You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पॉर्न साइटच्या बंदीवर वाचक जेव्हा मोकळेपणानं मत मांडतात...
केंद्र सरकारने नुकतीच 827 पॉर्न साइटवर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे लैंगिक अत्याचार कमी होतील असं सांगण्यात येत आहे.
पॉर्न साइटवर बंदी घातल्याने देशात होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना कमी होतील का? असा प्रश्न बीबीसी मराठीच्या वाचकांना 'होऊ द्या चर्चा'मध्ये विचारला. त्यापैकी काही वाचकांची ही निवडक आणि संपादित मतं-
पॉर्न साइट बंद केल्याने लैंगिक अत्याचाराला चाप लागणार नाही, असं वृशाली प्राजक्त यांना वाटतं. त्या लिहितात, "(पॉर्न साइट बंद करणं) हा वरवरचा उपाय आहे, ज्याने काहीच साध्य होणार नाही. त्यापेक्षा लैंगिक शिक्षण योग्य वयात आणि योग्य पध्दतीने दिल्यास निश्चित फरक पडेल. विचारसरणी आणि दृष्टी बदलणे महत्त्वाचे."
वृषाली प्राजक्त यांच्या मतावर प्रतिक्रिया देत, उमेश अधिकारी म्हणतात, "योग्य वयात लैंगिक शिक्षण आणि पॉर्न साइटस वर बंदी या दोन्ही गोष्टी अंमलात आणल्या तर ते जास्त फायदाचं ठरणार नाही का?"
या निर्णयामुळे पॉर्न बघणं बंद होणार नाही, असं अजिंक्य दंडवते यांचं म्हणणं आहे. "पॉर्न साईट बंद केल्या म्हणजे पॉर्न बंद झाले असे नाही. अशा चित्रफीतींचा अनधिकृत साठा असणारे अनेक लोक आहेत. त्याचा व्यवसायही केला जातो. आता हा व्यवसाय वाढेल. अत्याचार कमी होतील हे सांगता येणार नाही, पण विकृती नक्कीच कमी होईल."
सागर नाईक सातार्डेकर लिहितात, "बघायला काय हरकत आहे ? मी गेली चार महिने पॉर्न पूर्ण बंद करून एक विलक्षण आनंद जीवनात अनुभवतो आहे."
अभिजित यांना ही बंदी योग्य वाटत नाही. "आज पॉर्नवर बंदी घालण्यात आली आहे उद्या महिलांनी कपडे कोणते घालावेत हेही सरकार सांगेल, कारण तोडके कपडे घातले तर अत्याचार होतात असे सांगितले जाईल. जखमा पायांना उपचार डोक्याला..."
"नैतिक मुल्यांचं अधःपतन यास कारणीभूत आहे, कितीही ठिगळं लावून हे झाकणारं नाही. हे म्हणजे असं झालं, फाटलं की लाव ठिगळ अन् फुटलं की चिकटपट्टी, नैतिक शिक्षण आणि संस्कार हे आपलं वडिलोपार्जित ऐश्वर्य, हे जिथं थांबलं तिथं असले हजारो उपायही कामाचे नाहीत," असं गणेश नरवणे म्हणतात.
बंदीचं स्वागत करत रमेश पाटील लिहितात, "काही लोक सतत अशा साईट्स मध्ये गुंतलेले असतात अशा लोकांना या विचारसरणीतून बाहेर काढण्यात ही बंदी नक्कीच उपयोगात येईल. स्वातंत्र्य असावे पण त्याचा अतिरेक झाला तर तो स्वैराचार होतो. राहिला प्रश्न व्यक्तिस्वातंत्र्यचा तर मग काही साइट्सवर age proof properly घेऊन रात्री 10 नंतर दाखवू शकता."
अश्विनकुमार शिला रमेश लिहितात, "चार भिंतींच्या आत कोणी काय बघावं हा प्रत्येकाच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. राहिला प्रश्न लैंगिक अत्याचार कमी होण्याचा तर त्यासाठी वासनांध मानसिकता जबाबदार आहे. आपण जो पर्यंत मानसिकतेत बदल करत नाही आणि स्त्रीकडे एक भोग वस्तू म्हणुन न बघता एक व्यक्ती म्हणून बघत नाही तो पर्यंत अत्याचार कमी होणार नाही."
"(लैंगिक अत्याचाराला) होय काही प्रमाणात पॉर्न साईट सुद्धा जबाबदार आहेत. पॉर्न साईट पाहून भावनांचा उद्रेक हा होणारच आणि त्यातूनच बलात्कार घडतात," असं नरेश चव्हाण यांचं मत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)