जगातले 2 सर्वांत श्रीमंत इलॉन मस्क आणि मार्क झुकरबर्ग खरोखरची कुस्ती लढणार

फोटो स्रोत, Getty Images
इलॉन मस्क आणि मार्क झुकरबर्ग खरोखरच्या कुस्तीच्या आखाड्यात उतरणार आहेत.
मस्क यांनी ट्विरवरून ‘मार्क झुकरबर्ग यांच्याबरोबर मी पिंजऱ्यातली कुस्ती लढू इच्छितो’ असं लिहिलं.
त्याला इंस्टाग्रामवर शेअर करत झुकरबर्ग यांनी ‘स्थळ सांगा’ असं म्हणून आव्हान स्वीकारलं आहे.
फेसबुक, व्हॉट्स ऍप आणि इंस्टाग्रामची मातृकंपनी असलेल्या मेटाच्या प्रवक्त्यांनी बीबीशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
झुकरबर्ग यांचा रिप्लाय पुरेसा बोलका आहे, असं त्यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं आहे.
झुकरबर्ग यांच्या ‘स्थळ सांगा’ या प्रश्नाला उत्तर देत मस्क यांनी ‘वेगास ऑक्टॉगॉन’ हे उत्तर दिलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
वेगास ऑक्टॉगॉन अमेरिकेच्या नवाडा राज्यातल्या लास वेगास शहरात आहे. ते अल्टिमेट फायटींग चॅम्पियनशिपसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.
"माझा एक डाव आहे, त्याला मी 'द वॉलरस' असं नाव दिलंय. मी हा डाव टाकतो तेव्हा फक्त प्रतिस्पर्ध्यावर झोपून राहतो आणि काही करत नाही. मी कधीच व्यायाम करत नाही. अपवाद फक्त मुलांना उचलतो आणि वर उडवून झेलतो तेव्हा," असं मस्क यांनी ट्वीट केलं आहे.
दरम्यान 39 वर्षांच्या झुकरबर्ग यांनी आधीपासूनच ट्रेनिंग सुरू केलं आहे. ते सध्या मिक्स मार्शल आर्ट्सचं ट्रेनिंग घेत असून त्यांनी काही दिवसांपूर्वीच जिउ-जित्सु स्पर्धा जिंकली आहे.
तिकडे ट्विटरने मात्र बीबीसीनं विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणं टाळलं आहे.
पण लोकांनी मात्र सोशल मीडियावर आता याचे मिम्स बनवायला सुरूवात केली आहे.
गेल्या महिन्यात आलेल्या वृत्तानुसार मेटा सध्या ट्विटर सारख्याच एखाद्या प्लॅटफॉर्मच्या निर्मितीवर काम करत आहे. जे मार्केटमध्ये आल्यावर ट्विटरला तगडी स्पर्धा देऊ शकतं.
तसंच हे प्लॅटफॉर्म मेटाच्या इतर म्हणजे इंस्टाग्रामवगैरे अकाउंटशी सलग्न करता येणार आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








