Indian Air Force: भारतीय वायुसेना - आता तुम्हीच व्हा विंग कमांडर अभिनंदन, वायू दलाचा नवा मोबाईल गेम लॉन्च

एअरफोर्स

फोटो स्रोत, YouTube

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

विंग कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डर ओलांडून भारतात परतल्यानंतर भारतीय वायू दलाबद्दल तरुणांच्या मनात कुतुहल निर्माण झालं होतं. आणि याच कुतुहलाचा फायदा घेत भारतीय हवाई दलाने लाँच केलाय एक कॉम्बॅट मोबाईल गेम. 'इंडियन एअर फोर्स : अ कट अबव्ह' (Indian Air Force : A Cut above).

हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बीएस धनोआ यांनी हा गेम लाँच केला आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

हा फ्लाईट बॅटल सिम्युलेटर धर्तीवरचा गेम आहे. म्हणजे यामध्ये तुम्ही वैमानिक आहात आणि भारतीय हवाई दलाच्या पायलटची भूमिका निभावत तुम्हाला लढाई करायची आहे.

सध्या हा गेम सिंगल प्लेयर मोडमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे तुम्हाला या सगळ्या मिशन्सवर एकट्यानेच जायचंय. पण ऑक्टोबरमध्ये या गेमची मल्टी प्लेयर व्हर्जनही लाँच होणार आहे, जिथे तुम्ही इंटरनेटवरील इतर कोणाच्या तरी सोबतीने मोहीम पार पाडू शकता.

गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल प्लेस्टोअरमध्ये हा गेम उपलब्ध आहे.

गेमच्या सुरुवातीला तुम्हाला एक ट्रेनिंग मॉड्यूल मिळेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या फोनचा वापर करत टेक-ऑफ करणं, टार्गेटवर हल्ला करणं आणि लँडिंग करायला शिकवलं जाईल.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

हे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला तुमचे 'विंग्स' मिळतील. ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर या गेममधील 10 'हाय ऍक्शन मिशन्स'मध्ये तुम्ही खेळू शकता. एक मिशन तुम्ही तीन स्टार्स मिळवून पूर्ण केलंत, की मगच पुढचं मिशन अनलॉक होईल.

नेहमीच्या कॉम्बॅट गेम्सपेक्षा हा खेळ काहीसा वेगळा आहे. कारण यामध्ये नुसती मारधाड नाही. टेकऑफ करून धडाधड फैरी झाडत शत्रूला संपवणं - इतकीच या गेमची गोष्ट नाही.

प्रत्येक मिशनची वेगळी कहाणी आहे, वेगळी परिस्थिती आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये भारतीय हवाई दल नेमकं काय करतं, हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यातून करण्यात येतोय.

YouTube

फोटो स्रोत, YouTube

या मिशन्समध्ये नैसर्गिक आपत्ती दरम्यान मदत पोहचवण्याचं आव्हान आहे, सर्जिकल स्ट्राईक आहे, बचावात्मक पवित्रा घेऊन पार पाडायची मोहीम आहे, सीमेजवळच्या युद्ध सुरू असणाऱ्या भागापर्यंत रसद पोहोचवण्याचं काम आहे, जमिनीवर लढणाऱ्या दलांना साथ देण्याचं आव्हान आहे, हवेतल्या हवेत 'रि-फ्युएलिंग' म्हणजे एका विमानातून दुसऱ्या विमानात पेट्रोल भरण्याचं कसब साध्य करायचं आहे

ईझी - मिडमिय आणि हार्ड अशा तीन काठिण्य पातळ्यांवर या मिशन्समध्ये सहभागी होता येईल.

यामध्ये गेमर्सना हवाई दल वापरत असलेली वेगवेगळी विमानं आणि हेलिकॉप्टर्स उडवता येतील. आणि हवाई दल वापरत असलेल्या विविध विमानांची, शस्त्रांची, डावपेचांची माहितीही मिळेल.

फ्री फ्लाईट पर्यायमध्ये तुम्हाला हवाई दलाकडची विविध विमानं - हॉक, Mi-17, C 17, Apache, मिराज 2000, रफाल, सुखोई ही विमानं उडवण्याचा अनुभव घेता येईल.

या गेमची आणखी एक खासियत म्हणजे यातलं मुख्य कॅरेक्टर हे थेट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासारखं दिसणारं आहे. हवाई दलाने काही दिवसांपूर्वी जेव्हा या गेमचा टीझर लाँच केला होता, तेव्हा देखील हे कॅरेक्टरयामध्ये उठून दिसत होतं.

YouTube

फोटो स्रोत, YouTube

या गेमचा लेआऊट अगदी सोपा आहे. गेम सुरू केल्यानंतर डाव्या बाजूला खाली तीन पर्याय आहेत.

पहिल्या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला हवाई दलातल्या करिअरच्या संधींविषयीची माहिती मिळेल.

दुसऱ्या ऑप्शनवरून हवाई दलाविषयीची माहिती मिळेल आणि तिसऱ्यावर हा गेम डेव्हलप करणाऱ्यांविषयीची माहिती आहे.

उजवीकडे तीन उभे पर्याय आहेत - ट्रेनिंग, सिंगल आणि फ्री फ्लाईट.

वरच्या बाजूला असणाऱ्या माणसाच्या खुणेवर क्लिक करून लॉग-इन करता येईल. हे करून तुम्हाला तुमच्या कॅरेक्टरचं कस्टमायझेशन करता येईल. आणि प्रत्येक मिशन पूर्ण केल्यानंतर मिळणारे बॅजेस तुम्हाला तुमच्या युनिफॉर्मवर लावता येतील.

सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही कॅलिबरेशन आणि ग्राफिक सेटिंग्स करू शकता.

YouTube

फोटो स्रोत, YouTube

गेमदरम्यान विविध कॅमेरा एँगल्स वापरून तुम्ही आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेऊ शकता. प्रत्येक एअरक्राफ्टसाठी वेगवेगळी आयुधं उपलब्ध आहेत. तुमच्या स्क्रीनवर येणारा संदेश वाचून त्यानुसार तुम्हाला प्रत्येक मिशनमध्ये काम करायचं आहे.

हा गेम डाऊनलोड तब्बल 279 MBचा आहे. गेमची ग्राफिक्स चांगली आहेत. हौशी गेमर्सना हा गेम आवडण्यासारखा आहे. पण हार्ड-कोअर गेमर्सची मात्र यातून काहीशी निराशा होऊ शकते. कारण यापेक्षा उत्तम ग्राफिक्स इफेक्ट्स, कंट्रोल्स आणि साऊंड इफेक्ट्स असणारे गेम्स बाजारात उपलब्ध आहेत.

व्हीडिओ कॅप्शन, PUBG काय आहे? - पाहा व्हीडिओ

अर्थात या गेममध्ये यापुढेही अनेक अपडेट्स येतील. शिवाय ऑक्टोबरमध्ये मल्टी-प्लेयर व्हर्जन लाँच होणार असल्याचं सांगण्यात येतंय. याशिवाय बालाकोट सर्जिकल स्ट्राईक मिशनही या गेममध्ये उपलब्ध होणार असल्याचं टीझर लाँच करताना सांगण्यात आलं होतं.

यापूर्वी 2014मध्ये भारतीय हवाई दलाने 'गार्डियन्स ऑफ द स्काईज' नावाचा गेम लाँच केला होता जो आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त वेळा डाऊनलोड करण्यात आलेला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)