जगातील सर्वात लहान बाळ 13 महिन्यांनंतर घरी... वजन 212 ग्रॅम, उंची 24 सेमी

फोटो स्रोत, NUH, SINGAPORE
- Author, सुरंजना तिवारी
- Role, बीबीसी न्यूज
जगातील सर्वात लहान बाळ अखेर 13 महिन्यांनंतर हॉस्पिटलमधून घरी परतलं. गेल्या 13 महिन्यांपासून या बाळावर सिंगापूरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. क्वेक यू शुआन असं या बाळाचं नाव आहे.
क्वेक यू शुआन ही जन्मावेळी फक्त 212 ग्रॅम वजानाची होती. म्हणजे, एका सफरचंदाच्या वजनाइतकी, तसंच तिची उंची फक्त 24 सेमी होती.
25 आठवड्यातच या बाळाचा जन्म झाला. सिंगापूरमध्ये सरासरी 40 आठवड्यांच्या गर्भधारणेनंतर बाळाचा जन्म सुखरूप मानला जातो.
यूनिव्हर्सिटी ऑफ लोवाच्या टायनिएस्ट बेबीज रजिस्ट्रीनुसार, याआधी 2018 साली अमेरिकेत सर्वात कमी वजनाच्या बाळाचा जन्म झाला होता. त्या बाळाचं जन्मावेळी वजन 245 ग्रॅम होतं.
यू शुआनच्या आईने नियोजित वेळेच्या चार महिने आधीच सी-सेक्शनद्वारे बाळाला जन्म दिला. कारण तिला प्री-इक्लॅम्प्सियाचं निदान झालं होतं. यातील घातक उच्चक रक्तदाबामुळे महत्त्वाच्या हाडांच्या नुकसानीसह बाळाच्या जीवालाही धोका पोहोचू शकला असता.
यू शुआनचं आताचं वजन 6.3 किलो आहे. जे त्याच्या वयानुसार योग्य मानलं गेलंय.

फोटो स्रोत, KWEK FAMILY
हे बाळ जन्मानंतर वाचण्याची शक्यता कमी असल्याचं सिंगापूरच्या नॅशनल यूनिव्हर्सिटी हॉस्पिटलने (NUH) ने सांगितलं होतं. मात्र, पुढे याच हॉस्पिटलमध्ये बाळाचा सुखरूप जन्म झाला.
"जन्मावेळी अनेक अडथळे आले, आरोग्यासंबंधी समस्या निर्माण झाल्या. मात्र, तरीही बाळ सुखरूप जन्माला आलं आणि गेल्या 13 महिन्यात योग्यरित्या वाढलं. यामुळे अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला आहे. या सगळ्यामुळे हे बाळ असामान्य 'कोव्हिड बेबी' ठरलं आहे," असं हॉस्पिटलनं काढलेल्या पत्रकात म्हटलंय.
यू शुआन हॉस्पिटलमध्ये असताना तिच्यावर विविध पद्धतीचे उपचार केले गेले. शिवाय, वेगवेगळ्या वैद्यकीय उपकरणं, तंत्रज्ञांच्या आधारे तिला वाचवण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला.
आमच्या देखरेखीखाली तिचं आरोग्य योग्यरित्या सुधारलं आणि आता ती पूर्ण बरी झाल्यानं डिस्चार्ज देण्यात आला, असं डॉक्टरांनी सांगितलं.
यू शुआनला फुफ्फुसाचा तीव्र आजार आहेच आणि तिला श्वास घेताना अडथळा येऊ शकतो, तेव्हा मदत लागू शकते. मात्र, काही दिवसागणिक ती आणखी बरी होत जाईल.
यू शुआनच्या आई-वडिलांनी क्राऊड फंडिंगमधून हॉस्पिटलचं बिल भरलं. तब्बल 2,70,601 डॉलर एवढी रक्कम क्राऊड फंडिंगमधून जमा केली गेली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








