You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युक्रेन-रशिया वाद : फक्त 5 नकाशांमध्ये सध्याची स्थिती समजून घ्या
रशियाने युक्रेनवर 'आक्रमण' केल्यानंतर जागतिक स्तरावर सातत्याने वेगाने घडामोडी घडत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 24 फेब्रुवारीला युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू केलीय.
युद्धभूमीवर परिस्थिती मिनिटागणिक बदलत आहे. त्यातच तिसरं महायुद्ध झालं तर ते अण्वस्त्रांनी होईल, असा इशारा रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिला आहे.
रशिया कोणत्याही परिस्थितीत युक्रेनला अण्वस्त्रं मिळू देणार नसल्याचं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोफ यांनी म्हटलंय. तिसरं महायुद्ध अण्वस्त्रांनी होईल आणि ते विनाशकारी असेल असंही त्यांनी म्हटलंय.
रशिया युक्रेनसोबतच्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी तयार आहे, पण युक्रेन अमेरिकेच्या तालावर चालत असल्याचं लावरोफ यांनी म्हटलंय.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून 5.75 लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी युक्रेनमधून पलायन करत शेजारच्या पोलंडमध्ये आसरा घेतलाय.
हा हल्ला सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण 10 लाखांपेक्षा जास्त लोकांनी युक्रेनमधून पलायन केलं असल्याचं युनायटेड नेशन्सने म्हटलंय.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा युनायटेड नेशन्सने निषेध करत रशियाने सैन्य मागे घ्यावं अशी मागणी केली. याबाबतच्या ठरावावर संयुक्त राष्ट्रांच्या आणीबाणीच्या सभेत मतदान करण्यात आलं. भारत या ठरावावरील मतदानाला अनुपस्थित होता. यामध्ये एकूण 193 सदस्यांपैकी 141 सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केलं.
रशियानं युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांवर हल्ला अधिक तीव्र केला आहे. खारकीव्ह, मारिओपोल शहरांवर मोठे हल्ले करण्यात आले आहेत.
मध्यरात्रीपासून रशियाने विविध शहरांवर न थांबता हल्ले केले असून युक्रेनचं सैन्य जोरदार प्रतिकार करत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी एका व्हिडिओत म्हटलंय.
अंदाजे आकडेवारीनुसार, फेडरेशन ऑफ अमेरिकन सायन्टिस्ट यांच्यानुसार, रशियाकडे 5 हजार 977 आण्विक शस्त्र आहेत. आण्विक स्फोट घडवणारी उपकरणं. यात निवृत्त झालेल्या आणि काढून टाकलेल्या 1500 उपकरणांचाही समावेश आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)