चेर्नोबिल : रशिया-युक्रेन युद्धात सापडलेल्या शहराचे तुम्ही आजवर न पाहिलेले 10 फोटो
फोटो स्रोत, Getty Images
1. अजूनही किरणोत्सर्गाचा परिणाम
फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, रशियाच्या सैन्यानं युक्रेनमधील चेर्नोबिल अणुभट्टीवर ताबा मिळवला आहे. 1986 मध्ये घडलेल्या अपघातानंतर आजपर्यंत याठिकाणी किरणोत्सर्ग कायम असल्याचं सांगितलं जातं.
2. शहर रिकामं केलं
फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, सुमारे 35 वर्षांपूर्वी झालेल्या अणुऊर्जा अपघातानंतर किरणोत्साराची भीती असल्यानं चेर्नोबिल शहर मनुष्यविरहित करण्यात आलं होतं.
फोटो कॅप्शन, प्रिपिएटमध्ये भडक, ताज्या रंगात रंगवलेली ती एकमेव पाटी वगळता बाकी सगळं जुनं, 26 एप्रिल 1986 रोजी मध्यरात्री नंतर जसं होतं, तसंच आहे. चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पाच्या युनिट चारमध्ये स्फोट झाला. अणूभट्टी फुटली आणि किरणोत्साराचे ढग आसमंतात पसरले.
4. एक जिवंत शहर थांबलं
फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, एक चालतं-बोलतं शहर अचानक थांबल्यावर काय झालं असेल याची कल्पना या फोटोंमधून येते
5. सर्वात मोठी अणू दुर्घटना
फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, इतिहासातील सर्वांत गंभीर अशा आण्विक दुर्घटना झालेल्या ठिकाणांपैकी चेर्नोबिल ही एक आहे. याठिकाणी 1986 मध्ये चारपैकी एका अणुभट्टीचा स्फोट झाला होता.
6. शहरच विस्थापित झालं....
फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, अख्खं प्रिपिएट हे शहर आणि आसपासचा परिसर मिळून सुमारे दोन लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं.
7. किरणोत्सर्ग थांबवण्याचे प्रयत्न
फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, अणुभट्टीवर आच्छादन टाकण्याचं काम दहा हजार कामगार सलग चार वर्षं करत होते. त्यामुळे किरणोत्सार नियंत्रणात आणणं शक्य झालं.
8. जागतिक पातळीवर प्रयत्न
फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, चेर्नोबिल सुरक्षित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरही खूप प्रयत्न झाले. युरोपियन बँक ऑफ रिक्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हल्पमेंट आणि आंतरराष्ट्रीय दात्यांना दिलेल्या निधीतून इथं बरंच काम झालं. त्या प्रकल्पाच्या इमारतीवर टाकण्यात आलेल्या आच्छादनामुळे पुढील 100 वर्षं किरणोत्सर्ग रोखला जाऊ शकतो.
9. संपूर्ण जगाला धडा
फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, चेर्नोबिव दुर्घटनेमुळे संपूर्ण जगाला धडा मिळाला. अणूप्रकल्पाचे अपघात किती भयंकर असू शकतात याची कल्पना सर्व जगाला आली.
10. पर्यटनस्थळ
फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, हे उद्धवस्त शहर पाहायला अनेक पर्यटक चेर्नोबिलला जातात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.