बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख, खास तुमच्यासाठी..

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील. पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी काळजी नको. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख खास तुमच्यासाठी...

1. IMF म्हणतं, भारताची आर्थिक वाढ मंदावणार, काय आहेत कारणं?

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफने 2022-23 या वर्षासाठीचा भारताचा आर्थिक विकास दर 7.4 टक्क्यांवरून घटवून 6.8 टक्क्यांवर आणलाय. आयएमएफने हा विकास दर कपात करण्याची दुसरी वेळ आहे.

आयएमएफच्या मते, पुढच्या वर्षी भारतासह संपूर्ण जगाचाच विकास दर खाली येणार आहे.

यासाठी रशिया-युक्रेन युद्ध, जगभरात सुरू असलेली आर्थिक टंचाई, मागच्या दहा वर्षात वाढलेला महागाईचा दर आणि त्यात मागच्या दोन वर्षांपूर्वी आलेली कोरोना साथरोग या सर्व गोष्टी कारणीभूत आहेत. वाचा - भारताची आर्थिक वाढ मंदावण्याची कारणे काय आहेत?

2. ई-रुपी काय आहे?, याचा सामान्यांना किती फायदा होईल?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चालू आर्थिक वर्षाचा (2022-23) अर्थसंकल्प सादर करताना सांगितले होते की, आरबीआयची डिजिटल करन्सी म्हणजेच डिजिटल रुपया म्हणजेच ई-रुपी डिजिटल अर्थव्यवस्थेला बळकट करेल.

भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) डिजिटल रुपयामध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करू शकते. काही विशिष्ट वापरासाठी लवकरच ई-रुपी म्हणजेच सीबीडीसी (सेंट्रल बँक डिजिटल करन्सी) सादर करण्यात येईल, असे शुक्रवारी आरबीआयने संकेत दिले.

किरकोळ व घाऊक व्यवहारांसाठी याचा वापर होईल. जाणून घ्या, ई-रुपी म्हणजे नेमकं काय?, याचा सामान्यांना किती फायदा?

3. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना होणाऱ्या मारहाणीबाबत कायदा काय सांगतो?

दिल्लीजवळच्या ग्रेटर नोएडामध्ये एका शालेय शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाईही सुरू आहे.

विद्यार्थ्याला शिक्षकांकडून मारहाण झाल्याचा हा काय पहिलाच प्रकार नाही. यापूर्वीही अनेकवेळा असे प्रकार समोर आले आहेत. शाळांमध्ये शिस्तपालन किंवा जातींच्या नावाने विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप शिक्षकांवर अनेकवेळा झाला आहे.

अशा बातम्यांबाबत कधी वर्तमानपत्रांमधून मोठी चर्चा होते. तर कधी पानावरील कोणत्या तरी कोपऱ्यापुरती ही बातमी मर्यादित राहते.

भारतात शिक्षकांना विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा अधिकार दिलेला आहे का? याबाबत कायदा काय सांगतो, याविषयी आपण आता माहिती घेऊ -

4. T20 वर्ल्ड कप 2022 बाबत तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं

यावर्षी आयसीसी T-20 वर्ल्ड कपच्या मॅचेस ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहेत. या स्पर्धेमध्ये पहिली मॅच 16 ऑक्टोबरला, तर फायनल 13 नोव्हेंबरला खेळली जाईल. आता या स्पर्धेसाठी भारतीय संघाचीही घोषणा करण्यात आलीय.

त्यामुळे क्रिकेटप्रेमींनी T-20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक पाहायलाचं हवं. त्याशिवाय इतरही अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला माहीत असायला हव्यात.

5. पुतिन यांना समर्थन देणारे लोकही आता त्यांची साथ सोडत आहेत, कारण...

मागच्या आठवड्यात मॉस्कोच्या प्रसिद्ध रेड स्क्वेअरवर एक भव्य समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात बोलताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनचे चार मोठे प्रदेश रशियामध्ये विलीन केल्याचं सांगितलं.

त्यावेळी बोलताना पुतिन यांनी म्हटलं, "सत्य आमच्यासोबत आहे आणि हेच सत्य आमचं सामर्थ्यसुद्धा आहे. शेवटी विजय आमचाच असेल!"

पण तसं बघायला गेलं तर परिस्थिती नेमकी याउलट असल्याचं दिसतं. युद्धक्षेत्रात परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे आणि यामुळे पुतिन यांना समर्थन देणारे लोकही त्यांना सोडून जाताना दिसत आहेत.

बीबीसी मराठीचे व्हीडिओ, जे तुम्ही नक्की पाहायला हवेत -

1. शिवसेनेनं यापूर्वी कोणत्या चिन्हांवर निवडणूक लढवली होती?

2. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांवरून वाद का सुरू आहे? | सोपी गोष्ट 704

3. कोरोनामुळे वडील गेल्यावर या मुलीने घरचा व्यवसाय कसा सांभाळला?

4. सोन्यासारखे दिसणारे 'हे' दागिने तयार कसे होतात?

5. युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये रशियन क्षेपणास्त्रं आदळली आणि...

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)