लॉकडाऊन: काय सुरू राहणार, काय बंद होणार?

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. 24 तारखेच्या मध्यरात्रीपासून 21 दिवसांकरता म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू असेल. या काळात जीवनावश्यक सेवा सुरू राहतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काय राहणार सुरू?

  • बँका,एटीएम, इन्शुरन्स कंपन्या आणि वित्तसंस्था
  • प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमं
  • आयटी, टेलिकॉम, मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर, पोस्ट, इंटरनेट आणि डेटा सेवा
  • जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा आणि ने-आण करणाऱ्या संस्था
  • शेतीच्या उत्पादनांची आयात व निर्यात करणाऱ्या संस्था
  • अन्न,औषधं आणि किराण्याची डिलिव्हरी करणाऱ्या इ-कॉमर्स,ऑनलाईन डिलिव्हरी सेवा
  • दूध, भाजी, फळ,बेकरी मांस, मासे,अंडी विकणारी दुकानं, ते साठवणारी गोदामं आणि त्यांच्या दळणवळण सेवा
  • प्राण्यांचे दवाखाने
  • पेट्रोल पंप, घरगुती गॅस पुरवणाऱ्या संस्था,तेलकंपन्या,त्यांची गोदामं आणि दळणवळण व्यवस्था
  • वर दिलेल्या संस्थांना मदत करणाऱ्या संस्था
  • फक्त औषधं बनवणाऱ्या फार्मा कंपन्या, दुध, दुग्धजन्य पदार्थ बनवणारे युनिट्स,डाळ आणि तांदळावर प्रक्रिया करणारे युनिट्स, आणि जनावरांसाठी चारा बनवणाऱ्या संस्था चालू राहतील.
  • सगळी सरकारी ऑफिसेस, दुकानं आणि संस्था कमीत कमीत कर्मचारी वृंदासह चालू राहतील. मात्र दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी ३ फुटांचे अंतर हवे. अशा ठिकाणी हात धुण्याची सुविधा तसंच हँड सॅनिटायझर हवे.

काय होणार बंद?

  • राज्य परिवहन सेवा, खाजगी बस, मेट्रो, लोकल बंद करण्यात आल्या आहेत.दोन प्रवाशांपेक्षा अधिक व्यक्तींची ने-आणि टॅक्सीने करता येणार नाही,तर रिक्षात फक्त एका प्रवाशासाठी परवानगी आहे. तसंच खाजगी गाड्यांना जीवनावश्यक गोष्टींची खरेदी आणि आरोग्यविषय समस्या यासाठीच रस्त्यावर येण्याची परवानगी आहे पण गाडीमध्ये फक्त ड्रायव्हर आणि एक व्यक्ती यांनाच प्रवास करता येईल.
  • सगळ्या नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे. फक्त अत्यावश्यक सेवा मिळवण्यासाठीच त्यांना बाहेर पडता येईल.त्यासाठी बाहेर पडल्यानंतरही त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील.
  • होम क्वारंटिन असणाऱ्या लोकांना त्याचे नियम पाळावे लागतील.त्यांचे उल्लंघन केल्यास दंड किंवा शिक्षेची तरतूद आहे,तसंच या व्यक्तींना सरकारी क्वारंटिन कक्षात ठेवण्यात येईल.
  • पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी आहे.
  • सगळी दुकानं, ऑफिसेस, कंपन्या, मॅनिफॅक्च्युरिंग युनिट्स बंद राहतील.
  • सगळी प्रार्थनास्थळं सर्वसामान्यांसाठी बंद राहतील. पुजाऱ्यांना आतमध्ये पुजा करण्याची किंवा धर्मगुरूंना धार्मिक विधी पार पाडण्याची परवानगी असेल.

संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक गोष्टींची कमतरता होणार नाही यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय राखून युद्धपातळीवर काम सुरू असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)