You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भीमा कोरेगाव : फटांगडे मृत्यू प्रकरणात व्हीडिओ उपलब्ध - पोलिसांचा दावा
भीमा कोरेगाव इथं झालेल्या हिंसाचारात राहुल फटांगडे याचा मृत्यू प्रकरणी एक व्हीडिओ मिळाल्याचा दावा पोलिसांनी केला असून 4 संशयितांचे फोटो पोलिसांनी प्रसिद्ध केले आहेत. या आणि इतर मोठ्या बातम्यांचा शुक्रवारचा राउंड अप -
1. भीमा कोरेगाव : फटांगडे यांच्या मृत्यू प्रकरणी व्हीडिओ मिळाल्याचा पोलिसांचा दावा
या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारीला भीमा कोरेगाव (जिल्हा पुणे) इथं आयोजित शौर्य दिवस कार्यक्रमावेळी झालेल्या हिंचारात शिरूर येथील राहुल बाबाजी फटांगडे (30) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात CIDने एक व्हीडिओ मिळाल्याचा आणि त्यात राहुल यांचा खून होत असल्याचे दिसत असल्याचा दावा CIDने केला आहे.
पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्हीडिओच्या आधारे फटांगडे यांना मारहाण करणाऱ्यांचे फोटो मिळवले असल्याचे म्हटले आहे. हे फोटो पोलिसांनी प्रसिद्धीसाठी दिले असून या संशयितांची माहिती देण्याचे आवाहन केले आहे. माहिती देणाऱ्यांना बक्षिस देण्यात येईल असं ही पोलिसांनी म्हटले आहे. फटांगडे यांच्या मृत्यू प्रकरणात आतापर्यंत 3 जणांना अटक झाली आहे.
2. एसटी संपामुळे प्रवाशांचे हाल
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. एसटीसाठी वाट पाहात असलेल्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीला तोंड द्यावे लागले. बीबीसी मराठीने दादरच्या बसस्टँडवर आणि राज्यातील विविध ठिकाणी संपामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचं बीबीसी मराठीने केलेलं कव्हरेज.
3. अमित शहा-उद्धव ठाकरे भेटीचं गूढ आणि शिवसेनेची मजबुरी
'शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या महाराष्ट्राच्या सत्तेत भागीदार असलेल्या दोन पक्षांमध्ये गेली दोन-तीन वर्षं सुरू असलेल्या खडाखडीची अखेर शिवराज्यभिषेक दिनाच्या मुहूर्तावर झाली, जेव्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी 'मातोश्री' या शिवसेनेच्या गडावर जाऊन पायधूळ झाडली.'
उद्धव ठाकरे आणि शहा यांच्या भेटीचं ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी केलेले विश्लेषण इथं वाचा.
4. क्वांटिको : भारतीय राष्ट्रवाद्यांना दहशतवादी दाखवल्यामुळे प्रियंका चोप्रा वादात
अभिनेत्री प्रियंका चोप्राची प्रमुख भूमिका असलेली क्वांटिको ही सिरियल सध्या वादात सापडली आहे. या सिरियलमध्ये भारतीय राष्ट्रवाद्यांना दहशतवादी दाखवण्यात आल्याने हा वाद सुरू झाला आहे.
या संदर्भातील सविस्तर बातमी इथं वाचू शकता.
5. डोकं शरीरावेगळं केलेल्या सापानं त्याचा घेतला चावा
विषारी सापाच्या वेगळं केलेल्या डोक्याने चावा घेतल्याने टेक्सासमधील एक व्यक्तीला विषबाधा झाली आहे. यासाठी या व्यक्तीला 26 इंजेक्शनं घ्यावी लागली. या व्यक्तीवर गेले एक आठवडा उपचार सुरू आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा.