नरेंद्र मोदींना अमेरिकी पत्रकाराचा मुस्लिम भेदभावावर सवाल, मोदींनी दिलं ‘हे’ उत्तर

मोदी

फोटो स्रोत, Reuters

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत बायडन यांना भारतात मुस्लिम आणि अल्पसंख्याकांबाबत होणाऱ्या भेदभावावर प्रश्न विचारण्यात आला. वॉशिंग्टन पोस्टच्या पत्रकारांनं हा प्रश्न विचारला, त्यावर आम्ही लोकशाही मूल्यांवर चर्चा केली. दोन्ही देशांच्या डीएनएमध्ये लोकशाही आहे, असं उत्तर यावेळी बायडन यांनी दिलं.

त्यानंतर हाच प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारण्यात आला.

भारतात मुस्लिम आणि अल्पसंख्याकांबाबत भेदभाव होत असल्याचा आरोप केला जाते. ते थांबवण्यासाठी तुमचं सरकार काय पावलं उचलत आहे, असा सवाल विचारण्यात आला.

त्यावर उत्तर देताना मोदी म्हणाले, “तुम्ही म्हणता की तुम्ही ऐकलंय की भारत लोकशाही देश आहे. ऐकलं नाही, भारत लोकशाहीच देश आहे. भारत आणि अमेरिकेच्या डीएनएमध्ये लोकशाही आहे. संविधानाच्या रुपात आमच्या पूर्वजांनी त्याला शब्दस्वरूप दिलं आहे. कुठल्याही प्रकारच्या भेदभावाला आमच्या लोकशाहीत जागा नाही.

ज्या ठिकाणी मानवी मूल्यांना जागा नाही तिथं लोकशाही असू शकत नाही. धर्म किंवा जातीच्या आधारे भारतात कुठलाही भेदभाव नाही. सरकारच्या योजनांचा लाभ सर्वांना दिला जातोय, त्यात कुठलाही भेदभाव नाही.”

मोदी-बायडन

फोटो स्रोत, TWITTER/POTUS

यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांकडून निवेदन देण्यात आलं. दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन यावेळी दिलं.

दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध फार महत्त्वाचे आहेत. आम्ही वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली, असं यावेळी बायडन यांनी म्हटलंय.

यावेळी भारतात 2 आणखी वाणिज्य दुतावास सुरू करणार असल्याची घोषणा बायडन यांनी केली आहे.

मोदींनी यावेळी बायडन यांचे आभार मानले.

दोन्ही देशांमधली भागिदारी संपूर्ण जगासाठी महत्त्वाची आहे. ही एक मजबूत आणि भविष्याला लक्षात घेऊन केलेली भागीदारी आहे, असं मोदींनी यावेळी म्हटलं.

अमेरिकेत राहाणारे भारतीय आमच्या दोन्ही देशांमधल्या संबंधाचं द्योत्यक आहे, असं मोदी यांनी म्हटलंय. तसंच बेंगलुरू आणि अहमदाबादमध्ये 2 नवे वाणिज्य दुतावास सुरू करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचं मोदींनी स्वागत केलं आहे.

भारत अमेरिकेतल्या सिएटलमध्ये वाणिज्य दुतावास सुरू करेल, अशी घोषणा मोदींनी यावेळी केली आहे.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं की, भारत आणि अमेरिकेमधलं नातं हे 21 व्या शतकांतील एक महत्त्वाचं नातं असेल.

पंतप्रधान मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. ही मोदींची ऑफिशियल स्टेट व्हिजिट आहे.

आज मोदी यांनी व्हाईट हाऊसमध्ये बायडन यांची भेट घेतली.

व्हाईट हाऊसमध्ये मोदींचं स्वागत करताना बायडन यांनी म्हटलं, “दोन्ही देशांच्या राज्यघटनेत सुरूवातीलाच तीन शब्द आहेत- वुई द पीपल. यातूनच आमचे देश म्हणून प्राधान्यक्रम काय आहेत, हे स्पष्ट होतं.”

त्यांनी पुढे म्हटलं की, दोन्ही देशांच्या नात्यामध्ये परस्परांत विश्वास आहे. त्यातून आमचं नातं दृढ होत आहे.”

“दोन्ही देश खाद्य सुरक्षा आणि ऊर्जा संकट (जे रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे निर्माण झालं आहे.) या विषयांपासून हवामान बदलाच्या क्षेत्रापर्यंत एकत्रित काम करत आहोत.”

बायडन यांनी पुढे म्हटलं, “भारत, अमेरिका आणि संपूर्ण जगासमोर आज असा काळ आहे, जेव्हा सर्व काही वेगाने बदलत आहे. अशी संधी दशकातून एकदाच येते आणि आम्हाला माहीत आहे की, आज आम्ही जो निर्णय घेऊ त्याचा परिणाम येणाऱ्या काळावर दिसून येईल.”

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

द्विपक्षीय चर्चेसाठी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत अमेरिकेतील प्रसिद्ध म्युझिक बँड पेन मसालाने छय्यां-छय्यां, जश्न-ए-बहारासारख्या बॉलिवूड गाण्यांनी केलं.

मोदींनी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचल्यानंतर बायडन यांच्या कॅबिनेटसोबतही भेट घेतली.

मोदींनी सांगितली तीस वर्षांपूर्वीची आठवण

मोदी

फोटो स्रोत, Reuters

व्हाईट हाऊसमधील बायडन यांच्यासोबतच्या भेटीनंतर बोलताना नरेंद्र मोदी यांनी तीस वर्षांपूर्वीची आठवण सांगितली.

नरेंद्र मोदींनी म्हटलं, “तीस वर्षांपूर्वी मी एखाद्या सामान्य भारतीयाप्रमाणेच इथे आलो होतो. तेव्हा मी बाहेरून व्हाईट हाऊस पाहिलं होतं. पण आज मी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं भारतीय वंशाच्या लोकांसाठी व्हाईट हाऊसचे दरवाजे खुले करण्यात आल्याचं पाहिलंय.”

भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहेत. या दोन्ही देशांची राज्यघटनाही एकाच शब्दाने सुरू होते- वुई द पीपल.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

आताच्या परिस्थितीत दोन्ही देशांना आपल्या विविधतेत असलेल्या एकतेचा अभिमान आहे.

त्यांनी म्हटलं, “कोव्हिडच्या काळात जागतिक व्यवस्था नव्यानं आकाराला येत आहे. या काळात भारत आणि अमेरिकेची मैत्री जागतिक सामर्थ्य वाढविण्याच्या दृष्टिने पूरक ठरेल. जगाच्या हितासाठी शांतता आणि स्थैर्य़ आवश्यक आहे. त्याच दिशेने काम करण्यासाठी दोन्ही देश एकत्र येऊन काम करण्यासाठी उत्सुक आहेत.”

“आम्ही दोन्ही देशांतील प्रश्नांव्यतिरिक्त जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही चर्चा करू. ही चर्चा सकारात्मक होईल, असा विश्वास मला आहे.”

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)