श्रीलंका : राष्ट्रपतींच्या घरात घुसल्यानंतर आंदोलकांनी नेमकं काय केलं? बीबीसीच्या पत्रकाराचा अनुभव

राष्ट्रपती भवन, श्रीलंका

फोटो स्रोत, Anarbasan Ethirajan

फोटो कॅप्शन, राष्ट्रपती भवनाच्या लॉनवर बसून लोकांनी खाल्ले डबे
    • Author, अरुण प्रसाद
    • Role, बीबीसीसाठी

आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत सध्या अराजकतेचं चित्र दिसत आहे. काल राष्ट्रपती भवनाच्या स्वीमिंग पूलमध्ये लोकांनी पोहण्याचा आनंद लुटला तर आज राष्ट्रपती भवनातील लॉनवर बसून पिकनिकचा आनंद लोकांना लुटला.

आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत आंदोलकांनी पंतप्रधान रानिल विक्रमासिंघे यांचं घर पेटवलं. याचा ग्राऊंड रिपोर्ट बीबीसीसाठी अरुण प्रसाद यांनी कव्हर केलाय. त्यांचा अनुभव इथं शेयर करत आहोत.

श्रीलंकेतील अर्थव्यवस्था डबघाईला आल्यामुळं त्रस्त असलेल्या जनतेनं पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या निवासस्थानावर कब्जा केला. कोलंबो 7 या उच्चभ्रू वसाहतीत असणारं हे खाजगी निवासस्थान आंदोलकांनी पेटवून दिलं.

रानिल विक्रमसिंघे, त्यांची पत्नी आणि मुलं शुक्रवारी संध्याकाळपर्यंत तरी याच घरात होते. मात्र संध्याकाळनंतर पंतप्रधान निवासस्थानी कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचारी आणि कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं कळतं. संध्याकाळनंतर निवासस्थानाच्या आवारात कोणीही दिसलेलं नाही.

नेहमीच्या गस्तीवर तैनात असलेले सुरक्षा कर्मचारी, पंतप्रधानांचे अंगरक्षक सुद्धा आजूबाजूला दिसले नाहीत. रानिल आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षेच्या कारणास्तव अज्ञात स्थळी हलवण्यात आल्याचं समजतं.

श्रीलंका राष्ट्रपती भवन

फोटो स्रोत, SAJID NAZMI

शेकडो सरकारविरोधी आंदोलकांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या खासगी मालकीच्या घरामध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. नंतर या घराला त्यांनी आग लावली.

पंतप्रधानांच्या वाहनाचं देखील नुकसान करण्यात आलं आहे. आंदोलकांनी निवासस्थानाच्या बाहेर उभी असलेली बीएमडब्ल्यू कार आणि इतर वाहनांनाही आग लावल्याचं दिसलं. या आगीत घरातील सर्व खोल्या आणि त्यातल्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

घराबाहेर दोन अग्निशामक गाड्या उभ्या होत्या. मात्र आग विझवण्यासाठी कर्मचारी सूचनांच्या प्रतीक्षेत उभे असल्याचं दिसून आलं.

दरम्यान, या परिसरात पोलीस बंदोबस्तही कमी प्रमाणात तैनात होता. पंतप्रधानांच्या निवासस्थानाला आग लावल्यानंतर बंदोबस्तासाठी असणाऱ्या कोणीही गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला नाही.

श्रीलंका राष्ट्रपती भवन

फोटो स्रोत, Getty Images

राष्ट्रपती जसं विलासी जीवन जगतात त्याचा काही मिनिटांसाठी का होईना पण श्रीलंकेच्या सामान्य जनतेने अनुभव घेतलाच.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

सरकारविरोधी निदर्शक, शेकडोच्या संख्येने राष्ट्रपती भवनात घुसले.

राष्ट्रपती भवनात प्रवेश करणारे सुरुवातीचे आंदोलक संघटित नव्हते. या गर्दीवर कोणाचंही नियंत्रण नव्हतं. यातल्या काही आंदोलकांनी भवनातल्या मौल्यवान वस्तूंची नासधूस करण्याचा प्रयत्न केला.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

याच दरम्यान आंदोलकांच्या काही गटांचं नेतृत्व करणाऱ्या बौद्ध भिक्खू, ख्रिश्चन मिशनरी नेते, विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी हा प्रकार थांबबण्यासाठी हस्तक्षेप केला. आंदोलनाच्या नावाखाली राष्ट्रपती भवनात घुसून मजा करणाऱ्या लोकांना ही इशारा दिला.

श्रीलंका राष्ट्रपती भवन

त्यांनी गर्दीला फक्त या जागेचा आनंद लुटण्यास सांगितल्याचं दिसतं. त्यानंतर इतरांनाही राष्ट्रपती भवनातील वातावरण अनुभवण्याची संधी मिळावी म्हणून लवकरात लवकर परिसर सोडायला सांगितलं.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

या आंदोलकांनी मग राष्ट्रपती भवनातल्या खोल्यांमध्ये फेरफटका मारला. यातल्या काहींनी राष्ट्रपतींचे कपडे, सूट वापरल्याचं दिसलं.

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

काही आंदोलक एअर कंडिशनिंग टॉयलेटमध्ये जात असल्याचं आमच्या रिपोर्टरने पहिलं. हे टॉयलेट राष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वापरासाठी होतं.

श्रीलंका राष्ट्रपती भवन

फोटो स्रोत, Getty Images

काही आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या बेडरूममध्ये प्रवेश केला. तसेच त्या आलिशान गाद्यांवर ताबा मिळवला.

आपल्या देशाचे राष्ट्रपती जसे विलासी जीवन जगतात त्याचा काही मिनिटांसाठी का होईना पण श्रीलंकेच्या सामान्य जनतेने अनुभव घेतलाच.

श्रीलंका राष्ट्रपती भवन

फोटो स्रोत, Reuters

राष्ट्रपती भवनाच्या आत या आंदोलकांचं छुप नेतृत्व करणाऱ्यांनी मोठी तटबंदी असलेल्या या भवनात आयुष्य कसं असतं याचा अनुभव घेण्यासाठी गटाला गटाला संधी दिली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)