अमेरिका निवडणूक 2020 : व्हाईट हाऊसमध्ये जाण्याच्या दिशेने बायडन यांची तयारी?

जो बायडन

फोटो स्रोत, Getty Images

जो बायडन आणि त्यांची टीम राष्ट्राध्यक्षपद सांभाळण्यावरती विचार करत असल्याच्या बातम्या येत आहेत.

येत्या आठवड्यात व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं जाहीर होतील असं न्यू यॉर्क टाइम्सने बातमीत म्हटलं आहे. कोणाला कोणतं पद मिळणार यावर वॉशिंग्टन आणि डेलावरमध्ये चर्चा सुरू आहे.

बायडन यांनी आपल्या संभाव्य कॅबिनेटमध्ये पुरुष, महिला, समलैंगिक, ब्लॅक, व्हाईट, आशियाई असे सर्व लोक असतील असं यापूर्वीच सांगितलं होतं.

बायडन सर्वात आधी व्हाईट हाऊस स्टाफचा निर्णय घेतील असं टाइम्सचं म्हणणं आहे. नोव्हेंबर अखेरीपर्यंत कॅबिनेटमधील लोकांची नावं जाहीर होणार नाहीत असंही त्यात म्हटलं आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल अजून आलेला नाही. मात्र, डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी या मतमोजणीत आघाडी घेतली आहे.

पेनसेल्वेनियामध्ये बायडन यांची आघाडी वाढत आहे. बायडन ट्रंप यांच्या तुलनेत 28,833 मतांनी आघाडीवर आहेत.

बायडन इतर राज्यांमध्येही आघाडीवर आहेत. त्यामुळे बायडन विजयी होतील, असं अनुमान वर्तवलं जात आहे.

दरम्यान, बायडन यांनीही आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करताना म्हटलं की, आम्ही स्पष्ट बहुमतानं विजयी होऊ. कारण पूर्ण देश आपल्यासोबत आहे.

जो बायडन यांनी काय म्हटलं?

संपूर्ण देश आपल्या पाठीशी उभा असून आपण स्पष्ट बहुमताने विजयी होऊ, असा आशावाद जो बायडन यांनी डेलवेअरमधल्या विलमिंग्टनमध्ये केलेल्या भाषणात व्यक्त केला.

त्यांनी म्हटलं, "आम्हाला 7 कोटी 40 लाखांहून जास्त मतं मिळाली आहेत. अमेरिकेच्या इतिहासात राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराला मिळालेली ही सर्वाधिक मतं आहेत."मात्र, बायडन यांनी अजूनही विजयाची घोषणा केलेली नाही.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

अॅरिझोना आणि जॉर्जियामध्ये गेल्या दोन दशकांपासून रिपब्लिकन पक्षाला मतं मिळत आली आहेत. मात्र, यावेळी या दोन्ही ठिकाणी आपलाच विजय होईल, असंही बायडन म्हणाले. इतकंच नाही तर 300 इलेक्ट्रोरल कॉलेज जिंकण्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी आपण कोरोना विषाणूच्या साथीसंदर्भात पावलं उचलू, असं आश्वासन जो बायडन यांनी दिलं.

नेवाडामध्ये बायडन यांची आघाडी

नेवाडामध्ये 47 टक्के मतपत्रिकांची मोजणी झाली आहे. जो बायडन हे 22 हजार 657 मतांनी आघाडीवर आहेत.

नेवाडामध्ये इलेक्टोरल कॉलेजची सहा मतं आहेत. बायडन यांना जिंकण्यासाठी 270 इलेक्टोरल कॉलेज मतं हवी आहेत. सध्या बायडन यांच्याकडे इलेक्टोरल कॉलेजची 253 मतं आहेत. विजयासाठी त्यांना 17 इलेक्टोरल कॉलेज मतांची आवश्यकता आहे.

मात्र, संपूर्ण निकाल येण्याआधीच बायडन यांनी स्वतःला विजयी घोषित करू नये, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

काही वेळापूर्वी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे, "हा दावा (विजयाचा) तर मीदेखील करू शकतो."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

ते पुढे लिहितात, "बायडन यांनी विजयाचा दावा करू नये. कायदेशीर प्रक्रिया आता कुठे सुरू झाली आहे."

खरंतर ट्रम्प यांनी दोन वेळा मतमोजणी होण्याआधीच स्वतःला विजयी घोषित केलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी स्वतःला त्या जागांवरही जिंकत असल्याचं सांगितलं जिथे बायडन आघाडीवर होते.

मतमोजणी आणि निरीक्षकांना रोखण्यासारख्या मुद्द्यांवरून ट्रम्प यांची टीम आधीच कोर्टात गेली आाहे. अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये मतमोजणी थांबवण्याचीही विनंती ट्रम्प यांच्या टीमने केली आहे.

बायडन

फोटो स्रोत, Getty Images

जॉर्जियामध्ये सैन्याची मतं महत्त्वाची

जॉर्जियामध्ये टपालाने येणाऱ्या मिलिट्री अबसेंटी मतांची वेळ अमेरिकन प्रमाण वेळेनुसार शुक्रवारी (6 नोव्हेंबर) संध्याकाळपर्यंत आहे. जाणकारांच्या मते अमेरिकेचे जवान आणि सेलर्स यांची मतं इथलं चित्र पालटू शकतात.

इथून मिळणाऱ्या ताज्या माहितीनुसार बायडेन 4200 हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. अटलांटानजिकच्या ग्विनेट काउंटीच्या 7000 मतांच्या मोजणीनंतरची ही आकडेवारी आहे.

8890 सैन्य मतांची मोजणी अजून झालेली नाही, असं जॉर्जियामधल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. 3 नोव्हेंबरची ताारीख असलेली ही पोस्टल मतं वेळेत जॉर्जियाला पोहोचली नाही तर त्यांची मोजणी होऊ शकणार नाही.

अमेरिकेच्या निवडणुकीत सैन्य जवान सामान्यपणे रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराच्या बाजूने असतात, असं जाणकार सांगतात. मात्र, ट्रम्प यांनी बरेचदा सैन्य अधिकाऱ्यांशीही वाद घातला आहे. कदाचित त्यामुळे जवान नाराज असण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसात सैन्यात महिला आणि अल्पसंख्यक समाजातील लोकांची भर्ती वाढली आहे आणि ते रिपब्लिकन उमेदवाराच्या पारड्यात मतं टाकणार नाहीत, असं मानलं जातंय.

16 इलेक्ट्रोरल कॉलेज असलेल्या जॉर्जियामध्ये पुन्हा मतमोजणी करू, असं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मात्र, येणाऱ्या दिवसात जॉर्जिया महत्त्वाचं राज्य ठरेल, असं याक्षणी तरी वाटतंय.

पेन्सिल्वेनियामध्ये ट्रम्प-बायडन यांच्यातील अंतर वाढलं

पेन्सिल्वेनियामध्ये डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यातल्या मतांचं अंतर वाढत आहे.

24 तासांपूर्वी इथून ट्रम्प आघाडीवर होते. मात्र, पोस्टल मतांची मोजणी सुरू झाल्यानंतर ते पिछाडीवर दिसत आहेत. याक्षणी बायडन जवळपास 13 हजार मतांनी पुढे आहेत.

अॅरिझोना, नेवाडा आणि जॉर्जियामध्येसुद्धा बायडन यांना आघाडी आहे. जॉर्जियामध्ये दुबाार मतमोजणी करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

बायडन-ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images

दोन्ही उमेदवारांमध्ये कमी मतांचं अंतर असल्याचं अटलांटामधल्या एका पत्रकार परिषदेत जॉर्जियाचे सेक्रेटरी ऑफ स्टेट ब्रॅड रेफेनबर्गर यांनी सांगितलं.

ते म्हणाले, "जॉर्जियाविषयी सध्या काहीच सांगता येत नाही. इथे 50 लाखांहून जास्त मतदान झालं आहे. इथल्या सर्व वैध मतांची मोजणी सुनिश्चित करणं आमची आणि निवडणूक अधिकाऱ्यांची जबबदारी आहे."

जॉर्जियमधल्या मतमोजणीचं काम किती महत्त्वाचं आहे, याची जाणीव सर्वांनाच आहे आणि यात पारदर्शकपणा अत्यंत महत्त्वाचा असल्याचं ते म्हणाले.

ते म्हणाले, "जॉर्जियमधल्या निकालावर संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. काही राज्यांमध्ये मतमोजणीवेळी निरीक्षकांना रोखण्यात आल्याच्या तक्रारी आल्या आहेत. मात्र, इथली संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जात आहे."

बायडन यांना पेन्सिल्वेनियामध्ये आघाडी

पेन्सिल्वेनियामध्ये बायडेन यांना 6817 मतांची आघाडी आहे. या राज्यात 95% मतमोजणी पूर्ण झाली आहे.

विश्लेषकांच्या मते उरलेली पोस्टल मतं बायडेन यांच्या पारड्यात जाऊ शकतात. या राज्यात विजय मिळवल्यास बायडन विजयासाठी आवश्यक 270 चा आकडा गाठू शकतील.

जो बायडन

फोटो स्रोत, Getty Images

याआधी जॉर्जियामधून बायडेन आघाडीवर होते. इथे 99% मतमोजणी पूर्ण झाली आहे. जवळपास 8197 मतपत्रिका अजून तपासलेल्या नाहीत. शिवाय, सैन्य आणि परदेशी मतपत्रिकांची मोजणीही व्हायची आहे.

नेवाडामध्ये 89% मतमोजणी पूर्ण झाली आहे आणि इथेही बायडन आघाडीवर आहेत. गुरुवारी (5 नोव्हेंबर) संध्याकाळपर्यंत जवळपास 1 लाख 90 हजार मतपत्रिकांची मोजणी शिल्लक होती, असं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं. अॅरिझोनामध्येही बायडेन 1.6% मतांनी आघाडीवर आहेत.

नॉर्थ कॅरोलिना आणि अलास्कामध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत.

मतदान घोटाळ्याचे पुरावे नाहीत - रिपब्लिकन सिनेटर, पेन्सिल्वेनिया

पेन्सिल्वेनियाचे रिपब्लिकन सिनेटर पॅट टुमी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे पक्षांतर्गत टीकाकारांपैकी एक आहेत. एनबीसी न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितलं, "मी काल रात्री राष्ट्राध्यक्षांचं भाषण ऐकलं आणि ते बघणं फार त्रासदायक होतं."

मोठ्या प्रमाणावर चोरी आणि घोटाळा झाल्याचे आरोप चुकीचे आहेत. "अशा प्रकारचं काही चुकीचं घडल्याची कुठलीच कल्पना मला नाही."

प्रत्येकच निवडणुकीत थोडीफार गडबड होते. मात्र, त्याचं प्रमाण खूप कमी असल्याचं सांगताना ते म्हणतात. "एका मूठभर मतपत्रिकांएवढं हे प्रमाण असतं."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)