कमला हॅरिस कोण आहेत?

कमला हॅरिस

फोटो स्रोत, Getty Images

भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या आज (20 जानेवारी) अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत.

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष होणाऱ्या त्या पहिल्या महिला असतील. सोबतच उपाध्यक्षपदी असणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय आणि आशियाई वंशाच्या व्यक्ती असतील.

यापूर्वी दोन वेळा महिलेला उपराष्ट्राध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली होती. 2008 साली रिपब्लिकन पक्षाने सारा पॅलिन यांना उमेदवारी दिली होती. तर 1984 साली डेमोक्रेटिक पक्षाने गिरालाडिन फेरारो यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या दोन्ही महिलांचा निवडणुकीत पराभव झाला होता.

अमेरिकेतल्या दोन्ही प्रमुख पक्षांनी आजवर कृष्णवर्णीय महिलेला अध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली नव्हती आणि आजवर कुठलीच महिला अमेरिकेची राष्ट्राध्यक्षही झालेली नाही.

व्हीडिओ कॅप्शन, कमला हॅरिस यांची हिच ती वेळा, हाच तो क्षण...

कॅलिफोर्नियामधून खासदार असलेल्या कमला हॅरिस यांनी एकदा जो बायडन यांना राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आव्हान दिलं होतं. मात्र, पुढे त्या या शर्यतीतून बाहेर पडल्या. त्यानंतर कमला हॅरिस यांना उपाध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली.

कमला यांनी कॅलिफोर्नियाच्या अॅटर्नी जनरल म्हणूनही काम केलं आहे. पोलीस सुधारणेच्या त्या कट्टर समर्थक आहेत.

कोरोना
लाईन

जो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याविरुद्ध लढत होते. राष्ट्राध्यक्षपदाच्या या निवडणुकीत बायडन यांना 273 तर ट्रंप यांना 214 इलेक्टोरल व्होट्स मिळतील असं बीबीसीची आकडेवारी सांगतेय.

जो बायडन म्हणतात...

"अमेरिका, या महान देशाचं नेतृत्व करण्यासाठी तुम्ही माझी निवड केली आहे. हा माझा सन्मान आहे. आपल्या सगळ्यांपुढचं आव्हान खडतर आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असणार आहे, तुम्ही मला मत दिलं असो किंवा नाही. तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा माझा प्रयत्न असेल", असं जो बायडन यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

जो बायडन यांनी उपाध्यक्षपदासाठी कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा करताना म्हटलं होतं, "कमला हॅरिस यांना उपाध्यक्षपदाच्या उमेदवार घोषित करताना मला अभिमान वाटतो."

त्या लढवय्या आणि अमेरिकेतील सर्वोत्तम नोकरशहांपैकी एक असल्याचंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

ते पुढे लिहितात, "त्यांनी मोठमोठ्या बँकांपुढे कसं आव्हान उभं केलं, हे मी स्वतः बघितलं आहे. कामगारांची मदत केली आणि महिला आणि बालकांचं शोषण होण्यापासून वाचवलं. मला त्यावेळीसुद्धा त्यांचा अभिमान वाटायचा आणि आज या मोहिमेत त्या माझ्या सहकारी असणार आहेत. याचाही मला अभिमान आहे."

कमला हॅरिस यांनीही ट्वीट करत जो बायडन यांचे आभार व्यक्त केले आहेत. त्या लिहितात, "मी माझ्या पक्षातर्फे उपाध्यक्षपदाच्या उमेदवार या नात्याने त्यांच्या सोबत आहे, याचा मला अभिमान आहे. त्यांची 'कमांडर-इन-चीफ' बनवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न मी करेन."

ट्रंप यांची टीका

जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्यावर विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना लक्ष्य करत 'ही जोडी अमेरिकेसाठी चुकीची' असल्याचं म्हटलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

पत्रकारांशी बोलताना ट्रंप म्हणाले, "कमला हॅरिस अशा व्यक्ती आहे ज्यांनी अशा अनेक खऱ्याखोट्या कहाण्या रचल्या आहेत. निवडणुकीच्या प्राथमिक फेरीत त्यांची कामगिरी खूपच वाईट होती, हे तुम्हा सगळ्यांना ठाऊकच आहे. म्हणूनच बायडन यांनी त्यांची निवड का केली, याचं मला थोडं आश्चर्य वाटतंय."

ट्रंप यांनी म्हटलं, डेमोक्रेटिक पक्षाच्या प्रायमरी फेरीमधल्या वाद-विवादांमध्ये कमला हॅरिस यांची कामगिरी अत्यंत 'वाईट' आणि 'भयंकर' होती.

त्यांनी म्हटलं, "जो बायडन यांच्याप्रती त्यांचं वागणं अपमानकारक आहे आणि अशा व्यक्तीला निवडून देणं अवघड असतं."

बायडन यांनी कमला हॅरिस यांची निवड केल्याने बायडन एका पोकळ योजनेला 'डाव्या अजेंड्याशी' जोडत असल्याचं स्पष्ट होतं. याशिवाय डोनाल्ड ट्रंप यांनी ट्वीटरवर एक व्हीडिओसुद्धा शेअर केला आहे. यात कमला हॅरिस जो बायडन यांच्यावर टीका करताना दिसतात.

'बनावट कमला' आणि 'दुबळे बायडेन' एकत्र परफेक्ट आहेत. मात्र अमेरिकेसाठी चुकीचे असल्याचंही या व्हीडिओमध्ये म्हटलं आहे.

कोण आहेत कमला हॅरिस?

55 वर्षांच्या कमला हॅरिस डिसेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर पडल्या होत्या.

कमला हॅरिस

फोटो स्रोत, Getty Images

त्यांचा जन्म कॅलिफोर्नियातल्या ऑकलँडमध्ये झाला. त्यांचे आई-वडील स्थलांतरित होते. त्यांच्या आईचा जन्म भारतातला, तर वडिलांचा जन्म जमैकामधला. हॉर्वर्ड विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलं. स्वतःच्या ओळखीवर आपण समाधानी असल्याचं आणि स्वतःला केवळ एक अमेरिकन नागरिक म्हणणं आवडत असल्याचं त्या सांगतात.

2019 साली वॉशिंग्टन पोस्टशी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, राजकीय नेत्यांनी वर्ण आणि पार्श्वभूमी या आधारावर कुठल्याही विशिष्ट भूमिकेत शिरता कामा नये. त्या म्हणाल्या होत्या, "मला म्हणायचं आहे की मी जी आहे ती आहे. मला त्याचा आनंद आहे. काय करायचं ते तुम्ही ठरवायचं आहे. पण मी पूर्णपणे आनंदी आहे."

हॉर्वर्डनंतर कमला हॅरिस यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर त्या वकिली व्यवसायात उतरल्या. यानंतर त्या अमेरिकेतल्या सर्वात मोठ्या कॅलिफोर्निया राज्याच्या अॅटर्नी जनरलपदी विराजमान झाल्या.

कमला हॅरिस दोन वेळा अॅटर्नी जनरल होत्या. त्यानंतर 2017 साली त्या खासदार म्हणून निवडून गेल्या.

कमला हॅरिस यांचा उमेदवारीसाठी विचार होण्यामागे ही सहा कारणं सांगितली जात आहेत-

1. कणखर आणि प्रभावी

जो बायडन यांनी प्रचारादरम्यान म्हटलं होतं, "माझ्यासाोबत काम करायला मला अशी व्यक्ती हवी, जी स्मार्ट आहे, कणखर आहे आणि नेतृत्त्व करायला तयार आहे.

कमला हॅरिसना हे सगळं लागू होतं. त्या स्थलांतरित कुटुंबातल्या आहेत, कष्णवर्णीय आहेत, राष्ट्रीय पातळीवरची आव्हानं त्यांनी पेललेली आहेत, मोठ्या राज्यातल्या आणि देश पातळीवरच्या नेतत्त्वाचा त्यांना अनुभव आहे आणि विश्लेषक म्हणतात त्याप्रमाणे त्या सुरुवातीपासूनच मोठ्या भूमिकेसाठी पात्र आहेत.

या निवडीचा परिणाम ज्यांना स्थलांतरितांचे प्रश्न, वर्णभेदाविषयीचा न्याय यांविषयी आस्था आहे अशा पुरोगामी विचारसरणीच्या मतदारांवर होऊ शकतो

कमला हॅरिस

फोटो स्रोत, Getty Images

हॅरिस यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं असून सॅन फ्रान्सिस्को शहराच्या अॅटर्नी म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी कॅलिफोर्नियाच्या अॅटर्नी जनरल म्हणून काम केलं. त्या प्रभावी आणि मुद्देसूद बोलतात, चर्चा वा डिबेटदरम्यान डगमगत नाहीत आणि समोरच्याची उलटतपासणी घेतात. सिनेटमधल्या लहान कार्यकाळातही त्यांनी आपली एक राष्ट्रीय प्रतिमा निर्माण केली आहे.

त्यांचा ऑनलाईन विश्वातला वावरही चांगला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदासाठीच्या शर्यतीत त्यांनी उडी घेतली तेव्हा त्यात त्यांना यश मिळालं नाही, पण त्यांची ऑनलाईन विश्वावरची पकड देशाने पाहिली.

उपाध्यक्ष माईक पेन्स यांच्यासोबत जेव्हा जाहीर डिबेट म्हणजे वादविवाद होतील तेव्हा त्यांची वक्तृत्त्वं कौशल्यं कामास येतील.

अमेरिकेतल्या एका स्थानिक माध्यमाने सूत्रांचा हवाला देत म्हटलं, "बायडन यांच्या कॅम्पेनला स्क्रूटिनी म्हणजेच प्रश्नांच्या आणि आरोपांच्या भडिमाराखाली डगमगून जाईल असा उमेदवार नको होता."

"सिनेटमधल्या 'इंटेलिज्नस आणि ज्युडिशियरी' (गुप्तवार्ता आणि न्याय) या दोन अतिशय महत्वाच्या समित्यांमधल्या सर्वात कणखर आणि प्रभावी सिनेटर्सपैकी त्या एक आहेत," असं बायडन यांच्या कॅम्पेनकडून पाठवण्यात आलेल्या ईमेलमध्ये म्हटलंय.

"क्रिमिनल जस्टिस आणि लग्नासाठीचा समान हक्क या दोन मुद्यांबाबत त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या वांशिक असमानतेच्या मुद्द्यावर त्या एखाद्या लेझरप्रमाणे लक्ष रोखून आहेत," ईमेलमध्ये म्हटलंय.

2. आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या मतदारांचा विचार

प्रचाराच्या सुरुवातीच्या एका टप्प्यावर बायडन यांचं फारसं चांगलं चाललं नव्हतं. पारडं बर्नी सँडर्स यांच्या बाजूने झुकताना दिसत होतं. पण 29 फेब्रुवारीला बायडेन यांनी साऊथ कॅरोलिनामधून विजय मिळवला आणि बाजी पलटली. आफ्रिकन अमेरिकन लोकसंख्येकडून मिळालेल्या पाठिंब्यावर हा विजय त्यांना मिळाला होता.

एका मागोमाग एक अनेक राज्यांतून बायडन यांना आफ्रिकन-अमेरिकन समुदायाचा पाठिंबा मिळायला लागला आणि बर्नी सँडर्स यांना माघार घ्यावी लागली.

कमला हॅरिस

फोटो स्रोत, Getty Images

या समुदायाकडून इतका पाठिंबा मिळत असल्याने रनिंग मेट म्हणून बायडेन आणि डेमोक्रॅटिक पक्ष रनिंग मेट म्हणून या समाजातल्याच कोणाची तरी निवड करणार याची पार्श्वभूमी निर्माण झालेली होती.

बायडन यांनी कृष्णवर्णीय महिलेची निवड करावी, अशी विनंती जेम्स क्लायबर्न या मोठ्या आफ्रिकन अमेरिकन नेत्याने केली होती.

3. ब्लॅक लाइव्हज मॅटरमुळे वाढलेला दबाव

आफ्रिकन अमेरिकन जॉर्ज फ्लॉईड यांचा पोलिस अधिकाऱ्यांच्या हातून मत्यू झाल्यानंतर जो बायडन कॅम्पेन आणि डेमोक्रॅटिक पक्षावरचा याबाबतचा दबाव आणखीन वाढला.

ब्लॅक लाईव्ह्ज मॅटरची निदर्शनं सुरूच आहेत. आंदोलकांनी सुधारणांची आणि तोंडी आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कतीची मागणी केली

4. कौटुंबिक संबंधांची पार्श्वभूमी

वैयक्तिक आणि कौटुंबिक संबंधही या निवडीमागे असल्याचं म्हटलं जातंय.

जो बायडेन यांनी ईमेलमध्ये म्हटलंय, "मी पहिल्यांदा कमलांना भेटलो माझा मुलगा बो मुळे. ते दोघेही त्यावेळी अॅटर्नी जनरल होते. माझ्या मुलाला त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल अतिशय आदर होता. मी हा निर्णय घेताना त्याचाही विचार केला. बो चे विचार माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कमला माझ्यासोबत या कॅम्पेनमध्ये असल्याचा मला अभिमान आहे.

5. आफ्रिकन अमेरिकन मतांमध्ये झालेली घट

आफ्रिकन अमेरिकन मतदारांचं प्रमाण एकूण मतदारांच्या जवळपास 13 टक्के आहे आणि अनेक स्विंग स्टेट्समध्ये ही मतं महत्त्वाची आहेत.

कमला हॅरिस

फोटो स्रोत, Getty Images

आफ्रिकन अमेरिकन मतांमध्ये झालेली घट हे हिलरी क्लिंटन यांचा ट्रंप यांच्याकडून पराभव होण्यामागचं एक कारण होतं.

पण कमला हॅरिस यांच्यामुळे मतदान केंद्रांवर किती अधिक आफ्रिकन अमेरिकन मतं येतील हे अजून स्पष्ट नाही.

6. अनुभवी-तरुण सहकाऱ्याची जोडी

या निवडीमागचं आणखी एक कारण म्हणजे जे नातं बराक ओबामा - जो बायडन जोडीमध्ये दिसलं होतं तेच बायडन आणि त्यांच्या नवीन सहकाऱ्यात असावा असा बायडन कॅम्पेनचा प्रयत्न होता.

पूर्वीच्या जोडीत गौरवर्णीय, ज्येष्ठ व्यक्तीकडे परराष्ट्र धोरणांचा अनुभव होता आणि तरूण कष्णवर्णीय व्यक्ती ही स्थलांतरितांच्या पार्श्वभूमीची होती. आता बायडन अध्यक्षपदासाठी दावा करत असताना, हेच नातं कोण निर्माण करू शकतं, याचा शोध घेतला जात होता.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)