नरेंद्र मोदींनी ट्वीट केलेल्या सिंहाच्या फोटोमागची कहाणी...

    • Author, दीपक चुडासमा
    • Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी

आशियाई सिंहाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रीट्वीट केलाय. या फोटोची स्तुती करताना पंतप्रधानांनी म्हटलं, "गीरमधला शानदार सिंह. सुंदर फोटो."

या फोटोत एक तरूण सिंह झाडावर चढलेला दिसत आहे. बीट गार्ड दीपक वाढेर यांनी हा फोटो काढला आहे. बीबीसी गुजरातीनं बीट गार्ड दीपक वाढेर यांच्याशी संवाद साधला आणि या व्हायरल फोटोबद्दल विचारलं.

हा फोटो नेहमीच्या गस्तीच्या वेळी घेण्यात आला आहे, अशी माहिती जुनागढ विभागातील उप वनसंरक्षक डॉक्टर सुनील कुमार बेडवाल यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना केली. "बीट गार्ड दीपक वाढेर नेहमीप्रमाणे गस्त घालण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना सिंह दिसला. दीपक यांनी लगेचच फोटो काढला," असं बेडवाल यांनी म्हटलं.

दीपक यांनी कामाचा भाग म्हणून हा फोटो घेतल्याचं बेडवाल यांनी सांगितलं. ते नेहमी वन्य प्राण्यांचे फोटो घेत असतात.

'सिंह जणू फोटोसाठीच उभा होता'

या फोटोबद्दल सांगताना दीपक यांनी म्हटलं, ज्या झाडावर वाघ उभा होता, ते फार उंच नव्हतं. त्यामुळे लो अँगलनं हा फोटो काढण्यात आला आहे, जेणेकरून झाड खूप उंच वाटेल.

हा फोटो जुनागढमधल्या गीर अभयारण्यात घेण्यात आला आहे. हे अभयारण्य जवळपास 100 किलोमीटरच्या परिसरात पसरलं आहे.

2015 मधील जनगणनेनुसार या अभयारण्यात जवळपास 33 सिंह आहेत.

बीट गार्ड दीपक वाढेर यांनी सांगितलं, की गीर अभयारण्यात गस्त घालत असतानाच मी एक सिंह पाहिला. थोड्याच वेळात हा तरूण सिंह झाडावर चढला.

"सिंह जणू फोटो काढण्यासाठीच उभा राहिल्याप्रमाणे दिसत होता. त्यामुळं मी लगेचच माझा कॅमेरा सुरू करून फोटो काढला."

"हा फोटो काढून बराच काळ लोटलाय. मात्र तो आता व्हायरल व्हायला लागलाय. मला फोटोग्राफीचा छंद आहे. आणि मी दुसऱ्या प्राण्यांचेही फोटो काढतो. माझं काम प्राण्यांचं आणि जंगलाचं रक्षण करणं आहे. सिंहाच्या येण्याजाण्यावरही मी लक्ष ठेवून असतो."

ते सांगतात, की मी वन खात्यातच असल्यानं फोटोग्राफीचा छंद जोपासणं माझ्यासाठी सोपं आहे. मला ते मनापासून आवडतं.

जुनागढमधील गीर राष्ट्रीय उद्यानात यावेळी 500 हून अधिक सिंह आहेत. इथं सिंहांची संख्या खालीलप्रमाणे-

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)