गेम खेळतो म्हणून पोलिसांनी पकडलं

फोटो स्रोत, Getty Images
दक्षिण कोरिया प्रोफेशनल गेमिंगची मोठी बाजारपेठ आहे. इथल्या गेमिंग उद्योगाची उलाढाल ५ अब्ज डॉलर्सच्या वर गेली आहे. पण, इथली नवी पिढी गेमिंगच्या आहारी गेली असून ही मुलं तासन् तास गेम खेळण्यात घालवतात. चोई नावाच्या मुलानं सलग ९६ तास गेम खेळल्यानं त्याला पोलिसांनी पकडून थेट हॉस्पिटलमध्ये नेलं.
दक्षिण कोरियातली मुलं अनेक तास गेम खेळत असल्याने त्यांना मानसिक आजार ग्रासत आहेत. गेमिंगच्या नादात ही मुलं रात्रीचं जेवणही टाळताना दिसतात. यावर उपाय म्हणून त्यांच्यावर 'डिजीटल डिटॉक्स ट्रीटमेंट' म्हणजेच गेमिंगच्या व्यसनापासून दूर जाण्याचे उपचार करावे लागत आहेत.
हे गेमिंगचं व्यसन नेमकं कोणत्या पातळीवर पोहोचलं आहे आणि ते घालवण्यासाठी काय करावं लागतं याची माहिती तुम्हाला खाली दिलेल्या बीबीसी विश्वच्या बुलेटीनमधून जाणून घेता येईल.
बीबीसी विश्व बुलेटीन तुम्ही सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.०० वाजता मोबाईलवर जिओ टीव्ही अॅपवर पाहू शकता.
बीबीसी विश्व बुलेटीन पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)




