खोटे लिंग वापरून महिलांना फसवणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तीला 10 वर्षांचा कारावास

फोटो स्रोत, Getty Images
तृतीयपंथी (Trans Man) व्यक्तीनं दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलीसोबत कृत्रिम लिंगाद्वारे लैंगिक संबंध प्रस्थापित केले. या व्यक्तीला अटक करण्यात आली असून, 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलीय. लंडनस्थित माध्यमांनी याबाबतचं वृत्तांकन केलं असून, एएनआय वृत्तसेवा संस्थेनं ही माहिती दिलीय.
तरजीत सिंग असं या 32 वर्षीय तृतीयपंथी (Trans Man) व्यक्तीचं नाव आहे. तरजीत सिंग जन्मत: स्त्री होता. त्यावेळी त्याचं नाव हन्ना वॉल्टर्स असं होतं. आता तो स्वत:ला पुरुष म्हणून ओळख करून देतो आणि त्याचं आताचं नाव तरजीत सिंग आहे.
लैंगिक संबंधांदरम्यान तरजीतने कपडे परिधान केलेले असत आणि कृत्रिम लिंगाचा वापर करत असे.
वृत्तांनुसार, या वर्षाच्या सुरुवातीला स्नेअरेसब्रुक क्राउन कोर्टात झालेल्या खटल्यानंतर तरजी सिंगला घुसखोरी करून प्राणघातक हल्ला केल्याच्या तीन गुन्ह्यांमध्ये, शारीरिक इजा करण्याच्या सहा गुन्ह्यांमध्ये आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या एका गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आले होते.
तरजीत सिंगने पीडितेवर हल्ला करून तिचं नाक मोबाईल फोननं आपटून फोडलं. त्यानंतर जाळून टाकण्याची धमकी दिली. तसंच, थप्पड मारून, धक्काबुक्की केल्याचंही पीडितेनं न्यायालयाला सांगितलं.
न्या. ऑस्कर डेल फॅब्ब्रो म्हणाले की, "तरजीत सिंग हा भविष्यकाळात लोकांसाठी धोकादायक आहे. शिवाय, तो भयंकर गुन्ह्यांमधील गुन्हेगार आहे. सातत्यानं तो गुन्हे करतोय. त्यानं तीन पीडितांवर हल्लेही केलेत."

फोटो स्रोत, Getty Images
तसंच, न्या. फॅब्ब्रो पुढे म्हणाले की, तरजीत सिंग एक तरबेज आणि फसवणूक करणारा गुन्हेगार आहे.
न्यायाधीशांनी आपलं मत नोंदवल्यानंतर या प्रकरणाचा निकाल देताना म्हटलं की, "आपल्या लैंगिक ओळखीबद्दल स्पष्ट आणि प्रामाणिकपणे सांगण्याऐवजी त्यानं फसवणुकीचा मार्ग अवलंबला. पुरुष असल्याचं सांगून, फसवणूक करत पुरुषासारखं वागला."
तरजीत सिंगला न्यायालयानं 10 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आलाय.
तसंच, लैंगिक हानी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत येणारे कलमही त्याच्यावर लावण्यात आले आहेत.
वृत्तांनुसार, तरजीत सिंग सोशल मीडियाच्या माध्यमातून यातील दोन पीडितांना भेटला, तर तिसऱ्या पीडितेला चिकन शॉपमध्ये भेटला होता.
पीडितांनी कथन केलेला त्रासदायक अनुभव
न्यायालयात पीडितांपैकी एकीचा जबाब वाचून दाखवण्यात आला. त्यात म्हटलं होतं की, "या घटनेमुळे माझं मानसिक आरोग्य खालावलं आहे आणि मला चिंताग्रस्तता आणि नैराश्याचा त्रास सुरू झाला. मला यासाठी औषधोपचार सुरू करावे लागले."
"मी त्यावेळी केवळ 16 वर्षांची होते आणि अतिशय असुरक्षित ठिकाणी होते. गुन्हेगारानं याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला. त्यांनी माझा वापर त्याच्या त्रासदायक खेळांसाठी केला," असंही तिनं जबाबात सांगितलं.
पीडितेने पुढे सांगितले की, तरजीत सिंगकडे हा गुन्हा पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ होता. त्यावेळी मी तरुण होते. या संबंधांचा अपमानजनक शेवट झाला. पण मला वाटलं एखाद्या नात्यात असं होत असावं.
"माझ्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षं वाया गेली आहेत. मी माझा अभ्यास आणि कॉलेजही पूर्ण करू शकले नाही. बऱ्याच काळापासून मी बाहेरही पडले नाही. माझ्यावर कुणीतरी लक्ष ठेवतंय, असंच मला सारखं वाटत राहिलं. यातून बाहेर पडण्यासाठी मला बराच कालावधी जाईल," असं पीडित तरुणी म्हणाली.
दुसरी पीडित तरुणी म्हणाली की, या त्रासदायक संबंधांनंतर यातून बाहेर येण्यासाठी मला बराच काळ निघून जाईल.
ती पुढे म्हणाली, "माझा आधी गर्भपात झाला होता, त्यामुळे मला हन्नाबद्दल विचार करावा लागला होता. त्याच्यामुळे मला किती त्रास झाला, हे शब्दात सांगतानाही मला त्रास होतोय. कुठल्याच शब्दात हे वर्षण करू शकत नाही. भावनिकरित्या आणि मानसिकरित्या माझ्यावर या घटनेचा आघात झालाय."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








