रशिया-युक्रेन वाद : आतापर्यंत काय काय घडलं? 'या' 10 मुद्द्यांमध्ये जाणून घ्या...

फोटो स्रोत, AFP
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 24 फेब्रुवारीला युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू केली.
युक्रेनच्या पूर्वेकडील लुहान्स्क आणि दोनेत्स्क या दोन प्रांतांमधलं युक्रेनच्या लष्कराचं अस्तित्त्वं आपल्याला संपुष्टात आणायचं असल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी म्हटलं होतं. मात्र, रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव्हपर्यंत पोहोचल्याची माहिती युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं दिलीय.
रशियाच्या लष्करी कारवाईनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींना वेग आलाय. कालपासून, म्हणजे रशियानं लष्करी कारवाई सुरू केल्यापासून आतापर्यंत कोणत्या मोठ्या घटना घडल्या, हे आपण खालील 10 मुद्द्यांद्वारे जाणून घेऊया.
1) 'कीव्हमध्ये रशियन सैन्य पोहोचलं'
रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये पोहोचल्याचाी माहिती युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं दिलीय.
कीव्ह शहरात रशियन सैन्य पोहोचल्याची माहिती देतनाच, युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं नागिरकांना आव्हान केलंय की, "काळजी घ्या, घरातून बाहेर पडू नका."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
कीव्हस्थित बीबीसीच्या प्रतिनिधींनी काही वेळापूर्वी गोळीबाराचा आवाजही कीव्ह शहरात ऐकला. शिवाय, गोळीबाराच्या आवाजानंतर स्फोटाचा मोठा आवाज आल्याचंही त्यांनी सांगितलं.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आता युक्रेनची राजधानी कीव्हमधून नागरिकांनी बाहेर पडायला सुरुवात केली आहे.
2) रशियाला मला संपवायचं आहे - युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाला मला संपवायचं आहे असं म्हटलं आहे. '
'ते (रशिया) युक्रेनच्या प्रमुखांचा खात्मा करून राजकीय दृष्ट्या मला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. शत्रूच्या निशाण्यावर सर्वात पहिला मी आणि दुसऱ्या क्रमांकावर माझं कुटुंब आहे," असं एका व्हीडिओ मेसेजमध्ये राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
झेलेन्स्की कीव्ह मध्ये सरकारी निवासस्थानी राहत असून, त्यांचं कुटुंबही युक्रेनमध्येच असल्याचं म्हटलं आहे. याबाबत त्यांनी काहीही अधिक माहिती दिली नाही.
2014 मध्ये रशियाचा पाठिंबा असलेलं सरकार कोसळल्यानंतर पुतिन युक्रेनमध्ये स्थापन होणाऱ्या सरकारांवर नाराज आहेत.
3) चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ताबा
रशियाच्या सैन्यानं युक्रेनमधील चेर्नोबिल अणुभट्टीवर ताबा मिळवला आहे. 1986 मध्ये घडलेल्या आपत्तीनंतर आजपर्यंत याठिकाणी किरणोत्सर्ग कायम असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं या परिसरातील संघर्षामुळं आंतरराष्ट्रीय आण्विक घडामोडींवर लक्ष ठेऊन असलेल्या संस्थांनी काळजी व्यक्त केली आहे.
हा परिसर आता सुरक्षित आहे किंवा नाही हे सांगणं आता कठीण असल्याचं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार मिखायलो पोडोल्याक यांनी म्हटलं आहे. तीव्र संघर्षानंतर युक्रेननं याठिकाणचा ताबा गमावल्याचं ते म्हणाले.
एका व्हीडिओमध्ये रशियाचे रणगाडे या एकेकाळच्या अणुऊर्जा केंद्राच्या बाहेर उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. बीबीसीनं या व्हीडिओची सत्यता पडताळली आहे.
इतिहासातील सर्वात गंभीर अशा आण्विक दुर्घटना झालेल्या ठिकाणांपैकी चेर्नोबिल ही एक आहे. याठिकाणी 1986 मध्ये चारपैकी एका अणुभट्टीचा स्फोट झाला होता.
4) रशिया-युक्रेन संघर्षादरम्यान दोन्ही देशांकडून वेगवेगळे दावे
रशियन सैन्याने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईसंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे. यामध्ये त्यांच्याकडून अनेक दावे करण्यात आले आहेत. युक्रेनमधील कारवाई ही दॉनबस परिसरातील फुटीरतावादी क्षेत्राच्या संरक्षणासाठी करण्यात आल्याचा पुनरुच्चार या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे.
या परिसरात युक्रेनच्या सैन्याकडून हल्ला करण्यात आल्याचं रशियाने म्हटलं आहे. हल्ल्यात फक्त सैनिकी ठिकाणांना लक्ष्य केलं जात आहे. ज्या ठिकाणी उच्च क्षमतेचे शस्त्र वापरण्यात येत आहेत, तिथंच आपण हल्ला करत आहोत, असंही रशियाने म्हटलं.
दुसरीकडे, युक्रेननेही या प्रकरणात काही दावे केले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
युक्रेनच्या म्हणण्यानुसार त्यांनी 50 सैनिकांना ठार केलं. तसंच काही रशियन जेट लढाऊ विमानांचा पाडाव केल्याचंही युक्रेनने म्हटलं. याशिवाय, ज्या नागरिकांना शस्त्र हाती घ्यायचं आहे, त्यांना शस्त्र दिलं जाईल, असंही युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं आहे.
5) जेव्हा पुतीन यांनी लष्करी कारवाईची घोषणा केली...
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या दॉनबस भागामध्ये लष्करी कारवाई सुरू करत असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी टीव्हीवर एका भाषणात ही घोषणा केली आहे. भारतीय वेळेनुसार गुरुवारी, 24 फेब्रुवारीच्या सकाळी पुतीन यांनी लष्करी कारवाईची घोषणा केली.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये पुतीन यांना रोखण्यासाठी विनंती केली जात असतानाच, त्यांनी मात्र अशा प्रकारे लष्करी कारवाई सुरू करत असल्याचं जाहीर केलं आहे.
सत्य आणि न्याय हे रशियाच्या बाजुनं आहे. रशियाला घेरण्याचा प्रयत्न कोणीही करत असेल, तर रशिया तत्काळ प्रतिक्रिया देईल, असंही पुतीन म्हणाले आहेत. ही कारवाई स्वसंरक्षणासाठी असल्याचंही पुतीनं म्हणाले.
युक्रेन आणि रशियाच्या सैन्यामधील हा संघर्ष अपरिहार्य असून हा केवळ वेळेचा मुद्दा आहे, असंही पुतीन म्हणाले.
याच्या काही मिनिटांपूर्वीच संयुक्त राष्ट्रांनी इशारा दिला होता की, कोणत्याही प्रकारची कारवाई ही मोठ्या प्रमाणावर मानवी विनाशाला कारणीभूत ठरू शकते.
6) भारताची भूमिका काय?
संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टी.एस.तिरुमूर्ती यांनी या मुद्द्यावर काल (24 फेब्रुवारी) भारताची भूमिका मांडली.
सुरक्षा परिषदेनं दोन दिवसांपूर्वी यावर चर्चा केली होती. तणाव निवळण्यासाठी लष्कर मागे घेऊन सर्व मुद्द्यांवर चर्चेतून तोडगा काढावा असं सूचवण्यात आलं होतं.
ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असून मोठं संकट यामुळं निर्माण होऊ शकतं. त्यामुळं हा मुद्दा अत्यंत काळजीपूर्वक हाताळला जाणं गरजेचं आहे. तसं झालं तरच या भागात शांतता प्रस्थापित होऊ शकेल. याठिकाणी लष्कर त्वरित मागं घेतलं जावं अशी आमची भूमिका आहे. सर्वांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
भारतानं संयुक्त राष्ट्रांमध्ये कायमच कोणत्याही वादावर शांततेच्या मार्गावर तोडगा काढण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
आंतरराष्ट्रीय कायदे आणि करारांनुसार तोडगा काढला जावा असं आमचं मत आहे. विद्यार्थ्यांसह 20 हजार भारतीय हे युक्रेनच्या विविध भागांत राहत आहे. सीमेच्या भागतही अनेकजण राहतात. त्यांना परतण्यासाठी गरजेनुसार आम्ही सोय करत आहोत. या मुद्द्यावर द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढणं शक्य आहे असं आमचं मत आहे.
7) युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय अडकले
युक्रेनमध्ये सुमारे 20 हजार भारतीय नागरिक आहेत. परिस्थितीशी निपटण्यासाठी भारताची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यादरम्यान आवश्यक ते निर्णय घेण्यात येत आहेत, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी काल (24 फेब्रुवारी) दिली.
युक्रेनमध्ये घडामोडी वेगाने घडत आहेत. या परिस्थितीशी निपटण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत. तिथं राहत असलेल्या भारतीयांची नोंद घेण्याचं काम सध्या सुरू आहे. हे काम एका महिन्यापूर्वीच सुरू करण्यात आलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
ऑनलाईन नोंदणीच्या माध्यमातून युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय राहत असल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांत 4 हजार भारतीयांना युक्रेन सोडलं आहे.
दिल्ली येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षात 980 कॉल आणि 850 ई-मेल प्राप्त झाले आहेत. पुढील दिवसांतही युक्रेनमधील भारताचं काम सुरू राहील, असं श्रृंगला यांनी सांगितलं.
8) नाटोचे सैन्य सज्ज, मात्र युक्रेनमध्ये जाणार नाही
अमेरिका आणि ब्रिटननं रशियावर कठोर निर्बंध लादण्याची घोषणा केलीच आहे. त्याचबरोबर रशियाला मदत करणाऱ्या बेलारूसवरही निर्बंध लावले आहेत.
युरोपीयन संघाच्या अधिकाऱ्यांनी रशियन मालमत्ता गोठवणार असल्याचं सांगितलं आहे. युरोपातील आर्थिक बाजारांमध्ये त्यांच्यावर निर्बंध घालणार असल्याचंही ते म्हणाले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रो यांनीही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेली लष्करी कारवाई तात्काळ थांबवण्याची विनंती त्यांनी केली.

फोटो स्रोत, Getty Images
रशियाच्या-युक्रेनच्या या संकटाच्या पार्शवभूमीवर नाटोच्या हजारो सैनिकांना नाटोचे सदस्य असलेल्या लात्विया, इस्टोनिया, लिथुआनिया, पोलंड आणि रोमानिया या देशात तैनात करण्यात आलं आहे.
युरोपीयन संघाचे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी नेटोनं पूर्व किनाऱ्यावर 100 लढाऊ विमानं सज्ज ठेवल्याचं सांगितलं आहे. मात्र, युक्रेनमध्ये सैन्य तुकड्या पाठवण्याचा विचार नसल्याचंही ते म्हणाले.
अमेरिकेचं लष्कर युक्रेनमध्ये लढणार नाही. मात्र, नाटोच्या सदस्य देशांचं संरक्षण करत राहील, असं अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी म्हटलं.
9) तेलाच्या किंमती वाढल्या
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईचा काल (24 फेब्रुवारी) थेट परिणाम शेअर बाजारांवर दिसून आला होता.
वाढलेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलर प्रति बॅरलवर गेल्या. गेल्या सात वर्षांत पहिल्यांदा कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेल्या आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
काल (24 फेब्रुवारी) शेअर बाजारांवरही याचा परिणाम पहायला मिळाला. शेअर बाजारांमध्ये 2 ते 3 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली.
गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळत असल्याचं बीबीसी आशियाचे बिझनेस प्रतिनिधी मॅरिको यांनी म्हटलंय. यामुळे सोन्याच्या किंमती 1 वर्षातल्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. याशिवाय अमेरिकन डॉलर आणि जपानी येन ही चलनंही मजबूत झाली आहेत.
10) शेअर बाजार काल घसरला, आज सुधारणा
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतरचा हा दुसरा दिवस आहे. हल्ल्याच्या पहिल्या दिवशी आशियाई शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती.
तर दुसऱ्या दिवशी आशियाई बाजारात सुधारणा पाहायला मिळत आहे. यामुळे भारताच्या शेअर बाजारातही चांगली सुधारणा दिसून आली आहे.
आज (25 फेब्रुवारी) सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्यात दोन टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये 1300 अंकांची वाढ पाहायला मिळाली तर निफ्टीचा आकडा 16 हजारांच्या पार गेला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
PTI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सेन्सेक्समध्ये 2700 पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली होती. गेल्या दोन वर्षांतील एका दिवसातील ही सर्वात मोठी घसरण आहे. तर निफ्टी 815 अंकांनी खाली आली होती.
या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना 13.44 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. कच्च्या तेलाची किंमतही प्रति बॅरल 100 डॉलरपेक्षा जास्त गेली आहे. आशियाई बाजारांत तेजीया सर्व घडामोडींमध्ये दुसऱ्या दिवशी आशियाई बाजारात तेजी पाहायला मिळाली.
रशियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय निर्बंध लागू करण्यात आल्यानंतर जपानचा निकेई निर्देशांक 2 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. दक्षिण कोरियाच्या कोस्पी शेअर बाजारात 1.2 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.
गुरुवारी (24 फेब्रुवारी) भारतात शेअर बाजार ट्रेडिंगला सुरुवात होताच कोसळलं होतं. सेंसेक्स 1428.34 अंकांच्या घसरणीने 55,803.72वर खुला झाला होता, तर निफ्टी 413.35 अंकांच्या घसरणीसह 16,647 वर खुला झाला होता. ट्रेडिंगच्या दुपारच्या सत्रातही ही घसरण कायम होती.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









