बिहारचे ‘चंद्रशेखर’ ज्यांनी रामचरितमानसबद्दल केलं ‘हे’ वक्तव्यं आणि सुरू झाला वाद

श्रीराम

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, चंदन जजवाडे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी रामचरितमानसवर दिलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद थांबायचं नाव घेत नाही.

उप-मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यानंतर आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही या प्रकरणावर स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.

चंद्रशेखर हे बिहारच्या मधेपुरा मतदारसंघातून लालू प्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाचे आमदार आहेत.

प्राध्यापक असलेल्या चंद्रशेखर यांनी नुकतेच 'रामचरितमानस'बाबत एक वादग्रस्त विधान केलं होतं. या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया बिहारच्या राजकारणात उमटताना दिसत आहेत.

चंद्रशेखर हे पटनामध्ये एका पदवीप्रदान सोहळ्याला उपस्थित होते. रामचरितमानसमधील काही ओव्यांचा उल्लेख करताना त्यांनी हा एक द्वेष पसरवणारा ग्रंथ असल्याचं वक्तव्य केलं.

कार्यक्रमानंतर शिक्षण मंत्री चंद्रशेखर यांना याबाबत प्रश्नही विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, “एका युगात मनुस्मृति, दुसऱ्या युगात रामचरितमानस, तिसऱ्या युगात गोळवलकर गुरुजींचं ‘बंच ऑफ थॉट्स’, हे सगळे देशात-समाजात फूट पाडायचं काम करतात.”

चंद्रशेखर यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत चंद्रशेखर
फोटो कॅप्शन, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत चंद्रशेखर

नितीश कुमार यांनी म्हटलं, “आम्ही मानतो की कोणत्याही धर्माच्या बाबत कोणताही वाद निर्माण करू नये. लोकांनी त्यांना पाहिजे त्या पद्धतीने धर्माचं पालन करावं. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसावा.”

चंद्रशेखर हे राजदच्या तिकिटावर सलग तिसऱ्यांना विधानसभेत पोहोचले आहे. गेल्या वेळी बनलेल्या महागठबंधन सरकारमध्ये त्यांना आपत्ती व्यवस्थापन मंत्रिपदाची जबाबदारीही देण्यात आली होती.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

राजकारणाची सुरूवात

चंद्रशेखर मूळचे मधेपुराच्या भलेवा गावातील आहेत. त्यांचे वडील एक शिक्षक होते. स्थानिक पत्रकार प्रदीप कुमार झा यांच्या माहितीनुसार, “त्यांचे मोठे भाऊ रामचंद्र यादव हे दिल्ली विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक होते. ते आता निवृत्त झाले आहेत.”

चंद्रशेखर यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात माजी खासदार पप्पू यादव यांच्या पाठिंब्याने केली होती.

त्यांनी दोनवेळा पप्पू यादव आणि त्यांची पत्नी रंजित रंजन यांच्या पाठिंब्याने मधेपुरातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहेत. या दोन्ही वेळेस त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं.

चंद्रशेखर यांना राजकारणातील सुरुवातीच्या टप्प्यात पप्पू यादव आणि रंजित रंजन यांनी मदत केल्याचं ते सांगतात.

पप्पू यादव यांनी यासंबंधित काही निवडणुकीची कागदपत्रेही बीबीसीला दाखवली. 2000 आणि 2005 साली निवडणुकीच्या प्रचाराशी संबंधित हे दस्तऐवज आहेत.

याबाबत चंद्रशेखर यांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी बीबीसीने त्यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी आपल्या तब्येतीचं कारण देत बोलण्यास नकार दिला.

प्रचारपत्रक

फोटो स्रोत, PAPPU YADAV

पप्पू यादव काय म्हणाले?

निवडणुकीच्या प्रचारार्थ वाटण्यात येणाऱ्या एका पत्रकात चंद्रशेखर यांनी आपलं नाव चंद्रशेखर यादव असं दिलं आहे.

यामध्ये त्यांनी राम मनोहर लोहिया, चौधरी चरणसिंह आणि शेतकरी-मजूरांचा उल्लेख केलेला आहे.

पप्पू यादव यांच्या मते, चंद्रशेखर हे पूर्वी त्यांच्या गटात होते. मात्र, नंतर राजदने त्यांना आपल्यापासून तोडलं.

ते सांगतात, “चंद्रशेखर यांचा कल सुरुवातीपासूनच राजकारणाकडे होता. ते आमच्या कार्यक्रमांना येत असत. अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी आमच्या फोटोचाही वापर केला होता.”

पत्रकार प्रदीप कुमार झा यांनी सांगितलं की पप्पू यादव यांच्या पाठिंब्याने निवडणूक लढवल्यानंतर चंद्रशेखर यांना सुमारे 18 हजार मते मिळाली होती.

राजदने हीच मते पाहून 2010 च्या निवडणुकीत त्यांना तिकीट दिलं होतं.

प्रदीप कुमार यांच्या मते, मधेपुरामधून तिकिट मिळवण्यासाठी चंद्रशेखर हे त्यावेळी शरद यादव यांच्याकडेही गेले होते. मात्र तिथून त्यांना तिकिट मिळू शकलं नाही.

चंद्रशेखऱ

फोटो स्रोत, twitter

फोटो कॅप्शन, लालू यादव आणि राबडीदेवी यांच्यासोबत चंद्रशेखर

चंद्रशेखर यांच्या वक्तव्यावर मधेपुराच्या लोकांचं मत काय?

प्रा. चंद्रशेखर यांनी रामचरितमानसवर केलेल्या वक्तव्यानंतर बिहारमध्ये विरोधी पक्ष भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.

त्यांच्या वक्तव्याविरोधात भाजप आणि त्यांच्या जवळच्या काही संघटनांनी ठिकठिकाणी आंदोलनं करून त्यांचा निषेध नोंदवला. मात्र, मधेपुरा येथील सर्वसामान्य नागरिकांकडून अशा प्रकारचा विरोध पाहायला मिळत नाही.

मधेपुराच्या स्थानिक माध्यमांमधील बातम्यांनुसार, उलट काही ठिकाणी लोक चंद्रशेखर यांना पाठिंबा देताना दिसत आहेत.

लोकांच्या मते, “शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी रामचरितमानसमध्ये जे लिहिलं, त्याचाच केवळ उल्लेख केला. यामध्ये वाद निर्माण करण्याचं काय कारण आहे?”

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

तुवुर्सू यांच्या मते, “चंद्रशेखर हे मनुवाद आणि ब्राह्मणवाद यांच्याबाबत वक्तव्य करत असतात. मात्र येथील जातीय समीकरणामुळे बहुतांश लोकांचा त्यांना पाठिंबाच असतो. कुणी त्यांना विरोध करतही असेल, तरी तो कदाचित मनातल्या मनातच.”

चंद्रशेखर यांनी 2010, 2015 आणि 2020 अशा सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे. 2020 मध्ये चंद्रशेखर यांनी जनअधिकार पक्षाच्या पप्पू यादव यांना पराभूत केलं होतं. विशेष म्हणजे, त्यांच्याच पाठिंब्याने त्यांनी राजकारणाची सुरुवात केली होती, असं म्हटलं जातं.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 3

चंद्रशेखर यांच्या वक्तव्यानंतर महागठबंधनमध्ये मतभेद दिसून येत आहेत. जनता दलाने (युनायटेड) त्यांच्या वक्तव्याचा विरोध केला.

मात्र, राजद नेते आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे चंद्रशेखर यांच्यासोबत असल्याचं दिसून येतं.

तेजस्वी यादव यांच्याकडून पाठिंबा मिळाल्यामुळे चंद्रशेखरसुद्धा आता आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसून येतं.

‘चंद्रशेखर यांच्या वक्तव्यात नवं काहीच नाही’

हा वाद समोर आल्यानंतर सुरुवातीला राजदचेच ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी बीबीसीला एक प्रतिक्रिया दिली होती.

शिक्षण मंत्र्यांनी रामचरितमानस समजून न घेता हे वक्तव्य केलं, अशी टीका त्यांनी केली होती.

दुसरीकडे, जनता दलाचे प्रवक्ते असलेल्या नीरज कुमार यांनी चंद्रशेखर यांच्या वक्तव्याविरोधात पटनाच्या एका मंदिरात रामचरितमानस ग्रंथपठण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

मधेपुराचा विचार केल्यास या मतदारसंघात एम-वाय समीकरणाचा मोठा प्रभाव आढळून येतो. येथील सुमारे 40 टक्के मतदार मुस्लीम आणि यादव समाजाचे आहेत.

प्रदीप कुमार झा म्हणतात, “चंद्रशेखर मधेपुरा येथे आपल्या भाषणांमध्ये मनुवाद आणि रामचरितमानस यांच्याविषयी नेहमीच बोलत असतात. येथील मागासवर्गीय लोकांना ते रामचरितमानसमधील ओव्या वेळोवेळी ऐकवत असतात. त्यावरूनच सध्याचा वाद पेटलेला आहे.”

RSS आणि भाजपवर सातत्याने हल्लाबोल

प्रदीप कुमार झा यांच्या मते, चंद्रशेखर यांच्या रामचरितमानवरील वक्तव्याचा मधेपुरात कोणताही विरोध किंवा परिणाम दिसून येत नाही.

बातम्यांनुसार, रामचरितमानस यांनी आपल्या भाषणादरम्यान आणखी एक दावा केला होता. तो म्हणजे, ते आपल्या नावासोबत यादव अडनावाचा वापर करत नाहीत. हे अडनाव जातदर्शक असल्याचं ते मानतात.

मात्र, चंद्रशेखर यांनी आपल्या सुरुवातीच्या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी वापरलेल्या साहित्यामध्ये यादव अडनाव वापरल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.

माजी खासदार पप्पू यादव यांनी बीबीसीला दाखवलेल्या एका पॅम्पलेटमध्येही चंद्रशेखर यादव लिहिल्याचं दिसून येतं.

परंतु, गेल्या काही काळापासून शिक्षण मंत्री चंद्रशेखर यांनी आपल्या नावातून यादव शब्द वगळलेला आहे. त्यांच्या ट्विटर अकाऊंटही प्रा. चंद्रशेखर या नावानेच आहे.

बिहार विधानसभेच्या वेबसाईटवर मधेपुराचे आमदार म्हणूनही त्यांच्या नावाचा उल्लेख केवळ चंद्रशेखर असाच आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 4

तुर्वसू यांनी यासंदर्भातील एक जुना किस्सा बीबीसीला सांगितला.

त्यांच्या मते, देशात मंडल कमिशन बनवण्यात आला, तेव्हापासूनच मधेपुरासह बिहारच्या अनेक भागांत ‘जाती-तोडो’ आंदोलन झालं होतं. अडनावामुळे लोकांच्या जाती समजून येतात. त्यामुळेच लोकांना आडनावांचा त्याग केला होता.

तुर्वसू म्हणतात, “यादव आणि मागास जातींमध्ये अनेक उपजाती आहेत. त्या काळात अनेकांनी आपल्या जाती-जातींमधील भिंती तोडून लग्नसंबंध जुळवले होते. मागास जातींनी बिहारमध्ये ब्राह्मण छोडो, जनेऊ तोडोचा नाराही दिला होता.”

प्रा. चंद्रशेखर हे आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून मंडलवादचं समर्थन आणि भाजप-आरएसएसवर सातत्याने हल्लाबोल करत असतात.

स्थानिक पत्रकार प्रदीप कुमार झा यांच्या मते, चंद्रशेखर हे औरंगाबादच्या रामलखन सिंह यादव कॉलेजमध्ये प्राध्यापकसुद्धा आहेत.

औरंगाबादच्या राम लखन सिंह यादव कॉलेजशी संपर्क केला असता तिथे ते जंतु विज्ञान विभागात कार्यरत आहेत, इतकीच माहिती मिळू शकली.

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 5

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)