श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष रनिल विक्रमसिंघेंबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

रनिल विक्रमसिंघे

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रंजन अर्जुन प्रसाद
    • Role, बीबीसी तामिळ

श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून रनिल विक्रमसिंघे यांची आज निवड झाली आहे. विक्रमसिंघे हे श्रीलंकेच्या राजकारणातील महत्त्वाचे व्यक्ती मानले जातात.

त्यांचा पक्ष युनायटेड नॅशनल पार्टीला गेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांच्या पक्षाला निवडणुकीतून एकही जागा मिळाली नव्हती. पण त्यांच्या पक्षाला श्रीलंकेच्या संसदीय प्रणालीप्रमाणे राष्ट्रीय यादीनुसार एक जागा मिळाली होती.

या राखीव जागेमुळेच रनिल विक्रमसिंघे खासदार बनले आणि ते श्रीलंकेचे पंतप्रधान बनले होते

श्रीलंकेत गेल्या काही दिवसांपासून राजकीय अस्थैर्य आणि आर्थिक अडचणी पाहायला मिळत आहे.

कोण आहेत रनिल विक्रमसिंघे

रनिल यांचा जन्म 24 मार्च 1949 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव एसमंड विक्रमसिंघे आणि आईचे नाव नलिनी विक्रमसिंघे आहे. कोलंबोतील रॉयल कॉलेजमधून त्यांनी आपले कायद्याचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले तर पदव्युत्तर शिक्षण त्यांनी कोलंबो विद्यापीठातून घेतले आहे.

त्यांनी श्रीलंकेत वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली आणि नंतर ते राजकारणात गेले. विक्रमसिंघे यांनी आपली राजकीय कारकीर्द गंपाहा जिल्ह्यातून सुरू केली.

1970 मध्ये, युनायटेड नॅशनल पार्टीचे मुख्य संघटक म्हणून केलनिया मतदारसंघात त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर बियागामा मतदारसंघाचे प्रमुख संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

रनिल विक्रमसिंघे

फोटो स्रोत, Getty Images

बियागामा येथून त्यांच्या संसदीय कारकिर्दीची सुरुवात झाली. पुढे जे. आर. जयवर्धने यांच्या मंत्रिमंडळात तरुण मंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली. ते युवा व्यवहार आणि रोजगार खात्याचे मंत्री झाले.

त्यानंतर, युनायटेड नॅशनल पार्टीच्या प्रमुख नेत्याच्या रूपात ते पुढे येऊ लागले.

सहाव्यांदा पंतप्रधान पदाची शपथ

1 मे 1993 रोजी श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रणसिंघे प्रेमदासा यांचा एलटीटीईच्या आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर डी. बी. विजेतुंगा यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं. ज्यामध्ये रनिल यांना पंतप्रधान करण्यात आलं.

त्यानंतर 2001 मध्ये ते दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले.

जानेवारी 2015 मध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रनिल-मैत्रीपाला युतीला यश मिळाल्यानंतर, रनिल यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यात आलं.

त्याच वर्षी, जेव्हा संसद विसर्जित केली गेली आणि निवडणूका लागल्या, तेव्हा रनिल जिंकले आणि पुन्हा पंतप्रधान बनले.

2015-2019 कालावधीत, ज्याला श्रीलंकेतील 'गुड गव्हर्नन्स' कालावधी म्हणून ओळखलं जातं, त्यात राजकीय गोंधळाची परिस्थिती उद्भवली. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांनी रनिल विक्रमसिंघे यांच्या जागी महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधान बनवण्यासाठी त्यांची राजकीय शक्ती वापरली.

श्रीलंका

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, त्यांना पुन्हा पाचव्यांदा पंतप्रधान बनवण्यात आलं.

त्याच वर्षी, जेव्हा संसद विसर्जित केली गेली आणि निवडणूका लागल्या, तेव्हा रनिल जिंकले आणि पुन्हा पंतप्रधान बनले.

2015-2019 कालावधीत, ज्याला श्रीलंकेतील 'गुड गव्हर्नन्स' कालावधी म्हणून ओळखलं जातं, त्यात राजकीय गोंधळाची परिस्थिती उद्भवली. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांनी रनिल विक्रमसिंघे यांच्या जागी महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधान बनवण्यासाठी त्यांची राजकीय शक्ती वापरली.

मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, त्यांना पुन्हा पाचव्यांदा पंतप्रधान बनवण्यात आलं.

2019 मध्ये, जेव्हा गोटाबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला तेव्हा रनिल पंतप्रधानपदावरून पायउतार झाले. या राजवटीत झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागलं.

मात्र, राष्ट्रीय यादीतून त्यांच्या पक्षाला संसदेत पुन्हा स्थान मिळालं. रानिल यांनी त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधित्व करत संसदेत प्रवेश केला.

मागील काही महिन्यांत श्रीलंकेची अर्थव्यवस्था ढासळली होती. त्यात सामाजिक-राजकीय संकट ही निर्माण झाली. आणि अशातच रनिल हे सहाव्यांदा पंतप्रधान बनले.

बलस्थानं आणि कच्चे दुवे

रनिल विक्रमसिंघे यांची बलस्थानं आणि कच्चे दुवे, कौशल्यं यावर बीबीसी तमिळने श्रीलंकेचे ज्येष्ठ पत्रकार आर. शिवराजा यांच्याशी संवाद साधला.

यावर, टीकेला सामोरे जाणं आणि संयम राखणं हे रानिल यांचं सर्वांत मोठं बलस्थान असल्याचं आर. शिवराजा सांगतात, "माजी राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी रनिल यांच्यावर जोरदार टीका केली तेव्हाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मैत्रीपालाची ती भूमिका असल्याचं रानिल म्हणाले आणि पुढे गेले. यामुळे सर्वांशी मिळतजुळतं घेण्यास त्यांना मदत होईल," असं ते म्हणाले.

श्रीलंका

फोटो स्रोत, Getty Images

याशिवाय शिवराजा म्हणतात, रनिल संयमी सुद्धा आहेत. त्यांचे राजनैतिक अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. ते कोणताही निर्णय घाईघाईने नाहीत, ज्यामुळे त्यांची ताकद वाढते, असं ते म्हणाले.

शिवराजा यांना असंही वाटतं की, रनिल यांना असलेल्या राजकीय अनुभवामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना एकाच वेळी भारत आणि चीनशी मैत्रीपूर्ण संबंध हाताळता आले. शिवराजा सांगतात, "श्रीलंकेच्या इतर राजकारण्यांसारखे रनिल हे सुद्धा आंतरराष्ट्रीय संपर्क ठेऊन आहेत, जी एक ताकद आहे."

रनिल यांच्या कार्यकाळातच श्रीलंकेतील तरुणांचे प्रश्न आणि क्रीडा क्षेत्र पुढं आल्याचं शिवराजा सांगतात.

रनिल यांच्या कच्च्या दुव्यांपैकी एक म्हणजे ते समाजातील तळागाळाच्या लोकांपासून दूर आहेत, असं शिवराजा सांगतात. "ते ज्या राजकीय वातावरणात मोठे झाले ते लपवण्यासाठी ते मुखवटा घालू शकले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांना त्यांची ही दुर्बलता माहीत आहे. ते आता ही परिस्थिती सुधारू शकतात," असं शिवराजा म्हणाले.

गोटाबाया यांनी केली होती घोषणा

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी नव्या सरकारसंदर्भात एक महत्त्वाची घोषणा केली होती त्यानुसार रनिल यांनी आज पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

त्यांनी ट्वीट करून सांगितलं होतं, "देशात अराजकतेची स्थिती नियंत्रित करण्यासाठी आणि इतर समस्या सोडवण्यासाठी नवीन पावलं उचलले जातील."

त्यांनी सांगितलं होतं की एका आठवड्याच्या आत संसदेत बहुमत असलेल्या आणि लोकांचा विश्वास संपादन करण्याची क्षमता असलेल्या पंतप्रधानांची नियुक्ती केली जाईल.

त्यांनी म्हटलं आहे, "नव्या सरकारला त्यांचे उपक्रम राबवायची संधी दिली जाईल. देश पुढे जावा यासाठी जे धोरणं आखली जातील त्याला आम्ही पाठिंबा देऊ"

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"त्याशिवाय संसदेला अधिक सशक्त करण्यासाठी घटनेत आणखी सुधारणा करण्यात येईल. त्याबरोबरच कार्यकारी अध्यक्ष हे पद समाप्त करण्याचाही प्रस्ताव आहे."

गोटाबाया त्यांच्या शेवटच्या ट्विटमध्ये लिहितात, "लोकांच्या आयुष्य आणि त्यांच्या संपत्तीच्या रक्षणासाठी मी लोकांना मदतीसाठी नम्र आवाहन करत आहेत"

श्रीलंका सध्या एका मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत आहे. त्याविरोधात तिथली जनता निदर्शनं करत आहे. देशभरात झालेल्या हिंसाचारामुळे गोळीबार झाला आणि त्यात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे.

आर्थिक संकटाशी झुंज देणाऱ्या महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा अचानक आलेला नाही. त्याचा कयास आधीपासून लावला जात होता. महिंदा राजपक्षे यांना राजीनामा द्यायला गोटाबाया यांनीच सांगितलं होतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)