बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख..

जग

फोटो स्रोत, Getty Images

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.

आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..

1. जगातील 10 श्रीमंत देशांची यादी जाहीर, भारताचा नंबर कितवा?

जगातले श्रीमंत देश कोणते? या प्रश्नाचं एकदम अचूक उत्तर देणं तितकंसं सोपं नाही. अशा देशांचे बऱ्याचदा अंदाज बांधले जातात. पण मग हे अंदाज अचूक येतीलच असंही नाही. मग प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे हे नेमक्या कोणत्या श्रीमंतीविषयी सांगतायत.

तसं बघायला गेलं तर एखाद्या देशाच्या श्रीमंतीचं मूल्यमापन त्याच्या सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपीच्या अंदाजावर केलं जातं. विशिष्ट कालावधीत देशाच्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन मोजून जीडीपी काढला जातो. देशाच्या संपत्तीचं मोजमाप म्हणून याकडे पाहिलं जातं.

जगाच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर वापरलं जाणारं हे एकक आहे. यामध्ये इतर गोष्टींबरोबरच सरकारला किती टॅक्स मिळतोय आणि सरकार शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रांवर किती पैसा खर्च करते आहे याची माहिती मिळते.

आता भले ही या एककावर प्रश्न उपस्थित होत असतील. पण या एककाच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे जगातील दहा श्रीमंत देशांची माहिती मिळू शकते.

इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि व्हिज्युअल कॅपिटलिस्टच्या ऑक्टोबर 2022 च्या आकडेवारीनुसार, जगातील दहा श्रीमंत देशांची यादी तयार करण्यात आलीय..

वर्ल्ड इकोनॉमिक फोरम

फोटो स्रोत, Getty Images

2. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काय आहे?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जागतिक आर्थिक परिषद म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडच्या दावोस इथे गेले होते.

या परिषदेतून महाराष्ट्रात 1 लाख 40 हजार कोटींची परदेशी गुंतवणूक आणल्याचं राज्य सरकारने म्हटलं आहे.

याआधी 2022 साली आदित्य ठाकरे, सुभाष देसाई दावोसला गेल्याचं तुम्हाला आठवत असेल. तर 2018 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या परिषदेसाठी गेले, त्याचीही बरीच चर्चा झाली होती.

पण दावोसच्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमला जाऊन हे लोक नेमकं काय करतात? ही परिषद काय आहे? त्यातून कुणाचा फायदा होतो आणि त्यावर टीका का होते आहे?

जनगणना

फोटो स्रोत, Getty Images

3. भारताची 2021ची जनगणना का रखडली?

भारताची दर दहा वर्षांनी होणारी जनगणना अर्थात Census ही 2021मध्ये होणं अपेक्षित होतं. पण 2023उजाडला तरीही याचा काही थांगपत्ता नाही. कोरोना त्याला मुख्य कारण आहे.

मुळात जनगणना होते कशी, ती महत्त्वाची का आहे आणि ती न झाल्यामुळे काय काय खोळंबलंय? समजून घेऊ या.

17 जानेवारीला चीनच्या National Bureau of Statistics ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार चीनच्या लोकसंख्या वाढीच्या दरात गेल्या सहा दशकांत पहिल्यांदाच घसरण झालीय.

काही अंदाजांनुसार याच वर्षी म्हणजे 2023मध्ये भारत चीनला सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत ओव्हरटेक करेल. पण त्यासाठी भारतात जनगणना अर्थात सेन्सस होणं आवश्यक आहे.

भारतात जनगणना Census Act 1948 नुसार होते. भारतात पहिल्यांदा जनगणना खरंतर 1871-72 साली झाली होती, म्हणजे ब्रिटिश शासन काळात.

आता होणारी जनगणना ही एकूण 16वी आणि स्वतंत्र भारतातली 8वी जनगणना असेल.

जेसिंडा आर्डन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, जेसिंडा आर्डन

4. जेसिंडा आर्डन : 'मी पंतप्रधान पदावर कायम राहिले तर देशाला धोका दिल्यासारखं होईल'

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन आपल्या पदावरून पुढच्या महिन्यात पायउतार होणार आहेत. याची घोषणा करताना त्या म्हणाल्या की, “देशाचं नेतृत्व करण्याची आणखी क्षमता त्यांच्यात उरलेली नाही.”

याबद्द्ल बोलताना त्यांचा गळा भरून आला आणि 6 वर्षं पंतप्रधान असण्याचा मोठा परिणाम त्यांच्या आयुष्यावर झाला हेही त्यांनी सांगितलं.

7 फेब्रुवारीच्या आधीच त्या लेबर पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होतील. त्यांच्या जागी पक्षाचा नवा नेता कोण असेल हे ठरवण्यासाठी पक्षात मतदान होईल.

या वर्षी 14 ऑक्टोबरला न्यूझीलंडमध्ये सार्वत्रिक निवडणुका आहेत.

त्या म्हणाल्या, “या पदावर पुढे काम करण्यासाठी, या पदाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी माझ्यात ताकद असेल असं मला वाटलं होतं पण दुर्दैवाने ते त्राण माझ्यात उरलेलं नाही. असं असतानाही मी या पदावर कायम राहिले तर देशाला धोका दिल्यासारखं होईल.”

शुबमन गिल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शुबमन गिल

5. शुबमन गिल ठरला सगळ्यात युवा द्विशतकवीर

हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 12 धावांनी पराभव केला.

भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि न्यूझीलंडसमोर 350 धावांचं लक्ष्य ठेवलं.

शुबमन गिलने शानदार द्विशतक झळकावलं.

धडाकेबाज युवा सलामीवीर शुबमन गिलने न्यूझीलंडविरुद्ध हैदराबाद इथे द्विशतक साजरं केलं.

लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार खेचत शुबमनने द्विशतकाला गवसणी घातली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)