You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी यांच्या आईची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन यांना बुधवारी (28 डिसेंबर) अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
यावर्षीच 18 जूनला पंतप्रधान मोदी यांनी हीराबेन यांचा 100 वा वाढदिवस साजरा केला होता. आपल्या आईच्या शंभराव्या वाढदिवसासाठी ते गांधीनगरला गेले होते.
हिराबेन यांना 100 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी एक भावूक ब्लॉगही लिहिला होता. त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं, “आज मी माझा आनंद, सौभाग्य तुमच्या सगळ्यांसोबत वाटतोय. माझी आई आज 18 जूनला शंभराव्या वर्षांत प्रवेश करत आहे. म्हणजेच तिचं जन्म शताब्दी वर्ष सुरू होतंय. आज माझे वडील असते, तर गेल्या आठवड्यात तेसुद्धा शंभर वर्षांचे झाले असते.”
पंतप्रधान मोदींनी पुढे लिहिलं होतं, “आज माझ्या आयुष्यात जे काही चांगलं आहे, माझ्या व्यक्तिमत्त्वात जो चांगुलपणा आहे. तो माझ्या आई-वडिलांमुळेच आहे. इथे दिल्लीत असताना कितीतरी जुन्या गोष्टी आठवत आहेत.”
“माझी आई जेवढी सामान्य आहे, तितकीच असमान्यही....प्रत्येकाचीच आई अशी असते. आज मी माझ्या आईबद्दल लिहित आहे, वाचताना तुम्हाला वाटू शकतं की, अरे...माझी आईही अशीच आहे. ती पण असंच वागायची. हे वाचताना तुमच्या मनात तुमच्या आईची प्रतिमा उभी राहील.”
“आईची तपश्चर्याच तिच्या मुलांना एक चांगली व्यक्ती घडवत असते. आईच्या ममतेमुळेच मुलांमध्ये संवेदनशीलता येते. आई एक व्यक्ती नसते, तर व्यक्तिमत्त्व असते. भाव तसा देव अशी आपल्याकडे म्हण आहे. त्याचप्रमाणे तुमच्या मनातल्या भावनांनुसार आईचं स्वरुप तुम्ही अनुभवू शकता,” असं मोदींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हिराबा यांच्या प्रकृतीला आराम मिळावा म्हणून प्रार्थना केली आहे. तसं पत्र त्यांनी ट्विट केलं आहे.
“तुमचं तुमच्या आईवर किती प्रेम आहे याची मला कल्पना आहे. त्यांच्या प्रकृतीला आराम मिळतोय हे वाचून बरं वाटलं. त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी अशी कामना करतो” ते लिहितात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)