भाजपचं सगळंच स्वीकारलं नाही, आमची वेगळी विचारधारा -सुजय विखे पाटील : बीबीसी मराठी राऊंड अप

बीबीसी मराठीवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे:

1. सुजय विखे-पाटील : सोयीचं राजकारण करत नाही, आमच्या घराण्याची वेगळी विचारधारा

"मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याने माझे वडील माझ्याशी बोलत नाहीत. पण मी वेळेवर त्यांना माझा निर्णय पटवून देईन" असं म्हणत सुजय विखे-पाटील यांनी आपल्या भाजपा प्रवेशाचं समर्थन केलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर सुजय विखे-पाटील यांनी बीबीसीला पहिल्यांदा मुलाखत देताना आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ते नेमके काय म्हणाले हे वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

2. रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या वाटेने जाणार?

महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी हे ट्वीट केलं असलं, तरी आव्हाड यांच्या पक्षालाही सावध रहावं लागेल अशी चिन्हं आहेत.

कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हेदेखील भाजपच्या वाटेनं जाऊ शकतात, अशी चर्चा आहे. ही संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

3. मोदींनी एअर स्ट्राइकच्या दिवशी अदानी-अंबानींना विमानतळांची कंत्राटं वाटली - राहुल गांधी

जेव्हा आपले एअरफोर्सचे पायलट पाकिस्तानमध्ये कारवाई करून आले त्याचदिवशी (26 फेब्रुवारी) गौतम अदानींना 5 विमानतळांच्या देखभालीचं काँट्रॅक्ट मिळालं, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

गुजरातच्या गांधीनगरमध्ये काँग्रेसची सभा झाली. त्यावेळी राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार आल्यानंतर आम्ही त्वरित कर्जमाफी केली. पण भाजपनं तसं केलं नाही, असं ते म्हणाले. राहुल गांधींनी आणखी काय टीका केली आहे हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

4. मसूद अझहरच्या सुटकेमध्ये अजित डोभालांची नेमकी काय भूमिका होती?

पुलवामा हल्ल्याला जबाबदार असलेल्या मसूद अझहरला देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे स्वत: कंदाहारला सोडण्यासाठी गेले होते, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

सोमवारी दिल्लीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत राहुल गांधी म्हणाले की, "पुलवामात बसमध्ये कुणी स्फोट घडवून आणला? अर्थात जैश ए मोहम्मदचा मसूद अझहर. तुम्हाला आठवत असेल की 56 इंचाची छाती असणाऱ्यांच्या आधीच्या सरकारच्या काळात आज जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत ते अजित डोभाल स्वत: विमानात मसूद अझहरच्या शेजारी बसून त्याला कंदाहारला सोडून आले होते."

पण या संपूर्ण प्रकरणात अजित डोभाल यांची भूमिका काय होती हे वाचण्यासाठ इथे क्लिक करा.

5. उत्तर कोरिया निवडणूक: किम जाँग उन यांचे खासदारांच्या यादीत नावच नाही

उत्तर कोरियामध्ये निवडणुका पार पडल्या. किम जाँग उन यांच्या पक्षाचे 100 टक्के खासदार संसदेत निवडून गेले आहेत. पण यावेळी मात्र किम जाँग उन यांचे खासदारांच्या यादीत नावच नाही.

ही निवडणूक केवळ एक औपचारिकता आहे, असं म्हटलं जातं. नावापुरतं का होईना पण किम जाँग उन हे संसदेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहतात.

पण यावेळी मात्र त्यांचे खासदारांच्या यादीत नावच नाही. ही संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)