममध्ये मॉलिक्युलर व्हायरोलॉजी तज्ज्ञ असणारे प्रा. जोनाथन बॉल सांगतात.
ते पुढे म्हणतात, "लक्षणं नसल्याच्या कालावधीत म्हणजेच असिमप्टमॅटिक कालावधीत संसर्गाचा फैलाव होत असल्याचे ठोस पुरावे नाहीत."
खोकला आणि तापाची लक्षणं असतील तेव्हाच संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.
आजाराची लक्षणं प्रत्यक्ष दिसण्यापूर्वी विषाणुचा थोड्याप्रमाणात फैलाव होऊ शकतो. मात्र, विषाणुच्या फैलावाच्या हा मुख्य मार्ग मानला जात नाही.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी काय कराल?
- आजारी व्यक्तींच्या फार जवळ जाऊ नका.
- हात न धुता तोंड, नाक, डोळे, कान यांना स्पर्श करू नका.
- शिंकताना आणि खोकलताना टिशू पेपर वापरा. वापरून झाल्यावर तो कचरापेटीत टाकून हात स्वच्छ धुवा.
- साबणाने नियमित हात धुवा.
हेही नक्की वाचा -
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)