या रंगीबेरंगी मंदिराने वेधलं पर्यटकांचं लक्ष, पण ‘कायदाही मोडला’

मलेशियातल्या एका मंदिराचा कायापालट करण्यात आला आहे. या मंदिराला 272 पायऱ्या आहे. या पायऱ्या बाटू नावाच्या एक गुहेत जातात. हा संपूर्ण मार्ग विविध रंगांनी सजवण्यात आला आहे.

हे देऊळ क्वालालांपूरच्या बाहेरच्या भागात आहे. ते एक तीर्थक्षेत्र आहे आणि पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. या मंदिराचा बदललेला चेहरामोहरा पर्यटकांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे आणि येत्या काळात इन्स्टाग्रावर धुमाकूळ घालेल, यात शंका नाही.

पण एक अडचण आहे.

काही स्थानिक वृत्तांनुसार या मनमोहक रंगरंगोटीमुळे मंदिर व्यवस्थापनाच्या अडचणी वाढू शकतात. कारण त्यांनी सरकारच्या परवानगीशिवाय हा संपूर्ण परिसर रंगवलेला आहे.

कारण हे मंदिर वारसास्थळांच्या नियमांनुसार संरक्षित आहे, त्यामुळे हे रूपांतरण एकप्रकारे बेकायदेशीर आहे.

म्हणून हे फोटो आजच मनभरून पाहून घ्या. कोण जाणे, उद्या कारागिरांना इथे हा रंग काढायला पुन्हा यावं लागेल.

.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)