BBC Marathi : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख, खास तुमच्यासाठी...

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील. पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी काळजी नको. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख खास तुमच्यासाठी...

1. शशी थरूर की अशोक गेहलोत, काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोणाचं पारडं जड?

काँग्रेसचा अध्यक्ष 17 ऑक्टोबरला निवडला जाणार आहे. यावेळी पक्षाची धुरा बिगर गांधी परिवाराकडे असेल की गांधी परिवारच काँग्रेसचं नेतृत्व करेल याची चर्चा जोरात आहे.

प्रसारमाध्यमात आलेल्या बातम्यांनुसार खासदार शशी थरुर पक्षाच्या अध्यक्षपदाची दावेदारी सादर करू शकतात. तसंच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत शशी थरूर या निवडणुकीत त्यांना आवाहन देऊ शकतात.

राहुल गांधी उमेदवारी दाखल न करण्याच्या त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. या स्थितीत अशोक गहलोत आणि शशी थरूर यांच्यापैकी कुणाचं पारडं जड असेल?

2. मुकेश अंबानी यांनी ईशा अंबानी यांच्याकडे मोठी जबाबदारी देऊन काय संकेत दिलेत?

गेल्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट 2022 मध्ये उद्योगपती मुकेश अंबानींच्या रिलायन्स उद्योगसमूहाची वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठीकत त्यांनी रिलायन्स उद्योगसमूहात आपल्या तिन्ही मुलांना वेगवेगळी जबाबदारी विभागून दिली. मुकेश अंबानींच्या या पावलाकडे अनेकजण त्यांचा 'सक्सेशन रोडमॅप' म्हणून पाहतायेत.

मुकेश अंबानींनी अकाश आणि ईशा यांना अनुक्रमे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या टेलिकम्युनिकेशन्स आणि रिटेल बिझनेसची जबाबदारी दिलीय, तर लहान मुलगा अनंत अंबानींना नवीन ऊर्जेशी संबधित विभागात लक्ष घालण्यास सांगण्यात आलंय.

मुकेश अंबानींच्या पुढील पिढ्यांकडील नव्या जबाबदाऱ्यांकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे. कारण बाजार मूल्यांकनानुसार रिलायन्स उद्योगसमूह भारतातील सर्वांत मौल्यवान कंपन्यांपैकी एक आहे. कुणाकडे कोणती जबाबदारी दिली जाईल, याबाबत अजून तरी अंदाजच लावले जात आहेत. जाणून घ्या त्यांनी ईशा अंबानी यांना कोणती जबाबदारी दिली आहे.

3. कविता चावला : KBC मध्ये जाण्यासाठी 21 वर्षं प्रयत्न केले आणि 14 व्या सीझनमध्ये करोडपती बनल्या

भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय शो पैकी एक असलेल्या 'कौन बनेगा करोडपती'च्या चौदाव्या सीझनला पहिला करोडपती मिळाला आहे. कोल्हापूरच्या राहणाऱ्या 45 वर्षांच्या कविता चावला या कौन बनेगा करोडपतीच्या 14व्या सीझनच्या पहिल्या करोडपती बनल्या आहेत.

2000 साली जेव्हा कौन बनेगा करोडपतिची सुरुवात झाली होती. तेव्हापासून कविता या शोमध्ये भाग घेण्याचा प्रयत्न करत होत्या. अखेरीस 21 वर्षं, 10 महिने प्रयत्न केल्यानंतर त्यांना अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली.

2021 साली कविता यांना फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राउंडपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली. पण त्या तिथून पुढे जाऊ शकल्या नाहीत. पण तरीही त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आणि मेहनत करत राहिल्या. अमिताभ बच्चन यांनीच आपल्याला प्रयत्न सुरू ठेवण्याची प्रेरणा दिली, असं कविता सांगतात. वाचा, कविता चावला यांचा गृहिणी ते करोडपती बनण्यापर्यंतचा प्रवास -

4. छेल्लो शो : ऑस्करसाठी भारताकडून पाठवण्यात आलेल्या सिनेमाची गोष्ट

यावेळेस भारतातर्फे राजामौली यांच्या आरआरआर सिनेमा की गुजराती सिनेमा 'छेल्लो शोला' बेस्ट फॉरेन फिल्म श्रेणीमध्ये पाठवावं यावर सोशल मीडियात वाद-प्रतिवाद होत होते.

भारतासह अनेक देशात गाजलेला आरआरआर सिनेमा ऑस्करसाठी पाठवला जाईल, असं अनेक लोकांना वाटत होतं. या सिनेमानं अमेरिकेसह अनेक देशांत भरपूर व्यवसाय केला. तसंच परदेशातील मोठ-मोठ्या समिक्षकांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे.

परंतु ऑस्करला पाठवण्यासाठी छेल्लो शोची निवड झाल्यावर आरआरआर फार न आवडलेल्या लोकांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे.

एखादा सिनेमा ऑस्करमध्ये जाईल असं वाटत असताना भारताने दुसऱ्या सिनेमाची निवड करण्याची नजिकच्या काळातली ही दुसरी वेळ असल्याचं व्हरायटी मॅगझिनचे लेखक क्लेटन डेव्हिस यांनी लिहिलं आहे. जाणून घ्या, छेल्लो शो चित्रपटाची गोष्ट -

5. ICCकडून क्रिकेटच्या नियमांत 8 नव्या सुधारणा जारी, चेंडूला लाळ किंवा थुंकी लावायला परवानगी नाहीच

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना अर्थात आयसीसीनं क्रिकेट खेळाच्या नियमावलीत काही सुधारणा केल्या आहेत.

भारताचे माजी कर्णधार आणि बीबीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट समितीनं तसच महिला क्रिकेट समितीनंही या सुधारणा सुचवल्या होत्या. त्यासाठी त्यांनी मेरिलिबॉन क्रिकेट क्लबनं 2017 साली जाहीर केलेल्या सुधारीत क्रिकेट नियमावलीचा आधार घेतला होता.

कॅच पकडला जाण्यापूर्वी फलंदाजनं क्रीज बदललं असेल, तर नवा फलंदाज नॉनस्ट्रायकर एंडला येत असे. पण आता असं होणार नाही. शिवाय चेंडू रिव्हर्स स्विंग करता यावा यासाठी एकाबाजूला तो खडबडीत होऊ द्यायचा आणि दुसरीकडे त्याची चकाकी कायम राहील याची काळजी घ्यायची असा आधी गोलंदाजांचा डावपेच असायचा. त्यासाठी चेंडूला लाळ किंवा थुंकीही लावली जायची.

पण कोव्हिडच्या काळात संसर्ग पसरण्याचा धोका पाहता त्यावर बंदी घालण्यात आली. दोन वर्षानंतर आता हा नियम कायमस्वरुपी करण्यात आला आहे.

याशिवाय इतरही नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. 1 ऑक्टोबर 2022 पासून हे नवे नियम लागू होतील. आयसीसीनं लागू केलल्या सुधारणा या लिंकवर क्लिक करून जाणून घ्या.

बीबीसी मराठीचे व्हीडिओ, जे तुम्ही नक्की पाहायला हवेत -

1. चित्रातली टेकडी प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपडणारी मुलं

2. इराणमध्ये महिला सार्वजनिकरीत्या हिजाब का जाळतायत? । सोपी गोष्ट 691

3. जगात खरंच आर्थिक मंदी येणार आहे का? भारतावर तिचा काय परिणाम होईल? । सोपी गोष्ट 690

4. भारतात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना वेतन कमी का मिळतं?। सोपी गोष्ट 688

5. तैवानः भूकंपामुळे ट्रेन खेळण्यासारख्या हलू लागतात तेव्हा..

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)