जो बायडन, कमला हॅरिस यांचं अभिनंदन करताना बराक ओबामांनी काय म्हटलं?

जो बायडन

फोटो स्रोत, Getty Images

डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.

या विजयानंतर जो बायडेन आणि त्यांच्यासोबत उप-राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार कमला हॅरीस यांनी आपले ट्वीटर प्रोफाईल बदलत 'नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष' आणि 'नवनिर्वाचित उप-राष्ट्राध्यक्ष' केलं आहे.

निवडणूक निकालानंतर दोघांवरही जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. जगभरातले नेते सोशल मीडियावरून त्यांचं अभिनंदन करत आहेत.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनीही नवनिर्वााचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, त्यांच्या पत्नी जिल बायडेन आणि नवनिर्वाचित उप-राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ओबामा सोशल मीडियावर लिहितात, "यावेळी निवडणुकीत अमेरिकी जनतेने पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आहे. सर्व मतांची गणना झाल्यानंतर नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आणि उप-राष्ट्राध्यक्षांसाठी हा ऐतिहासिक विजय असेल."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

त्यांनी पुढे लिहिलं आहे, "पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात जो बायडेन जेव्हा अधिकृतपणे व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील त्यावेळी त्यांच्यासमोर अनेक आव्हानं असतील. यापूर्वी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर एवढी आव्हानं कुणासमोरही नव्हती. कोरोना संकट, असमान अर्थव्यवस्था आणि न्यायव्यवस्था, धोक्यात असलेली आपली लोकशाही आणि वातावरण बदल."

"ते सर्व अमेरिकी नागरिकांसाठी काम करतील, अशी आशा मला आहे."

पाकिस्तान आणि फ्रान्सकडूनही शुभेच्छा

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनीही जो बायडेन आणि कमला हॅरिस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

ते लिहितात, "निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष जो बायडेन लोकशाहीवर जागतिक संमेलन घेतील, अशी आशा आहे. तसंच आपण मिळून बेकायदेशीर टॅक्स हेवन संपवून भ्रष्ट नेत्यांकडून राष्ट्रीय संपत्तीची होत असलेली लूट थांबवू, अशी आशाही मी व्यक्त करतो."

"अफगाणिस्तान आणि या संपूर्ण प्रदेशात शांततेसाठी आम्ही अमेरिकेसोबत मिळून काम करू."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनीही दोन्ही नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते लिहितात, "अमेरिका आणि कॅनडा दोघेही जवळचे मित्रच नाही तर सहकारीही आाहेत. जागतिक पटलावर या दोन्ही देशांचं नातं विशेष आहे. आपण एकत्र काम करू, अशी आशा मला आहे."

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी हा 'ऐतिहासिक विजय' असल्याचं म्हणत जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचं अभिनंदन केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

ते लिहितात, "अमेरिका आमचा अत्यंत महत्त्वाचा सहकाारी आहे आणि वातावरण बदलापाासून ते व्यापार आणि सुरक्षा विषयांवर आपण एकजुटीने काम करू, अशी आशा मला आहे."

तर आपण दोन्ही देशांचे संबंध कायम मजबूत ठेवू, असं जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी म्हटलं आहे.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनीही जो बायडेन आणि कमला हॅरिस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर ते लिहितात, "आज आपल्याला अनेक आव्हानांचा सामना करायचा आहे. चला, एकत्रितपणे काम करूया."

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

ऑस्ट्रियाचे चॅन्सलर सबॅस्टिअन कूर्झ यांनीही दोघांचं अभिनंदन करत लिहिलं आहे, "अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल अभिनंदन. युरोप आणि अमेरिका यांची मूल्यं समान आहेत आणि आपण मिळून काम करू, अशी आशा मला आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)