कोरोना व्हायरस: आल्बेर काम्यू यांच्या 'द प्लेग'चं कथानक आणि आजची परिस्थिती सारखीच आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ल्युसी एश
- Role, बीबीसी प्रतिनिधी
लेखक आल्बेर काम्यू यांच्या 'द प्लेग' या कादंबरीत आणि सध्याच्या कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थितीत काही चित्तथरारक साम्यस्थळं आहे. बीबीसीच्या प्रतिनिधी ल्युसी एश यांनी याबाबत सविस्तर लिहिलंय. शिवाय, आजचा अल्जेरिया राजकीय अस्थिरतेतही कशाप्रकारे आज आरोग्य संकटाचा सामना करतोय, हेही त्यांनी सांगितलंय.
'द प्लेग' प्रकाशित होऊन आता 73 वर्षे लोटली आहेत. मात्र, आजचीच घटना असल्यासारखी ही कादंबरी वाटते. वाचक या कादंबरीतून आजची स्थिती समजून घेताना दिसतायेत.
अल्जेरियातल्या ओरान शहरातील मोहम्मद-बेडिआफ हॉस्पिटलमध्ये थकलेल्या अवस्थेत बसलेले प्रोफेसर सालाह लेलोऊ म्हणतात, 'कोरोनाचे बरेच रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत आहेत.'
अल्जीरियातल्या या शहरात प्रो. लेलोऊ टीबीचे तज्ज्ञ म्हणून काम करतात. ते क्वचितच कधी वेळेत घरी जातात. किंबहुना, मध्यरात्र होण्याआधीही त्यांना कधी घरी जाता येत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
"रुग्ण अत्यंत वाईट अवस्थेत येत असत. रुग्णापासून हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांपर्यंत सगळेजण अस्वस्थ होते. आमच्यासाठी हा सर्वात वाईट काळ होता. आम्हाला माहित नाही की, आम्ही रुग्णसंख्येच्या पिकवर पोहोचलोय की नाही, किंवा या आजाराची दुसरी लाटही येतेय की नाही, पण एक निश्चित की, इथे पुन्हा एकदा रुग्ण वाढू लागलेत," लेलोऊ सांगतात.
कादंबरीने जागवल्या भयंकर आठवणी
इजिप्त आणि दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच अल्जेरियात कोरोनानं थैमान घातलंय. आतापर्यंत 43 हजार 16 रुग्णांची नोद झालीय, तर 1475 जणांचा मृत्यू झालाय.
फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात पहिला रुग्ण अल्जीरियात सापडला होता. त्यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आला आमि देशातील बऱ्याचशा भागात संचारबंदी जाहीर करण्यात आली.
वाढलेली दाढी आणि डोक्यावरील गळणाऱ्या केसांमुळे प्रो. लेलोऊ हे आल्ब्येर काम्यूच्या कादंबरीतील नायक डॉ. बर्नाड रिअक्स याच्यापेक्षाही म्हातारे दिसतात. मात्र, त्यांच्याइतकेच प्रा. लेलोऊ त्यांच्या रुग्णांवर उपचारासाठी प्रतिबद्ध आहेत. ओरानमधील कुणाला आल्बेर काम्यूच्या कादंबरीची आठवण असेल किंवा नसेल, पण प्रो. लेलोऊ यांना चांगली लक्षात आहे. त्याचं असंही एक कारण असू शकतं की, या कादंबरीत प्रो. लेलोऊ यांच्या गावाचा उल्लेख आहे.

फोटो स्रोत, Getty Images
प्रो. लेलोऊ म्हणतात, "या कोरोनासंकटादरम्यान मला आल्बेर काम्यूची कादंबरी सारखी आठवतेय. या कांदबरीचा विचारच डोक्यातून जात नाही. बरेच रुग्ण घाबरलेले होते. शिवाय बऱ्याच अफवाही पसरल्या होत्या."
अल्जेरियाची राजधानी अल्जेयर्सच्या पूर्वेला असलेल्या बोइरामधील हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला घेराव घातला. त्या नातेवाईकांच्या संतापापासून वाचण्यासाठी त्या डॉक्टरांनी हॉस्पिटलच्या दुसऱ्या माळ्यावरून उडी मारली आणि त्यात ते फ्रॅक्चर झाले.
'त्या' पाद्रीची आठवण
प्रो. लेलोऊ म्हणतात, "कोरोनाचं संकट आणि प्लेगच्या संकाटात एक साम्य होतं. लोकांनी प्रशासनाला दोषी ठरवण्यास सुरुवात केली होती."
काम्यूच्या कादंबरीत एक प्रसंग आहे. त्यात म्हटलंय की, "ओरान शहराच्या बाहेर असलेल्या कॅथेड्रल सॅकर-कोइयर (आताचं सार्वजनिक ग्रंथालय) एक कॅथलिक पाद्री आक्रमक भाषण करतो. त्यात तो जमलेल्या लोकांना प्लेगसाठी जबाबदार ठरवतो."
आज कोरोनाच्या संकटामुळे अल्जेरियातली मशिदी बंद ठेवण्यात आल्यात आणि शेख अदेलकादेर हामोया यांसारखे धार्मिक नेते आरोग्यासंबंधी माहिती ऑनलाईन माध्यमातून देत आहेत.
पुरोगामी म्हणून ते प्रतिष्ठित मानले जातात. मात्र, जेव्हा ते आरोग्य संकटाचा अर्थ सांगतात, तेव्हा ते आल्बेर काम्यूच्या 1940 मधील कादंबरीतल्या पाद्रीसारखेच वाटतात.

फोटो स्रोत, Getty Images
शेख अदेलकादेर म्हणतात, "जेवढं मला कळतंय, त्यानुसार, अल्लाहाला मानणाऱ्या आणि सर्वांसाठीच एक संदेश आहे की, त्याच्याकडे परत या. हेच सागंण्यासाठीचा हा एकप्रकारचा संदेश आहे."
राजकीय अस्थिरता
बऱ्याच अल्जेरियन लोकांना कोरोनाच्या आरोग्य संकाटाबाबत शंका आहे. त्यांना कोरोनाची भीती तितकी वाटत नाही, मात्र कोरोनाचा वापर इथले अधिकारी वेगळ्या कारणासाठी करतायेत, याची त्यांना भीती वाटते. कोरोनाचा प्रसार होण्याआधी अल्जीरियात शांततेच्या मार्गानं आंदोलनं सुरू होती.
अरबीत यांना हिराक किंवा आंदोलनं म्हणतात. याच आंदोलनांमुळे 20 वर्षांपर्यंत सत्तेत राहिल्यानंतर राष्ट्रपती अब्देलअजीज बोतेफ्लिका यांना एप्रिल 2019 मध्ये खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलं होतं.
यानंतर अल्जीरियात आनंदोत्सव साजरा झाला. मात्र, बोतेफ्लिका यांची जागा घेण्यासाठी उत्सुक असलेले सर्वच उमेदवार बोतेफ्लिका यांचेच साथीदार होते. त्यांतर झालेल्या निवडणुकांवर मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकण्यात आला. अखेर डिसेंबरमध्ये माजी पंतप्रधानांनाच राष्ट्रपती बनवण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
अब्देलमादिजिद तेबोन यांनी आश्वासन दिलं होतं की, ते हिराक आंदोलनाला पाठिंबा देतील, जेणेकरून एका नव्या अल्जीरियाची निर्मिती होऊ शकेल. त्यांनी सुधारणांची आश्वासनं दिली होती आणि राजकारणापासून भांडवलदारी बाजूला करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली होती.
मात्र, नोकऱ्यांमध्येच कुठलीच वाढ न झाल्याने अल्जेरियातली आंदोलनं वाढत गेली. यादरम्यान अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यांनुसार, अल्जीरिया 1990 मध्ये झालेल्या हिंसेसारख्या (ब्लॅक डिकेड) संकटात आहे.
'द प्लेग'मधील जियान तारोऊ
कोरोनामुळे आंदोलनं मागे घ्यावी लागली. आफिफ आदेरहमान यांसारख्या कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेण्याबाबत सहमती दर्शवली. त्यांनी कोरोनादरम्यान सामाजिक कामाला प्राधान्य दिलं. लॉकडाऊन दरम्यान गरजूंना अन्न-धान्याची व्यवस्था केली. एका वेबसाईटच्या माध्यमातून गरजूंपर्यंत ते पोहोचले.
आल्बेर काम्यू यांच्या द प्लेग कादंबरीतही रोगाच्या संकटादरम्यान एकता अत्यंत महत्त्वाची मानली गेलीय.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग

आदेरहमान यांची 'द प्लेग'मधील जियान तारोऊ या पात्राशी तुलना होऊ शकते. कादंबरीतला जियान तारोऊ हा सफाई कामगारांच्या टीमला डॉक्टरांसोबत घराघरात पाठवतो आणि रुग्णांवर उपचार करात, क्वारंटाईन असणाऱ्यांना मदत करतात.
आदेरहमान सांगतात, संकटकाळात एकमेकांना मदत करणं ही अल्जीरियन नागरिकांची खासियतच आहे.
फासिझम आणि दबावतंत्र
दुसऱ्या महायुद्धानंतर लिहिलेल्या 'द प्लेग' कादंबरीत फ्रान्सवर नाझींनी ताबा मिळवला ही कथानकाची पार्श्वभूमी मानली जाते. यात रोग पसरवणारे उंदीर फासिझमच्या 'प्लेग'चं प्रतिनिधित्त्व करतात.
मात्र, या कथानकाकडे अनेक अंगानं पाहिलं जाऊ शकतं, त्याचे अर्थ लावले जाऊ शकतात. यात हुकूमशाही राज्याच्या अतिरेकाचे काही धडेही लपलेले आहेत.

फोटो स्रोत, @NIME_BD
हिराक मीम्स नावाने फेसबुक पेज चालवणाऱ्या वालिद केचिडा या तरुणाला एप्रिलमध्ये राष्ट्रपती आणि धार्मिक अधिकाऱ्यांची खिल्ली उडवल्याप्रकरणी अटक करण्यात आली.
मात्र, 5 जुलै रोजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांनी काही राजकीय कैद्यांना सोडलं होतं. मात्र, केचिडांसारखे हाय-प्रोफाईल कैद्यांना सोडलं नाही.
याच महिन्याच्या सुरुवातीला वरिष्ठ पत्रकार कालेद द्रारेनी यांना निशस्त्र गर्दीला चिथावणी दिल्याप्रकरणी आणि राष्ट्रीय एकतेला धोका पोहोचवल्याप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
आरोग्य संकट आणि आंदोलनं
अल्जेरियन सरकारनं फेक न्यूजविरोधात एक कायदाही मंजूर केलाय. त्याचसोबत, कोरोना आणि आंदोलनांचं वृत्तांकन करणाऱ्या तीन वेबासईट्सही ब्लॉक केल्यात.
रेडिओच्य माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या रेडिओ कोरोना इंटरनॅशनलची सुरुवात अब्दुल्ला बेनादोदा यांनी केली होती. बेनादोदा एक अल्जीरियन पत्रकार आहे, ते सध्या अमेरिकेतील प्रांतात राहतात.

2014 मध्ये बेनादोदा हे राष्ट्रपतींचे भाई सैद बोतेफ्लिका यांच्या विरोधात होते. त्यानंतर त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे पत्नीसह त्यांनी देश सोडला.
दर मंगळवारी आणि शुक्रवारी रेडिओवरून आंदोलनांची माहिती देणारा कार्यक्रम सादर केला जातो. आंदोलनाची ताकद कायम ठेवण्यासाठी या रेडिओवरून दिलेल्या माहितीची मदत होते, असं बेनोदोदा यांचं म्हणणं आहे.
'द प्लेग' कादंबरीत फ्रेंच पत्रकार रेमंड रँबर्ट होते. तेही ओरानमध्ये घरांच्या स्थितीची माहिती देत. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांना या माहितीचा उपयोग होत असे, असं कादंबरीत आहे.
बेनादोदा हे आल्बेर काम्यूच्या रेमंड रँबर्ट या पात्राशी जवळीक साधणारं आहे.
बेनादोदा हे देशाबाहेर अडकलेत, मात्र मायदेशी परतण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. मात्र मायदेशातला दबावतंत्र, फासिझम त्यांना येऊ देत नाही आणि त्यामुळे त्यांच्यातील अस्वस्थता वाढतेय.
हिंसेविरोधात टीका
अल्जेरियात गदारोळ होण्याची भीती इतर लोकांप्रमाणे बेनादोदा यांनाही आहे. 1990 च्या दशकात जेव्हा लष्कराने इस्लामिक बंडाचा सामना केला होता, तेव्हा जवळपास दोन लाख लोकांचा मृत्यू झाला होता आणि जवळपास 15 हजार लोक जबरदस्तीने गायब करण्यात आले होते.

फोटो स्रोत, Getty Images
ओरानमधील टीव्ही ड्रामाचे स्टार अब्देलकादेर दीजेरियो हेही बेनादोदा यांच्याशी सहमत आहेत. ते आंदोलनातील मोठ्या गर्दीला संबोधित कराचे आणि गेल्या वर्षी काही काळासाठी ते कोठीतही होते.
ते म्हणतात, "ब्लॅक डिकेडमधून आम्हाला काही धडे सुद्धा मिळाले आहेत. आता आम्ही कधीच हिंसेचा मार्ग स्वीकारत नाही."
"कोरोनाच्या आरोग्य संकटानं काही गोष्टी नक्कीच बदलल्या आहेत. लोक गरीब आणि गरजूंना मदत करताना दिसतायते," असं ते म्हणतात.
आल्बेर काम्यू यांच्या कादंबरीतही कुठलीही दुर्घटना आल्यावर लोक एकत्रित येत मदत करतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








