You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
#BBCNewsPopUp @ कर्नाटक : तुम्ही एक दिवसाचे मुख्यमंत्री झालात तर काय कराल?
- Author, शालू यादव
- Role, बीबीसी प्रतिनिधी
'नायक' हा तुम्ही पाहिलाच असेल. यात अभिनेता अनिल कपूर राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून एक दिवस राज्याचा कारभार चालवण्याचं आव्हान स्वीकारतो. तो अवघ्या २४ तासांत तो राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेवर आपली पकड मिळवतो आणि लोकांची मनं जिंकतो. आणि चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये तो पुन्हा दीर्घकालीन मुख्यमंत्री बनतो!
चित्रपट पाहत असताना आपल्यालाही या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. आणि तुम्हीही एकदा तरी हा विचार केलाच असेल - "मी एक दिवसाचा मुख्यमंत्री झाल्यास काय करेन?"
कारण एखाद्या महत्त्वाच्या पदावर राहून आदेश देण्याचं काम करायला कोणाला नाही आवडणार?
#BBCNewsPopUp च्या टीमनं बेंगळुरूमधल्या नागरिकांना अशीच काहीशी संधी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसण्याची एक दिवस संधी मिळाल्यास तुम्ही कोणत्या प्रश्नांकडे प्रामुख्यानं लक्ष द्याल, असा प्रश्न या टीमनं इथल्या नागरिकांना विचारला.
पण आम्ही लोकांना या खुर्चीत बसण्याची विनंती करण्याआधी आजू-बाजूला उपस्थित असलेल्या गर्दीतून एकच आवाज आला. सगळ्यांनीच आम्हाला प्रश्न केला की - बीबीसी कन्नड भाषेत सेवा कधी सुरू करणार आहे?
बीबीसीने भारतात बीबीसी हिंदी या जुन्या सेवेसह बीबीसी , बीबीसी मराठी, बीबीसी गुजराती, बीबीसी पंजाबी या नव्या सेवा सुरू केल्या आहेत.
बीबीसी कन्नड सेवाही कदाचित कालांतराने सुरू होईल. पण आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. तो म्हणजे, असे कोणते विषय आहेत ज्यामुळे हे कर्नाटक सतत चर्चेत असतं, याच्या आम्ही शोधात आहोत.
एक दिवसासाठी मुख्यमंत्री झालात तर तुम्ही काय कराल या आपल्या प्रश्नाकडे आपण पुन्हा वळूयात. या प्रश्नावर बेंगळुरूमधल्या नागरिकांनी पुढील विषयांशी निगडीत समस्या वाचल्या -
वाहतूक
बेंगळुरूमध्ये होणारी वाहतूक कोंडी इथला ज्वलंत विषय असून गर्दीच्या वेळांमध्ये शहरांतली वाहतूक जवळपास ठप्प झालेली असते.
एका अहवालानुसार, बेंगळुरूमधला सामान्य नागरिक वर्षातले २४० तास वाहतूक कोंडीत घालवतो. नोकरीचं ठिकाण लांब असल्यानं तिथे पोहोचण्यास या वाहतुकीमुळे उशीर होतो, असं काहींनी सांगितलं.
अनेकांनी या कारणामुळे आपल्या नोकऱ्याही सोडल्या. ज्या लोकांनी #BBCNewsPopUp च्या एका दिवसासाठी मुख्यमंत्री होण्यासाठीच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला, त्यांतल्या प्रत्येकाने या समस्येकडे प्राधान्यानं लक्ष देऊ, असं सांगितलं.
मृत्यू पावणारे तलाव
'सिटी ऑफ लेक्स' ही बेंगळुरू शहराची ओळख आहे. मात्र आता हीच ओळख 'सिटी ऑफ बर्निंग लेक्स' अशी होत चालली आहे.
इथल्या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा गोळा झाल्याने तलावाला आगही लागली होती. या आगीमधून अनेकदा विषारी धूरही बाहेर पडतो. कारण कचऱ्यासोबत घातक सांडपाणी मिसळलं गेल्याने त्याची कचऱ्यासोबत प्रक्रिया होऊन हे प्रदूषण होतं.
मेट्रो प्रकल्प वाढीसाठी होणारा उशीर
बेंगळुरू शहराला सर्वाधिक गरज असलेल्या मेट्रो प्रकल्पाची सुरुवात 2006 मध्ये झाली. पण या प्रकल्प स्वतः स्लो ट्रॅकवर गेला आहे.
सध्या दोन मार्गांवर चालणारी मेट्रो दररोज लाखों प्रवाशांना सेवा पुरवते. पण शहरातल्या अन्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने शहरात अन्य मेट्रो मार्ग सुरू होण्याची गरज इथले नागरिक व्यक्त करतात.
प्रथम पादचाऱ्यांसाठी रस्ते नियोजन
एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्यासाठी खुर्चीत बसलेले विनय रस्त्यांच्या समस्यांबाबत बोलत होते. विनय सांगतात की, "मी प्रथम रंस्त्याच्या वापराचा प्राधान्य क्रम बदलेन. वाहनांच्या रस्त्यांच्या नियोजनाआधी पादचारी मार्ग आणि सायकलसाठीच्या मार्गांची उभारणी प्रथम करेन, जेणेकरून सर्वांसाठी रस्त्याचा वापर शक्य होईल."
रस्त्यांचे खड्डे आणि संसाधने
बेंगळुरू शहर तिथल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांसाठी ओळखलं जातं. यातल्या काही खड्ड्यांवरूनही शहरातले महत्त्वाचे रस्ते ओळखले जातात.
जंगलांवरचं अतिक्रमणे
बेंगळुरूमधल्या नागरिकांना इथल्या जंगलांवर होणारं अतिक्रमणही गंभीर वाटतात. गेल्या 19 वर्षांत हे अतिक्रमण पाच पटींनी वाढल्याचं CAGच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.
सर्वांसाठी आरोग्य सेवा
बेंगळुरूमधल्या एका मिशनरी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉ. अर्चना यांच्यासाठी गरिबांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचावी हे महत्त्वाचं आहे. एक दिवसाच्या मुख्यमंत्री झाल्यास सर्वांसाठी स्वस्तात आरोग्य सेवा पुरवण्याचा मी प्रयत्न करेन, असं त्यांनी सांगितलं.
इंग्रजी भाषांची मक्तेदारी मोडीत काढणार
दक्षिण भारतात बहुतांश ठिकाणी इंग्रजी बोलली जाते. पण या भाषेने मूळ भाषेला मागे टाकू नये, असं इथल्या अनेक नागरिकांना वाटतं. एक दिवसाची मुख्यमंत्री झाल्यास इंग्रजी भाषेची मक्तेदारी मोडून काढणार, असं एका तरुणीनं सांगितलं.
बेंगळुरूच्या नागरिकांनी सांगितलेल्या या समस्यांवर #BBCNewsPopUp टीम बातम्या करणार आहे. या काळात आम्ही कर्नाटकातच वास्तव्याला आहोत.
यासाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा. तसंच #BBCNewsPopUp आणि #KarnatakaElection2018 या हॅशटॅगचा वापर करून आमच्याशी संपर्कही करू शकता. कदाचित तुम्ही सांगितलेली बातमी उद्या बीबीसीवर असेल...
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)