सीरियातील इस्लामिक स्टेटच्या तळांवर अमेरिकन लष्कराचा हल्ला, अधिकाऱ्यांची माहिती

सीरियातील इस्लामिक स्टेटच्या तळांवर अमेरिकन लष्कराचा हल्ला

फोटो स्रोत, US Central Command

फोटो कॅप्शन, सीरियातील इस्लामिक स्टेटच्या तळांवर अमेरिकन लष्कराचा हल्ला
    • Author, ग्रेस इलिजा गुडविन

अमेरिका आणि त्यांच्या सहकारी सैन्याने इस्लामिक स्टेटच्या 35 हून अधिक तळांना लक्ष्य केल्याचे वृत्त बीबीसीची सहकारी वृत्तसंस्था CBS न्यूजने दिले आहे.

इस्लामिक स्टेटच्या 35 हून अधिक तळांवर 90 हून अधिक अचूक हल्ले करण्यात आले. या कारवाईसाठी वीस हून अधिक एअरक्राफ्ट वापरण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी CBS न्यूजला दिली आहे.

या हल्ल्यांसाठी F-15E, A-10, AC-130J, MQ-9 तसेच जॉर्डनची F-16 या विमानांचा वापर करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हल्ले नेमके कुठे झाले आणि त्यात किती प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती अद्याप उपलब्ध नाहीये.

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

डिसेंबरमध्ये सिरियाच्या मध्य भागातील पाल्मायरा येथे झालेल्या हल्ल्यात IS च्या बंदूकधाऱ्याने दोन अमेरिकी सैनिक आणि एका अमेरिकी नागरी दुभाष्याची हत्या केल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने प्रथम ऑपरेशन हॉकआय स्ट्राइकची घोषणा केली होती.

याबाबतची आठवण करताना संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी म्हटले की ही गोष्ट आम्ही कदापि विसरणार नाहीत आणि कधीही माघार घेणार नाहीत. शनिवारी लष्करी कारवाई केल्यानंतर हेगसेथ यांनी ट्विटरवर ही प्रतिक्रिया दिली आहे.

'ही युद्धाची सुरुवात नाहीये तर प्रतिशोधाची उद्घोषणा आहे,' असं हेगसेथ यांनी डिसेंबरमध्ये म्हटले होते. ऑपरेशन हॉकआयच्या घोषणेवेळी त्यांनी असं म्हटलं होतं.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वात अमेरिका आपल्या देशातील लोकांचे संरक्षण करण्यासाठी कधीही मागे हटणार नाही, असं ते म्हणाले होते.

नुकताच केलेल्या हल्ल्या आधी डिसेंबर महिन्यातील 20 ते 29 तारखेदरम्यान ऑपरेशन हॉकआय अंतर्गत केलेल्या 11 कारवायांमध्ये इस्लामिक स्टेटच्या 25 सदस्यांना पकडण्यात किंवा ठार करण्यात आल्याची माहिती युएस सेंट्रल कमांड फोर्सेस ( सेंटकॉम) ने दिली होती.

शॉर्ट व्हीडिओ पाहा
व्हीडिओ कॅप्शन, अमेरिकेचा सीरियात इस्लामिक स्टेटवर हल्ला, सेंट्रल कमांडनं जारी केला व्हिडियो

असद यांच्या सत्तेचा ऱ्हास

या ऑपरेशनच्या पहिल्या मोहिमेत 19 डिसेंबर रोजी अमेरिका आणि जॉर्डनच्या सैन्याने इस्लामिक स्टेटच्या तळांवर मोठा हल्ला केला होता. या कारवाईत लढाऊ विमाने, हल्लेखोर हेलिकॉप्टर आणि तोफखान्याचा वापर करण्यात आला. सिरियाच्या मध्य भागातील अनेक ठिकाणी 70 पेक्षा जास्त लक्ष्यांवर हल्ले करण्यात आले, असे सेंटकॉमने सांगितले.

या कारवाईत इस्लामिक स्टेटचे कॅम्प, तसेच शस्त्रागार अशा तळांवर 100 हून अधिक अचूक हल्ले करण्यात आले होते.

2024 मध्ये बशर अल असद यांच्या सत्तेचा ऱ्हास झाल्यानंतर सीरिया देश खिळखिळा बनला आहे. असद यांच्या पतनानंतर गेल्या 13 वर्षांपासून सुरू असलेले गृहयुद्ध संपुष्टात आले आहे.

तेव्हापासून अहमद अल शारा अर्थात अबू मोहम्मद अल जोलानी हे देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहेत. त्यांनीच असद पुरस्कृत बंडखोर गटांना हरवून देशाची सुत्रं हाती घेतली.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.