चीनमध्ये 132 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं

विमान

फोटो स्रोत, Getty Images

चायना इस्टर्न एअरलाईन्सचं 132 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळल्याचं वृत्त आहे. या अपघातात जीवितहानी झाली आहे का यासंदर्भात माहिती स्पष्ट झालेली नाही.

बोइंग 737 हे विमान 132 प्रवाशांना घेऊन गुआंगझी भागात दुर्घटनाग्रस्त झालं आहे.

पर्वतराजीत हे विमान कोसळल्यामुळे जंगलात आग लागली आहे. चीनमधल्या सरकारी प्रसारमाध्यमांनी यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

MU5735 क्रमांकांचं विमान कुनमिंगहून गुआंगझाऊला जात होतं.

हे विमान साधारणत: तासभर हवेत होतं असं फ्लाईट ट्रॅकिंग वेबसाईट्सनी म्हटलं आहे. वुझोऊ भागातल्या तेंग परिसरातून जात असताना हे विमान कोसळलं. गुआंगझी हे चीनच्या दक्षिणेकडील एक महत्त्वाचं शहर आहे.

दुर्घटनेचं वृत्त हाती आल्यानंतर प्रवाशांच्या सुटकेसाठी मदतकार्य हाती घेण्यात आलं आहे. फ्लाईटरडार23डेटा साईटने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक वेळेनुसार दुपारी 14.22 वाजता 3,225 फूट उंचीवर असताना हे विमान कोसळलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)