You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फोटो गॅलरी : म्हणून हे फोटो ठरले जगावेगळे
रॉयल सोसायटीच्या छायचित्र पुरस्कारांच्या विजेत्या आणि उपविजेत्यांची छायाचित्रं जाहीर झाली आहेत. यातली काही निवडक विजेत्यांची छायाचित्रं बीबीसी मराठीनं वाचकांसमोर आणली आहेत.
अंटार्टिका खंडावरील हा बर्फ जणू शुगर क्यूब्स ठेवल्याप्रमाणेच दिसतो आहे. हवेतून घेतलेला हा फोटो पीटर कॉन्वे यांनी १९९५ मध्ये घेतला होता.
रॉयल सोसायटी पब्लिशिंग फोटोग्राफी स्पर्धेत या सगळ्या विजेत्यांना या वर्षीच्या पृथ्वी, विज्ञान आणि जलवायू या विभागात विजेते म्हणून सहभागी करण्यात आलेलं आहे.
पर्यावरण विज्ञान या विभागात निको द ब्रुयन यांना या छायाचित्रासाठी पुरस्कार देण्यात आला आहे. अंटार्टिकातल्या एका किनाऱ्यावर अचानक हिंस्त्र किलर व्हेल येतात आणि त्यांच्यापासून वाचण्यासाठी पाण्यातले पेंग्विन तिथून पळ काढतात. हे दृश्य निको द ब्रुयन यांनी आपल्या कॅमेऱ्यात योग्य वेगळी कैद केलं. त्यामुळे ते विजेते ठरले.
डॅनियल मिशालिक यांनी हे छायाचित्र काढलं आहे. खगोलशास्त्र विज्ञानाच्या विभागात या छायाचित्राला विजेतेपद मिळालं आहे.
विज्ञानाशी निगडीत छायाचित्रांसाठी यंदा स्पर्धा होती. खगोलशास्त्र, व्यवहार, भौतिकशास्त्र, पर्यावरण आणि मायक्रो-इमेजिंग या विभागात यंदा ११०० जणांचे अर्ज आले होते.
पूर्व ग्रीनलँडमधल्या समुद्र किनाऱ्यावर पाण्याकडे पाहणाऱ्या या पांढऱ्या अस्वलाला एंटोनियो डोनसिला यांनी पाहिलं आणि त्यांनी तत्काळ त्याची ही मुद्रा टिपली. डोनसिला यांना व्यवहार या विभागात या छायाचित्रासाठी विजेते म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
'ऑलिव्ह ऑईल ड्रॉप हँगिंग टूगेदर' म्हणजेच ऑलिव्ह ऑईलच्या पडणाऱ्या थेंबांना कैद केलं आहे हार्व इलेत्री यांनी. मायक्रो-इमेजिंग विभागातले इलेत्री विजेते आहेत.
ज्युसेप स्वारिया यांना भौतिकशास्त्र विभागात या छायाचित्रासाठी उप-विजेता म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
सुस्मिता दत्ता यांना व्यवहार या विभागात या इंडियन रोलर पक्ष्याच्या छायाचित्रासाठी विजेता म्हणून सन्मानित करण्यात आलं आहे.
चिलीमधल्या पेरानल या ऑब्झर्वेटरीनं रात्रीच्या आकाशातील या विहंगम दृश्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं.
पेत्र हॉरालेक यांच्या या छायाचित्राला खगोलशास्त्र या विभागात सन्मानित करण्यात आलं.
हवाईमधल्या किलाएवा ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या या लाव्हारसाचे हे छायाचित्र सबरीना कॉहलेर यांनी घेतलं आहे. कॉहलेर यांना भौतिकशास्त्र विभागात पुरस्कृत करण्यात आलं आहे.
वेई-फेंग जु यांनी अमेरिकेतून दिसलेल्या या सूर्य ग्रहणाचे हे छायाचित्र टिपलं आहे. त्यांना खगोलशास्त्र विभागात उप-विजेता म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
व्लादिमिर ग्रोस यांना मायक्रो इमेजिंग विभागात या छायाचित्रासाठी उप-विजेते म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
हे छायाचित्र हिपसिबिअस दुजरदिनी या अतिसूक्ष्म जीवाचं आहे. जे इलेकट्रॉन मायक्रोस्कोपद्वारे १८०० पट वाढवून घेण्यात आलं आहे.
या दोन पक्ष्यांच्या छायाचित्राला डेव्हिड कोस्तांतिनी यांना व्यवहार या विभागात उप-विजेता म्हणून जाहीर करण्यात आलं आहे.
ग्रीन ट्री बेडकांचे पर्यावरणातलं योगदान या संकल्पनेवरील छायाचित्राला पर्यावरण विभागात पुरस्कृत करण्यात आलं आहे. कार्लोस जारेड यांनी हे छायाचित्र घेतलं आहे.
छायचित्रकार बर्नार्डो सेगुरा ने यांनी कोळ्याच्या जाळ्याच्या अतिसूक्ष्म स्वरुपाचं हे छायाचित्र घेतलं आहे. मायक्रो इमेजिंग प्रकारात या छायाचित्राला पुरस्कृत करण्यात आलं आहे.
थॉमस एंडलिन यांनी पर्यावरण विभागासाठी या वनस्पतीचं छायाचित्र काढले होते. त्यांना या विभागासाठीचं उप-विजेतं घोषित करण्यात आलं आहे.
आणखी वाचा -
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)