अमेरिकेत सर्वात जास्त शिकलासवरलेला समाज हिंदूंचा

अमेरिकेत तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असेल तर 4 वर्षाची कॉलेजची पदवी महत्त्वाची मानली जाते. पण धर्माच्या आधारावर कोण कोण पदवीपर्यंतचं शिक्षण घेतं, हे पाहिलं तर त्याची सरासरी आकडेवारी धर्मानुसार वेगवेगळी दिसते.

काही धर्मातील विद्यार्थी असे आहेत जे दुसऱ्या धर्मांच्या तुलनेत पदवीचं शिक्षण पूर्ण करण्यात बाजी मारताना दिसतात.

सुप्रसिद्ध संशोधन संस्था प्यू रिसर्चनुसार पदवीचं शिक्षण पूर्ण करण्यात हिंदू सगळ्यात (77%) आघाडीवर आहेत. त्यानंतर युनिटेरियन युनिव्हर्सलिस्ट (67%) यांचा नंबर लागतो. युनिटेरियन युनिव्हर्सलिस्ट मुक्त विचारांचे आहेत.

यानंतर पदवीचं शिक्षण पूर्ण करण्यात यहुदींचा (59%) नंबर लागतो. तसंच अँजलिकन चर्च (59%) तर एपिस्कोपल चर्चचे (56%) टक्के विद्यार्थी पदवीचं शिक्षण पूर्ण करतात.

2014 च्या रिलिजियस लँडस्केप स्टडीच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आलेली आहे. ज्यात शैक्षणिक योग्यतेच्या आधारावर अमेरिकेतील 30 धार्मिक समुदायांचा अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये अमेरिकेतील 35 हजार पदवीधारकांचा समावेश होता.

शिक्षण आणि आर्थिक प्रगती करण्यात अमेरिकेत हिंदू आणि यहुदी सर्वांत पुढे आहेत. त्यामुळे अमेरिकेत कौटुंबिक कमाई करण्यातही हे दोन्ही समुदाय सर्वांत पुढे आहेत.

2014 च्या अभ्यासानुसार 44% यहुदी आणि 36% हिंदू कुटुंबं अशी आहेत, ज्यांची कौटुंबिक कमाई कमीत कमी 1 लाख डॉलरपेक्षाही जास्त आहे.

इतर धर्मांमध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण घेणाऱ्यांचं प्रमाण 27 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. ज्यात बौद्ध, प्रेस्बाइटेरियन चर्च (अमेरिका) - दोन्ही 47% तर परंपरावादी इसाई (40%), मुसलमान (39%) आणि मोरमोंस (33%) यांचा समावेश आहे.

प्रत्येक 5 व्यक्तींमागे एक कॅथलिक माणूस वयस्कर आहे, त्यामुळे पदवीधारकांसोबतच त्यांच्या इतर सदस्यांची संख्याही सामान्य लोकांइतकीच अर्थात 26% च्या घरात आहे.

नॅशनल बाप्टिस्ट कन्व्हेंशनजवळ 19% आफ्रिकन मेथडिस्ट, एपिस्कोपल चर्चजवळ 21% आणि दक्षिणपंथी बाप्टिस्ट कन्व्हेंशनजवळ 19% लोकांनी पदवीचं शिक्षण घेतलेलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)