कमला हॅरिस यांनी पहिल्या भाषणात मानले आपली आई श्यामला गोपालन यांचे आभार...

फोटो स्रोत, Getty Images
जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. अनेक दिवस सुरू असलेल्या मतमोजणीनंतर जो बायडन यांनी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना नमवत बाजी मारली आहे.
बायडन यांनी रविवारी (8 नोव्हेंबर) राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदा अमेरिकेच्या जनतेला संबोधित केलं. त्यांच्यासोबतच उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनीही विजयानंतरचं आपलं पहिलं भाषण केलं.
"देशातील लोकांनी 'वुई द पीपल' काय असतं ते दाखवलं आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आपल्याला मिळाला आहे. आपल्याला 7 कोटी 40 लाख मतं मिळाली आहेत," असं म्हणत बायडन यांनी हा लोकांचा विजय असल्याचं म्हटलं.
तर कमला हॅरिस यांनी आपल्या पहिल्या भाषणात आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी म्हटलं की, मी माझ्या आईचे श्यामला गोपालन यांचे आभार मानते. ती वयाच्या 19व्या वर्षी इथं आली तेव्हा तिनं या क्षणाची कल्पनाही केली नव्हती.
'मी विभाजन नाही तर सगळ्यांना एकत्र आणण्यावर विश्वास ठेवणारा राष्ट्राध्यक्ष असणार आहे. मी भेदभाव करणार नाही,' असं म्हणत बायडन यांनी म्हटलं.
बायडन यांनी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचंही या भाषणाच्या वेळी कौतुक केलं.
बायडन यांनी म्हटलं, "आता आपल्याकडे सर्वोत्कृष्ट महिला उपराष्ट्राध्यक्ष आहे. मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. आपल्या देशात पहिल्यांदाच असं झालं आहे."
बायडन यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे-
- आफ्रिका-अमेरिकन समुदाय आमच्या पाठीशी राहिला. सगळ्या धर्माचे वंशाचे लोक आमच्या पाठीशी उभे राहिले.
- ज्यांनी ट्रंप यांना मतदान केलं ते निराश असतील. पण, आता आपण सगळ्यांनी एकत्र राहायला हवं.

फोटो स्रोत, Ani
- एकमेकांचं ऐकायला हवं आणि पुढे जायला हवं. ते काही आपले शत्रू नाही, ते अमेरिकनच आहेत. अमेरिकन लोकांचं ऐकण्याची हीच वेळ आहे.
- कोरोना, अर्थव्यवस्था, अशी अनेक आव्हानं आपल्यासमोर आहे. एकत्र येऊन त्यांचा सामना करायचा आहे.
'लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागतो'
बायडन यांच्याअगोदर उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी भाषणाला सुरूवात केली.
"लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि यातच मजा असते. कारण आपल्या लोकांमध्ये भविष्य निर्माण करण्याची ताकद असते. अमेरिका नवीन दिवस पाहिल, हे तुम्ही जगाला दाखवून दिलं," असं कमला हॅरिस यांनी म्हटलं.
कमला हॅरिस यांनी आपल्या भाषणात काय म्हटलं?
डेमोक्रॅटिक प्रक्रियेत आतापर्यंत सर्वाधिक लोकांना सहभागी करून घेतल्याबद्दल मी स्टाफचे आभार मानते.

फोटो स्रोत, Getty Images
- गेल्या काही दिवसांपासून वेळ बदलली आहे. गेल्या 4 वर्षांपासून तुम्ही असमानता आणि न्यायासाठी एकत्र आलात आणि मग तुम्ही मतदान केलं. तुम्ही आशा, एकता, सभ्यता, तंत्रज्ञान आणि सत्य निवडलं. तुम्ही ट्रंप यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यश्र म्हणून निवडलं, तर जो बायडन यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून.
- माझा नवरा डग आणि माझ्या मुलांना मी सांगू इच्छिते की मी त्यांना खूप जास्त प्रेम करते. मी ते शब्दांत व्यक्त करू शकत नाही.
- ब्लॅक वुमेनची पीढी, एशियन, व्हाईट, लॅटिन ज्यांना देशाच्या इतिहासातून बेदखल करण्यात आलं; त्यांनी असमानता, एकतेसाठी मोठं योगदान दिलं.
- आज मी इथं आहे ते म्हणजे त्यांच्या संघर्षाचं आणि निश्चयाचं प्रतीक आहे.
- जो बायडन यांनी इथर सगळ्या असमजांना फेटाळून लावत, पहिल्यांदा महिलेला उपराष्ट्रध्यपदी निवडलं आहे.
- आज प्रत्येक लहान मुलगी पाहत असेल की सगळं काही शक्य नाही.
- आज आपला देश एकत्र आहे, मी आणि जो एकत्र आहेत. तुम्ही असे नेते निवडले आहेत ज्यांचा जग आदर करेल.
दरम्यान, मतमोजणी सुरू होऊन दोन दिवस उलटले तरी अध्यक्ष कोण हे स्पष्ट होत नव्हतं. दोन्ही उमेदवारांनी विजयी असल्याचे दावे केले होते. मात्र अखेर बायडन यांची या लढाईत सरशी झाली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"अमेरिका, या महान देशाचं नेतृत्व करण्यासाठी तुम्ही माझी निवड केली आहे. हा माझा सन्मान आहे. आपल्या सगळ्यांपुढचं आव्हान खडतर आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असणार आहे, तुम्ही मला मत दिलं असो किंवा नाही. तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा माझा प्रयत्न असेल", असं जो बायडन यांनी ट्वीटमध्ये म्हटलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








