बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख

टायटॅनिक जहाज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टायटॅनिक जहाज

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.

आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..

1. टायटॅनिक जहाज बुडाल्यानंतर 110 वर्षं उलटली तरी 'ही' चार रहस्यं कायम

बरोबर 110 वर्षांपूर्वीची ही गोष्ट. टायटॅनिक या जहाजातून प्रवास करणारे बहुतांश प्रवासी तर झोपेतचं होते. त्या अंधाऱ्या रात्री टायटॅनिक हिमनगावर जाऊन आदळलं.

टायटॅनिक इंग्लंडच्या साउथॅम्प्टन येथून 41 किलोमीटर प्रतितास वेगाने अमेरिकेतील न्यूयॉर्ककडे जात असताना हा अपघात घडला. अवघ्या तीन तासातच म्हणजे 14 आणि 15 एप्रिल 1912 च्या मध्यरात्री टायटॅनिक अटलांटिक महासागरात बुडालं.

असं एक जहाज जे कधीच बुडणार नाही अशा चर्चा असायच्या त्याच जहाजाला जलसमाधी मिळाली. या अपघातात सुमारे 1500 लोकांचा मृत्यू झाला. 110 वर्ष उलटून गेली तरी हा सर्वात मोठा सागरी अपघात मानला जातो.

सप्टेंबर 1985 मध्ये या जहाजाचे अवशेष अपघाताच्या ठिकाणाहून हलवण्यात आले. हा अपघात कॅनडापासून 650 किलोमीटर अंतरावर 3,843 मीटर खोलीवर झाला होता. अपघातात जहाजाचे दोन तुकडे झाले आणि दोन्ही भाग एकमेकांपासून 800 मीटर दूर अंतरावर होते.

या दुर्घटनेला 110 वर्षे उलटून गेली मात्र आजही हा अपघात एक रहस्य आहे. बीबीसी न्यूज ब्राझीलने काही तज्ञांशी बोलून या रहस्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला.

2. भारत पाकिस्तान श्रीलंकेत आमनेसामने; जाणून घ्या आशिया कपचं 'हायब्रिड मॉडेल'

क्रिकेटविश्वातली बहुचर्चित अशी अॅशेस म्हणजेच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातली पारंपरिक मालिका सुरू झाली आहे. या मालिकेच्या निमित्ताने बॅझबॉल ही संकल्पना वारंवार चर्चेत आहेत.

क्रिकेटमध्ये ड्यूक्स, एसजी, कुकाबुरा असे वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू वापरले जातात.

ब्रेंडन मॅक्युलम

फोटो स्रोत, Getty Images

आता हा कुठला नवा चेंडू असा विचार तुमच्या मनात येणं साहजिक आहे. पण हा चेंडू नाहीये तर हा खेळण्याचा नवा पवित्रा आहे.

इंग्लंड क्रिकेट संघाने अंगीकारलेला हा पवित्रा म्हणजे बॅझबॉल. जाणून घ्या, इतर संघांना बुचकळ्यात पाडणारं इंग्लंडचं हे नवं तंत्र काय आहे.

3. इलॉन मस्क म्हणतात, ‘मी मोदींचा फॅन’ स्टारलिंकच्या भारतातील गुंतवणुकीवर केला खुलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या तीन दिवसांच्या राजकीय दौऱ्यासाठी अमेरिकेत पोहोचले आहेत.

त्यांनी अमेरिकेत पोहोचल्यानंतर अमेरिकेच्या अनेक मोठ्या उद्योगपती आणि मोठ्या व्यक्तींची भेट घेतली. यात एक नाव इलॉन मस्क यांचंही आहे.

इलॉन मस्क सोशल मीडिया कंपनी ट्विटर, स्पेस कंपनी स्पेसएक्स आणि इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे मालक आहेत.

इलॉन मस्क नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, @DDNEWSLIVE

यावेळी मस्क यांनी टेस्लाच्या भारतात येण्यासंबंधी अनेक गोष्टीही सांगितल्या

त्यांनी पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर पत्रकारांशी चर्चा केली आणि त्यांच्या भेटीबद्दल सविस्तर सांगितलं. त्यांनी हेही सांगितलं की ते भारताचा दौरा कधी करतील.

याशिवाय ट्विटरचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डॉर्सी यांनी भारत सरकारवर नुकतेच जे आरोप केलेत त्याबद्दलही त्यांना विचारलं गेलं.

4. रामचरणने गोठवलं आपल्या बाळाच्या गर्भनाळेतलं रक्त; त्याचा फायदा काय?

दक्षिणतेला स्टार अभिनेता रामचरण आणि त्याची पत्नी उपासना यांना नुकतंच हैद्राबादमधल्या ज्युबिली हॉस्पिटलमध्ये बाळ झालं.

यानंतर उपासनाने ट्वीट करत म्हटलं की नवजात बाळाच्या गर्भनाळेतलं रक्त साठवण्यात आलंय.

रामचरण तेजा

फोटो स्रोत, FACEBOOK/RAM CHARAN

बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि शिल्पा शेट्टी, तसंच नम्रता शिरोडकर यांनी आपल्या बाळांच्या जन्माच्या वेळी गर्भनाळेतलं रक्त गोठवलं होतं.

5. ऑस्ट्रेलियात वाढतोय भारतीय टक्का

रोहित सिंगचा बोलण्याचा टोन त्याच्या आईपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.

रोहितचं कुटुंब मेलबर्नपासून एक तासाच्या अंतरावर असलेल्या मॉर्निंग्टन द्वीपकल्पात राहतं. तो दुसऱ्या पिढीतील स्थलांतरित आहे.

रोहित सिंग त्याच्या बहिणीसोबत अवनी वाईनरी चालवतो.
फोटो कॅप्शन, रोहित सिंग त्याच्या बहिणीसोबत अवनी वाईनरी चालवतो.

त्याचं कुटुंब तिथं बार चालवण्याचं व्यवसाय करतं. गेल्या दोन वर्षांपासून रोहित कुटुंबाच्या व्यवसायात मदत करत आहे.

1990 च्या दशकात त्याचे पालक ऑस्ट्रेलियाला गेले आणि त्यांनी तिथं 'अवनी' नावाची बुटीक वाईनरी सुरू केली.

गेल्या दशकभरात मेलबर्नमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची संख्या झपाट्यानं वाढल्याचं रोहित सिंग सांगतो.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)