पुरुषांनी वजनावर नियंत्रण ठेवल्यास वंध्यत्वावर मात करता येईल?

फोटो स्रोत, Getty Images
बालपणी किंवा किशोरवयात म्हणजे जन्मापासून 18 वर्षांपर्यंत पुरुषांनी त्यांच्या वजनावर नीट नियंत्रण ठेवलं, तर पुढे जाऊन अशा पुरुषांना वंध्यत्वाच्या समस्येला तोंड देण्याची वेळ येत नाही, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं यासंबंधी वृत्त प्रसिद्ध केले आहे.
या अभ्यासाचा अहवाल संशोधक जॉर्जियामधील अटलंटामध्ये नियोजित इंडॉक्रिन सोसायटीच्या वार्षिक बैठकीत सादर करणार आहेत.
ज्या पुरुषांचं वजन जास्त आहे, लठ्ठपणा आहे किंवा इन्सुलीन प्रतिरोधक पातळी जास्त आहे, त्यांची हे सारं सामान्य असलेल्यांच्या तुलनेत अंडकोष लहान असतात, असंही या अभ्यासात समोर आलं आहे.
"बालपण आणि किशोरवयात वजन नियंत्रित ठेवल्यास पुढील आयुष्यात अंडकोषाचे कार्य नीट ठेवण्यास मदत होते," असंही इटलीतल्या कॅटानिया विद्यापीठातील व्यवस्थापकीय संचालक रोसेला कॅनारेल्ला यांनी म्हटलं. ते या अभ्यासात संशोधक म्हणून कार्यरत होत्या.
पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढतेय. तसंच, गेल्या 40 वर्षात जगभरात कोणतेही स्पष्ट कारण नसताना शूक्राणूंची (Sperm Count) निम्म्यानं कमी झालीय, असंही त्यांनी सांगितलं.
टेस्टिक्युलर व्हॉल्युम (अंडकोषाचा आकार मोजण्यासाठीचं माप) चा थेट संबंध शूक्राणूंच्या संख्येशी आहे. याचा सरळ अर्थ असा की, छोटं अंडकोष म्हणजे कमी शूक्राणू. 18-19 वर्षे वयोगटातील एक चतुर्थांश तरुण पुरुषांमध्ये अंडकोषाचा आकार कमी असतो किंवा सामान्यापेक्षा लहान अंडकोष असतात. या सगळ्यामुळे भविष्यात प्रजननक्षमतेला धोका निर्माण होतो, असं कॅनारेल्ला म्हणतात. त्याचवेळी बालपणातील लठ्ठपणाचे प्रमाणही वाढले आहे.
"बालपणातील लट्ठपणा आणि तरुणांमध्ये कमी टेस्टिक्युलर व्हॉल्युमचं जास्त प्रमाण यांच्यात संबंध असू शकतो," असं त्या म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
हा संबंध अधिक तपासण्यासाठी संशोधकांनी 53 लहान मुलं आणि किशोरवयीन मुलं, तर 150 लठ्ठ किंवा अतिवजनाच्या मुलांचा अभ्यास केला. या सगळ्यांची तुलना समवयीन 61 मुलांशी करण्यात आली. या 61 जणांचं टेस्टिक्युलर व्हॅल्युम लठ्ठ किंवा अतिवजनाच्या मुलांपेक्षा अधिक सामान्य असल्याचं दिसून आलं.
लठ्ठपणा-संबंधित इंसुलिन प्रतिरोधकता आणि हायपरइन्सुलिनमिया यांसारख्या चयापचय कृतींचाही टेस्टिक्युलर व्हॉल्यूममधील संबंधदेखील अभ्यासलं गेलं. इन्सुलिन प्रतिरोध हा शरीराचा इन्सुलिनला होणारा अशक्त प्रतिसाद असून, याचा परिणाम रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढण्यात होतो.
हायपरइन्सुलिनमिया म्हणजे शरीरात इन्सुलिनचे असामान्य उच्च स्तर. इन्सुलिन स्तर सामान्य असलेल्या मुलांचं टेस्टिक्युलर व्हॅल्युम हायपरइन्सुलिनमिया असलेल्या मुलांपेक्षा तुलनेने जास्त असतं. पौगंडावस्थेनंतर इन्सुलिन प्रतिरोधक असलेल्या किशोरवयीन मुलांमध्ये इन्सुलिन प्रतिरोध नसलेल्यांच्या तुलनेत अंडकोषाचा आकार कमी होता.
"या अभ्यासातले हे सर्व निष्कर्ष तरुण पुरुषांमध्ये अंडकोषाचा आकार कमी होण्याचे कारण स्पष्ट करण्यात मदत करतात," असंही कॅनारेल्ला म्हणतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








