You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोकं शरीरावेगळं केलेल्या सापानं त्याचा घेतला चावा
एका माणसाने एका विषारी सापाला मारलं. त्याचं डोकं धडावेगळं झालं आणि त्याची विल्हेवाट लावणार, तोच त्या सापाने या माणसाचा चावा घेतला.
या व्यक्तीला विषबाधा रोखण्यासाठी 26 इंजेक्शनं द्यावी लागली.
टेक्सासमध्ये राहणाऱ्या जेनिफर स्टक्लिफ यांच्या पतीबरोबर ही घटना घडली आहे. त्यांनी KIII-TV या स्थानिक प्रसारमाध्यमांना या घटनेविषयी माहिती दिली.
स्टक्लिफ यांनी सांगितलं की त्यांचे पती जेरेमी बागकाम करत असताना त्यांना 1.25 मीटर लांबीचा विषारी साप दिसला. त्यांनी त्या सापाचं डोकं कापून वेगळं केलं. तो अमेरिकेत आढळणारा विषारी rattlesnake होता. सरपटताना या सापाच्या शेपटीचा आवाज येतो.
जेव्हा सापाचे उरलेले तुकडे जेव्हा ते कचऱ्यात टाकायला गेले तेव्हा सापाच्या मुंडक्यात थोडा जीव होता. अर्थात साप मेल्यावरही पुढच्या अनेक तासापर्यंत त्याच्या प्रतिक्षिप्त क्रिया सुरू असतात.
त्याने जेरेमी यांच्या हाताला चावा घेतला. जेरेमी झटके देऊ लागले, तेव्हा मी लगेच अँब्युलन्सला फोन केला, असा जेनिफर यांनी सांगितलं.
त्यांना एअर अँम्बुलन्सच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात आलं आणि CroFab हे विषबाधा रोखणारं इंजेक्शन देण्यात आलं.
त्यांच्यावर गेल्या एक आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या किडनी कमी क्षमतेने काम करत आहे.
अरिझोना विद्यापीठातील VIPER इन्स्टिट्यूटचे डॉक्टर लेस्लि बॉयर यांनी सापांना न मारण्याचा सल्ला दिला आहे. विशेषत: त्यांचे तुकडे करू नये, असं ते सांगतात.
"हा प्राण्यांप्रति क्रूरपणा आहे. शिवाय, जे छोटे छोटे तुकडे उरतात तेही विषारी असतात," असं त्यांनी गिझ्मो वेबसाईटला सांगितलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)