You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मृत्युदंडाच्या शिक्षेआधी शेवटचं जेवण म्हणून कैदी काय काय मागवतात?
अमेरिकेतल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या व्यवस्थेचं नीट आकलन करता यावं, यासाठी फोटोग्राफर जॅकी ब्लॅक यांनी मृत्यूदंड देण्याआधी कैद्यांनी जे जेवण मागवलं त्याचं काल्पनिक चित्रांकन केलं आहे.
या प्रोजेक्टच्या आर्ट स्टेटमेंटमध्ये फोटोग्राफर विचारतात, "एका अशा गुन्ह्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा देण्याआधी शेवटच्या जेवणाची ऑर्डर देताना काय वाटत असेल जो गुन्हा कदाचित तुम्ही केलाही नसेल?"
"जेवणाच्या त्या ताटासमोर आपण स्वतःला ठेवलं तर कदाचित याचा अंदाज येऊ शकेल."
"कदाचित आपण न्यायपालिकेला आपली उद्दिष्टं आणि गुन्ह्यात सहभागी असण्याविषयी प्रश्न विचारू शकू."
"कदाचित ज्या व्यक्तीची आपण अवहेलना करत होतो त्याच्याविषयी आपल्याला सहानुभूती वाटू शकेल."
फोटोग्राफर ब्लॅक यांनी कैद्यांची पार्श्वभूमीविषयीही बरीच माहिती काढली. यात त्यांचं शिक्षण, रोजगार, त्यांचं शेवटचं स्टेटमेंट अशा सर्व गोष्टींची माहिती त्यांनी काढली.
डेव्हिड वायन स्टोकर
मृत्यू दिनांक : 16 जून 1997
शिक्षा : 8 वर्षं
व्यवसाय : अवजड उपकरण ऑपरेटर/सुतार
शेवटचं स्टेटमेंट : "तुमचं जे नुकसान झालं त्याबद्दल मला खरंच दुःख होतंय. पण, मी कुणालाही ठार केलेलं नाही."
अँथनी रे वेस्टले
मृत्यू दिनांक : 13 मे 1997
शिक्षा : 8 वर्षं
व्यवसाय : मजुरी
शेवटचं स्टेटमेंट : "मला तुम्हाला सांगायचं आहे की मी कुणालाही मारलेलं नाही. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो."
थॉमस अँडी बेअरफूट
मृत्यू दिनांक : 30 ऑक्टोबर 1984
शिक्षा : सूचीबद्ध नाही
व्यवसाय : ऑईलफिल्डमध्ये रोजगार
शेवटचं स्टेटमेंट : "मी सगळ्यांना सांगू इच्छितो की माझ्या मनात त्यांच्यासाठी वाईट नाही. मी त्या सर्वांना माफ केलं आहे. मी ज्यांच्यासोबत जे काही केलं आहे तेसुद्धा मला माफ करतील, अशी मला आशा आहे."
"मी दिवसभर पीडिताच्या पत्नीसाठी प्रार्थना करतो. जेणेकरून त्यांच्या मनातली कटुता संपावी. कारण त्यांची ही कटुताच त्यांना इतर कुठल्या पापासाठी नरकात नेईल. मी माझ्या कुठल्याही कार्यासाठी माफी मागतो. ते मला माफ करतील, अशी मला आशा आहे."
जेम्स रसेल
मृत्यू दिनांक : 19 सप्टेंबर 1991
शिक्षा : 10 वर्षं
व्यवसाय : संगीतज्ज्ञ
शेवटचं स्टेटमेंट : तीन मिनिटांचं स्टेटमेंट. कदाचित नोंद झाली नाही
जेफ्री अलेन बार्ने
मृत्यू दिनांक : 16 एप्रिल 1986
शिक्षा : नोंद नाही
व्यवसाय : नोंद नाही
शेवटचं स्टेटमेंट : "माझ्या कृत्याचा मला पश्चाताप आहे. माझ्या बाबतीत हेच घडायला हवं. ईश्वर मला माफ करो."
जॉनी फ्रँक गॅरेट
मृत्यू दिनांक : 11 फेब्रुवारी 1992
शिक्षा : 7 वर्षं
व्यवसाय : मजुरी
शेवटचं स्टेटमेंट : "माझ्यावर प्रेम करण्यासाठी आणि माझी देखभाल करण्यासाठी माझ्या कुटुंबीयांचे धन्यवाद. बाकी दुनिया गेली खड्ड्यात."
विलियम प्रिंस डेव्हिस
मृत्यू दिनांक : 14 सप्टेंबर 1999
शिक्षा : 7 वर्षं
व्यवसाय : मजुरी
शेवटचं स्टेटमेंट : "मी माझ्या कुटुंबीयांना म्हणू इच्छितो की माझ्या कर्मामुळे त्यांना जे असहनीय वेदना आणि त्रास झाला त्यासाठी माझ्या आत्म्यापर्यंत मी दुःखी आहे. मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या लोकांचाही मी आभारी आहे. त्यांनी या काळात मला प्रेम दिलं."
"विज्ञानासाठी देहदान केल्याने कुणाचीतरी मदत होईल, अशी आशा मला आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे."
गेराल्ड ली मिशेल
मृत्यू दिनांक : 22 ऑक्टोबर 2001
शिक्षा : 10 वर्षं
व्यवसाय : सुतार
शेवटचं स्टेटमेंट : "या पीडेसाठी मी माफी मागतो. तुमच्यापासून जे जीवन हिरावून घेण्यात आलं, त्यासाठी मी माफी मागतो. मला माफ करावं, अशी मी इश्वरचरणी प्रार्थना करतो. मी तुमच्याकडेही हीच प्रार्थना करतो. मला माहिती आहे की हे अवघड आहे. पण, माझ्या कृत्याचा मला पश्चाताप आहे."
रॉबर्ट अन्थनी मॅडेन
मृत्यू दिनांक : 28 मे 1997
शिक्षा : 12 वर्षं
व्यवसाय : कूक
शेवटचं स्टेटमेंट : "तुम्हाला झालेलं नुकसान आणि झालेल्या वेदना, यासाठी मी माफी मागतो. पण, मी त्यांची हत्या केलेली नाही. आपण स्वतःबद्दल आणि एकमेकांविषयी आणखी जाणून घेऊ, अशी मला आशा आहे. आपण द्वेष आणि सुडाचं चक्र थांबवण्याविषयी शिकू. या प्रक्रियेत मी सर्वांची माफी मागतो."
जेम्स बिथार्ड
मृत्यू दिनांक : 9 डिसेंबर 1999
शिक्षा : 15 वर्षं
व्यवसाय : मोटरसायकल मेकॅनिक
सुनावणीनंतर फिर्यादीच्या बाजूच्या महत्त्वाच्या साक्षीदाराने साक्ष फिरवली. त्यानंतर त्रीसदस्यीय पॅरोल बोर्डाने आरोपीला माफ करण्याची शिफारस केली होती.
शेवटचं स्टेटमेंट : "माझ्या कुटुंबीयांनी मला जे प्रेम दिलं त्याबद्दल मी आभारी आहे. या जगात कुणाकडेही इतकं चांगलं कुटुंब नव्हतं. माझे पालक जगातले सर्वोत्तम आई-वडील होते. माझं आयुष्य इतर कुठल्याही व्यक्तीपेक्षा उत्तम होतं. माझा मुलगा आणि मुलगी यांच्यापेक्षा जास्त अभिमान मला कुणाचाच वाटला नाही."
"मला इथे असं काही सांगायचं आहे जे लोक ऐकू इच्छितील. अमेरिका एक असं ठिकाण बनलं आहे जिथे मानवी आयुष्याला काहीच किंमत नाही. माझा मृत्यू एका मोठ्या आजाराचं केवळ लक्षण आहे. एका बिंदूला जाऊन सरकारने इतर राष्ट्र नष्ट करणे आणि निष्पाप मुलांची हत्या करणं थांबवावं लागेल. इराण, इराक, क्युबा आणि अशाच इतर ठिकाणी लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे जगात काहीच बदल घडणार नाही. यामुळे केवळ निष्पाप मुलांचं नुकसान होत आहे."
"आपण पर्यावरणाशी जो खेळ मांडला आहे त्याचे विनाशकारी परिणाम समोर येत आहेत."
"जगात ज्या माध्यमातून सत्य बाहेर येतं त्याचं एक माध्यम स्वतंत्र माध्यमं आहेत. मात्र, माध्यमं एक स्वतंत्र संस्था म्हणून टिकून राहण्यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागत असल्याचं मला जाणवतं."
लास्ट मिल्स (शेवटचं जेवण) या फोटो कलाकृतीचं प्रदर्शन न्यूयॉर्कमधल्या पॅरिश आर्ट संग्रहालयात 31 जानेवारी 2021 पर्यंत खुलं राहणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)